Site icon InMarathi

या महिलांनी दाखवलाय बुरख्यापलिकडचा कर्तव्यदक्ष चेहरा!! वाचा

makka inmarathi final

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

बायकांनी फक्त चूल आणि मुलं बघावं ही संकल्पना कधीच मागे पडली आहे. आज महिला घराबाहेर पडून वेगवेगळ्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे. एकीकडे घर, दुसरीकडे काम यातला समतोल साधणं ही खरं तर तारेवरची कसरत असते. मात्र काही महिला अत्यंत चोखपणे दोन्हीकडे आपली भूमिका बजावत असतात.

 

 

आज आपल्याकडे काही मंदिरात महिलांना प्रवेश घेण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागते, आजही धार्मिक कार्य पुरुषांनीच करावी असा नियम आहे, मात्र आता काही महिला देखील पौरोहित्य करण्यासाठी पुढे येत आहेत.

मुस्लिम समाजानेसुद्धा महिलांना धर्मात स्थान देण्यासाठी कंबर कसली आहे, मक्का मदिना ही मुस्लिम बांधवांची पवित्र यात्रा असते. आयुष्यात एकदा तरी ही यात्रा करावी असे प्रत्येक मुस्लिम बांधवाला वाटत असते. जगभरातून अनेक मुस्लिम लोक यात्रेत येतात. याच यात्रेच्या सुरक्षेची जबाबदारी यावेळी महिलांच्या खांद्यावर होती. 

 

 

आज आपल्याकडील मुस्लिम समाज हा जवळजवळ प्रत्येक राज्यात आहे, प्रत्येक राज्यानुसार त्या त्या मुस्लिम समाजाचे काही नियम चालीरीती आहेत. काही मुस्लिम घरात फार मोकळे वातारण दिसून येते तर काही मुस्लिम समाज आजही इस्लामला अनुसरून आपले जीवन जगतोय.

आज मुस्लिमबहूल असणाऱ्या देशात महिलांवर अनेक निर्बंध लावले जातात. मध्यंतरी पाकिस्तानातील एक महिला प्रशासकीय सेवेची परीक्षा देऊन त्यात उत्तम मार्क पडून अधिकारी बनली.

 

 

मक्का मदिना ही यात्रा ज्या देशात होते तिथे महिलांना आपल्याइतके स्वातंत्र्य नक्कीच नाही, पण हळूहळू तिकडचे सरकार सुद्धा आता महिला सक्षमीकरणावर भर देत आहे असे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी साधं घराबाहेर पडण्यासाठी महिलांना बुरखा घालावा लागत असे, शिक्षणावर बंदी असे, मात्र आता महिलांसाठी अनेक क्षेत्रात नोकरीच्या संधी दिल्या जात आहे.

महिला सुरक्षा अधिकारी :

मक्का मदिनेच्या सुरक्षेसाठी महिला आपल्याला खाकी अवतारात दिसून येत आहेत. ज्या देशात महिलांना कपडे परिधान करण्याबाबतीत नियम होते तिथे या महिला खाकी जाकीट, पायघोळ पॅन्ट, केस आणि तोंड झाकण्यासाठी काळे कापड अशा अवतारात महिला खंबीरपणे आपली जवाबदारी पार पाडत आहेत. 

 

 

सोशल मीडिया, इंटरनेटवर हे फोटोस मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंचं कौतुक जगभरात केले जात आहे तसेच महिला सक्षमीकरणाचे बदल होताना दिसून येत आहेत, अशी चर्चा देखील समाजमाध्यमात होत आहे.

व्हिजन २०३० :

आज सौदी अरेबियामध्ये असे धाडसी पावलं उचलण्यामागे तिकडच्या प्रिन्स मोहंमद बीन सलमानचा हात आहे. सौदीमध्ये सलमान अनेक सामाजिक आणि आर्थिक बदल करत आहे. महिलांवर असणारे अनेक निर्बंध त्याने हटवले आहेत. या मिशनला त्याने व्हिजन २०३० असे नाव दिले आहे.

 

कोव्हीड नियम पळून यात्रा:

मागच्या वर्षी आलेल्या कोरोना या आजराने अनेक गोष्टीवर निर्बंध आले होते त्यामुळे गेल्या वर्षी मक्का यात्रेला केवळ एक हजार लोकांना परवानगी दिली होती. यंदा ही कोव्हीडने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने त्यांनी सुद्धा यात्रेसाठी नियमावली केली होती. लसीकरण झालेल्या १०,००० व्यक्तींनी ही यात्रा पूर्ण केली आहे. 

 

 

लष्करी प्रशिक्षण:

मक्का मदिनेमध्ये जरी काही हजार लोक येणार असतील तरी सुद्धा कोणत्याही प्रकराचा गोंधळ उडू नये किंवा यात्रेमध्ये गर्दी होऊ नये यासाठी महिलांना एप्रिल महिनापासूनच लष्करी प्रशिक्षण देण्यात आले होते. एकूण ११३ महिलांना तैनात करण्यात आल्या होत्या.

सौदी अरेबिया सरकारने टाकलेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे, खऱ्या अर्थाने आता म्हणता येईल की वर्षानुवर्षे असलेल्या अनिष्ट चालीरितींचा बुरखा आता हळूहळू दूर होत आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version