' पित्याला स्तनपान करणाऱ्या मुलीची कहाणी आपल्याला प्रेमाची नवी परिभाषा शिकवते – InMarathi

पित्याला स्तनपान करणाऱ्या मुलीची कहाणी आपल्याला प्रेमाची नवी परिभाषा शिकवते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मथळा अश्लील वाटला? गलिच्छ वाटला? स्वाभाविक आहे. आपल्या नैतिकतेच्या चौकटीत हे असं काही बसूच शकत नाही.

पण ही कथा पूर्ण वाचा. कथा संपेपर्यंत तुमचं मत कदाचित बदलेलं असेल.

जागतिक इतिहासामधील सर्वात उत्कंठावर्धक इतिहास कोणता असेल तर तो रोमचा! एकदा का एखादा इतिहास प्रेमी रोमच्या प्रेमात सापडला की त्या दुनियेतून बाहेर येणे कठीणच!

 

roman empire inmarathi

 

जसा रोमचा इतिहास खिळवून ठेवणारा आहे तश्याच अनोख्या संस्कृतीचा वारसा लाभलेल्या रोमच्या कथा देखील आजही जगभरात तितक्याच प्रसिद्ध आहेत.

 

Roman Empire.Inmarathi2

 

Frankfurt & Roma-inmarathi

 

त्यापैकीच एक अनोखी कथा रोमचा इतिहासकार वलेरियस मॅक्सिमस याने आपला ग्रंथ Factorum Ac Dictorum Memorabilium मध्ये नमूद करून ठेवली आहे. ही घटना नेमकी कोणत्या सालामध्ये घडली हे मात्र ठामपणे सांगता येत नाही.

प्राचीन रोमन साम्राज्यातील शिक्षा अतिशय कडक असायच्या. अर्थात, त्यामागे एकच उद्देश होता तो म्हणजे गुन्हेगारांवर, अपराध्यांवर जरब बसवणे.

एकदा रोमन साम्राज्यातील सायमन नावाच्या म्हाताऱ्याला एका गुन्ह्याखाली मरेपर्यंत अन्न न देण्याची आणि पाणी न देण्याची शिक्षा देण्यात आली.

म्हणजे एक प्रकारे भुकेने आणि तहानेने व्याकूळ होऊन तडफडत त्याचा मृत्यू व्हावा हा त्यामागचा उद्देश होता.

त्याला काळ्याकुट्ट अंधाऱ्या तुरुंगात डांबण्यात आले, भोवती कडक पहारा असल्याने तो तेथून निसटूही शकत नव्हता.

 

roman-story-marathipizza01

 

त्या म्हाताऱ्याला एक मुलगी होती, तिचे नाव होते पेरु! तिने राजाकडे विनंती केली की,

माझ्या वडिलांचे खूप वय झाले आणि त्यातच तुमच्या शिक्षेमुळे ते जास्त दिवस जगू देखील शकणार नाहीत, म्हणून मला त्यांना रोज भेटण्याची परवानगी द्यावी.

राजाने देखील मोठ्या मनाने तिची ही विनंती मान्य केली. परंतु दर वेळी म्हाताऱ्याला ती भेटायला आली की तिची नीट तपासणी करण्याचा आदेशही दिला, जेणेकरून तिने आपल्या वडिलांसाठी चोरून अन्न आणू नये.

राजाच्या सांगण्याप्रमाणे रोज पेरूची झडती घेतली जाई आणि मगच तिला आपल्या म्हाताऱ्या वडिलांना भेटण्यासाठी आत सोडले जाई.

 

roman-story-marathipizza02

हे ही वाचा –

 

असे अनेक दिवस सुरु राहिले. जेलरला वाटले की एव्हाना भुकेमुळे आणि तहानेमुळे व्याकूळ झालेला म्हातारा मरणाच्या दारावर पडला असेल. आज त्याला शिक्षा देऊन तीन आठवडे उलटले होते.

त्यामुळे त्याची अवस्था पाहण्यासाठी जेलरने आत डोकावले, पण जेव्हा त्याने म्हाताऱ्या सायमनला पाहिले तेव्हा मात्र त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.

काहीही न खाता-पिता तीन आठवड्यानंतर हा माणूस मरणाची भिक मागताना दिसायला हवा होता. तो काहीसा अशक्त वाटत होता खरा, पण एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे नीट ही वाटत होता.

जेलरला सायमनच्या मुलीवर शंका आली. ती दररोज आपल्या नजरेआड त्याला खायला देते असे त्याला वाटले.

त्यांना रंगेहात पकडावे म्हणून तो त्या दिवशी एका कोपऱ्यात लपून बसला, जेथून त्याला सायमन आणि त्याची मुलगी पेरू व्यवस्थित दिसू शकणार होते.

थोड्याच वेळात पेरू आत आली. काही वेळ गप्पा गोष्टी केल्यावर ती चलाखीने पहाऱ्यावरच्या सैनिकांना दिसणार नाही अश्या रीतीने त्यांच्याकडे पाठ करून बसली.

तिने हळूच आपल्या छातीवरचे वस्त्र दूर केले आणि म्हातारा सायमन तिचे स्तनपान करू लागला…

 

roman-story-marathipizza03

 

एखादी आई कशी आपल्या लहानग्या बाळाला आपले दुध पाजते त्याचप्रकारे अगदी मायेने पेरू आपल्या म्हाताऱ्या वडिलांना दूध पाजत होती.

हा सगळा प्रकार पाहून जेलरच्या पायाखालची जमीन सरकली. एका पिता-पुत्रीकडून असा प्रकार त्याला कधीच अपेक्षित नव्हता.

त्याने तडक जाऊन दोघांना त्याच स्थितीमध्ये रंगेहात पकडले आणि पेरूला देखील तुरुंगात डांबले.

ही गोष्ट वणव्यासारखी संपूर्ण राज्यात पसरली. लोक पेरू आणि तिच्या वडिलांची छी थू करू लागले. जेव्हा राजालाही गोष्ट कळली तेव्हा त्याचाही राग अनावर झाला.

पिता पुत्रीच्या नात्याला कलंक लावणारा हा प्रकार तो आपल्या साम्राज्यात सहन करू शकत नव्हता. सैनिकांनी लागलीच पेरु आणि तिच्या म्हाताऱ्या वडिलांना राजासमोर उभे केले. दरबारात उपस्थितीत सामान्य जनतेने देखील दोघांना कडक शासन करण्याची मागणी राजासमोर केली.

राजाने देखील दोघांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आणि शिक्षेचा दिवस जाहीर केला.

पण याच घोळक्यात एक दुसरा गट होता, जो या प्रकरणाकडे वेगळ्या नजरेने पाहत होता. त्यांच्या दृष्टीने पेरूने जे काही केले ते आपल्या वडिलांवर असणाऱ्या मायेपोटी केले. स्वत:च्या वडिलांना भुकेने, तहानेने तडफडत मरताना पाहणे तिला शक्य वाटले नसेल म्हणून तिने हा वेगळा मार्ग निवडला असेल. त्यात गैर काही नाही.

असे मत या गटाने मांडले. या गटाची ही बाजू ऐकून उर्वरित लोक देखील सकारात्मक नजरेने या प्रकरणाकडे पाहू लागले. पेरु आणि तिच्या वडिलांचे चारित्र्य स्वच्छ असल्याची जाणीव त्यांना झाली.

जे काही घडले ते केवळ परिस्थितीमुळे त्यामुळे त्यात पेरू किंवा सायमनची काहीही चूक नाही असे म्हणून आता संपूर्ण जनता राजापुढे दोघांना माफ करण्याची विनंती करू लागली.

पेरू आणि म्हाताऱ्या सायमनच्या शिक्षेच्या दिवशी जनता रस्त्यावर उतरली. त्यांच्या समर्थनार्थ नारे देऊ लागली. लोकांचा शिक्षेला वाढता विरोध पाहून अखेर राजानेही नमते घेतले आणि केवळ पेरूला माफ केले असे नाही तर म्हाताऱ्या सायमनला देखील शिक्षेमधून मुक्त केले…!

अशी ही प्राचीन रोममधील कहाणी! जी वडील आणि मुलीच्या नात्यामधील अनोख्या प्रेमाची साक्ष देते आणि चूक आणि बरोबर, नैतिक आणि अनैतिक यांची नेमकी व्याख्या काय असा गहन प्रश्न उभा करते! 


हे ही वाचा –

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?