Site icon InMarathi

ऑलिम्पिक बघा किंवा नका बघू; या ८ स्पोर्ट्स मुव्ही नक्की बघा!!

sport films inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

कुठल्या ही खेळात जिंकण्या हरण्या पलीकडे असते ती म्हणजे खिलाडू वृत्ती, या वृत्तीने तो खेळ खेळला गेला पाहिजे. अनेकदा आपण खेळात बघतो की अनेक कलाकार चिडीचा डाव खेळता किंवा अन्य खेळाडूंना रागाच्याभरात दुखापत देखील करतात.

नुकतंच ऑलिम्पिक स्पर्धा सुरु झाली आहे कालच आपल्या मीराबाई चानूने सिल्वर मेडल मिळवून भारताचं खात उघडले,

भारतीयांसाठी सर्वात आवडीचे विषय म्हणजे खेळ आणि सिनेमा, आज मोबाईलवर अगदी सत्तरच्या काळातील सिनेमा किंवा एखादी मॅच बघू शकतो. खेळांमध्येसुद्धा अनेक नाट्यमय़ प्रसंग घडत असतात, अनेक खेळाडूंचे आयुष्य सुद्धा संघर्षमयी आहे, अशाच काही खेळाडूंचे आयुष्य बॉलीवूडने मोठ्या पडद्यावर दाखवले आहे.

आज खेळावर बेतलेले अनेक चित्रपट येऊन गेले आहेत त्यातील सिनेमे अनेकांनी बघितले असतील मात्र ज्यांनी हे सिनेमे बघितले नाहीत अशांनी हे सिनेमे आवर्जून बघावेत, चला तर मग जाणून घेऊयात हे अजरामर सिनेमे…

गोल्ड :

सध्या एकूणच वातावरण ऑलिम्पिक स्पर्धेचे असल्याने याच ऑलिम्पिकवर बेतलेला गोल्ड सिनेमा तीन वर्षांपूर्वी येऊन गेला होता. भारत स्वतंत्र झाल्यानांतर जी ऑलिम्पिक स्पर्धा  भरवण्यात आली होती त्यात आपल्या हॉकी टीमने गोल्ड मेडल मिळवले होते.

कायमच वेगळ्या धाटणीच्या विषयांना हात घालणारा अक्षय कुमार या सिनेमात मुख्य भूमिकेत होता. त्याने साकारलेले पात्र सुद्धा एका हॉकी प्लेअरच्या आयुष्यवर बेतलेले होते.

 

 

चक दे इंडिया :

रोमांसचा बादशाह म्हणवल्या जाणाऱ्या शाहरुखचा एक वेगळा रोल यात आपल्याला बघायला मिळाला होता. खरं तर हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ मात्र त्याला हवे तसे फेम मिळत नाही. याच खेळावर बेतलेला हा सिनेमा आणि विशेष म्हणजे यामध्ये असणारी हॉकी टीम ही महिलांची होती. प्रांतीय वाद, खेळातील नियमांवरून होणारी भांडण, या समस्यांवर मात करून कोचच्या भूमिकेतील शाहरुख टीमला विश्वचषक मिळवून देतो.

 

 

इकबाल :

आज गावोगावी अनेक तरुण मुलांचं स्वप्न असत की सचिन सारखा खेळाडू बनाव मात्र त्यातील फार कमी मुलांची स्वप्न साकार होतात. एक मूकबधिर मुलगा ज्याला क्रिकेटर बनायचं असत मात्र हवे तसे कोचिंग मिळत नसते. गावातल्या एका जुन्या क्रिकेटरच्या कोचिंगने तो खेळ शिकतो आणि पुढे जाऊन टीम इंडियात सामील होतो.

 

हे ही वाचा –शहीद भावाच्या स्मरणार्थ बनवलेल्या सुपरहिट सिनेमाला खुद्द PM नी दिला हिरवा कंदील!

श्रेयस तळपदेचा पहिला हिंदी सिनेमा त्याने उत्तम भूमिका केलीच आहे तसेच त्याला सपोर्ट करणारी त्याची बहीण, आई वडिलांचा विरोध, शारीरिक व्यंग या सर्वांवर मात करून तो एक उत्तम खेळाडू होतो.

दंगल :

आपला पारंपरिक खेळ कोणता तर सर्वात पहिले नाव येत ते म्हणजे  कुस्ती, आजही कोल्हापुरात अनेक तालिमी चालतात ज्यातून अनेक पैलवान तयार होतात. याच खेळावर बेतलेला सिनेमा म्हणजे दंगल. कुस्ती फक्त पुरुषांचा खेळ आहे याला छेद देणारा हा सिनेमा आहे.

 

 

आमिर खान जो नेहमीच वेगळे प्रयोग करत असतो, या सिनेमात सुद्धा त्याने आपली चमक दाखवली होती, सोबतीला असलेल्या  कलाकारांनी देखील उत्तमच काम केले आहे. मराठमोळा अभिनेता गिरीश कुलकर्णी विशेष लक्षात राहतो.

 

भाग मिल्खा भाग :

नुकतंच मिल्खा सिंग यांचं निधन झाल, त्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. फाळणीतून भारतात आलेले मिल्खा सिंग ते भारतीय सैन्यात दाखल होऊन धावपटू होणे हा प्रवास पडद्यावर अक्षरशः जिवंत केला आहे.

 

 

मेरी कौम :

मेरी कौम सध्या सुरु असलेल्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा उत्तम खेळत आहे, गोल्ड मेडल मिळवण्याचा तिचा ध्यास आहे याआधी सुद्धा त्याने ब्रॉन्झ मेडल मिळवले आहे. तिच्या आयुष्यावर देखील चित्रपट येऊन गेला होता ज्यात तीच काम करण्याचं धाडस केलं होत प्रियांका चोप्राने, चित्रपटाला समीक्षकांनी देखील डोक्यावर घेतले होते.

 

 

एम एस धोनी :

झारखंडमधला एका मुलगा केवळ घरच्यांसाठी टीसीची नोकरी करणारा, डोक्यात फक्त क्रिकेटचा विचार असा हा मुलगा पुढे जाऊन टीम इंडियाचा कप्तान होतो. सगळ्यांचा लाडका माही त्याच्या आयुष्यवर बेतलेला हा सिनेमा अनेकांची मन जिंकून गेला होता.

 

 

सुशांत सिंगने यात धोनीची भूमिका केली होती, यासाठी त्याने घेतलेली मेहनत पडद्यावर दिसली, इतर कलाकारांनी देखील आपल्या भूमिका चोखपणे निभावल्या आहेत.

मुक्काबाझ :

यूपी म्हटलं की फक्त गुन्हेगारी हेच समीकरण बनून गेलं आहे मात्र याच युपीतील प्रत्येक गल्लीत सचिन, धोनी आहेत. यूपी मधील एकूणच सामाजिक वातावरण, जातीभेद, खेळातील राजकरण, स्त्रियांना स्थान नसणे असे अनेक प्रश्न अनुरागने त्याच्या शैलीतून मांडले आहे.

 

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version