Site icon InMarathi

भारतीय क्रिकेटचा सर्वात मोठा चाहता ‘सुधीर कुमार चौधरी’ बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी!

sudhir-kumar-marathipizza00

sanjeevnitoday.com

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारतातील क्रिकेटवेड शब्दांत वर्णन करणं अशक्य आहे. क्रिकेटवेडा मनुष्य या खेळाबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी काय काय करेल हे देखील सांगता येत नाही. अश्या कट्टर क्रिकेटभक्तांचं नेतृत्व करतो ‘सुधीर चौधरी’!

संपूर्ण अंगावर तिरंगा रंगवून घेणारा असा फॅन लाभणे हे भारतीय क्रिकेटचे सौभाग्य म्हणावे लागेल. सोबतच त्याच्या शरीरावर लिहिलेलं तेंडूलकर हे नाव देखील तो क्रिकेटच्या देवाचाही सर्वात मोठा भक्त असल्याचा दाखला देण्यास पुरेसं आहे. अश्या या अवली चाहत्याबद्दल काही अश्या हटके गोष्टी जाणून घेऊया ज्या सिद्ध करतील की हो, तोच आहे भारतीय क्रिकेटचा आणि सचिन तेंडूलकरचा सर्वात मोठा अस्सल चाहता!

itimes.com

सचिन चौधरीचा सर्वात मोठा भारतीय क्रिकेटचा आणि सचिन तेंडूलकरचा चाहता होण्याचा प्रवास सुरु झाला २००२ साली, जेव्हा सचिनने कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर ३६ धावा केल्या होत्या. तेव्हापासून तो भारतीय क्रिकेट आणि सचिन तेंडूलकर यांना चीअर करण्यासाठी नेहमी प्रेक्षकांमध्ये दिसू लागला. जणू तेच त्याने आपल्या जगण्याचे ध्येय बनवले होते.

२००३ साली भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँड यांच्यादरम्यान तिरंगी मालिका खेळवण्यात येणार होती. ही संपूर्ण मालिका पाहण्यासाठी सुधीर हा बिहारच्या मुझ्झफरनगरहून मुंबई पर्यंत १७०० किमी दूर सायकलने येऊन पोचला. हा संपूर्ण प्रवास पूर्ण करण्यासाठी त्याला ३ आठवडे लागले. हे सर्व कष्ट झेलण्यामागे त्याचं एकच ध्येय होतं ते म्हणजे सचिनची भेट घेणं!

scoopwhoop.com

याचवेळी त्याला खबर मिळाली की सचिन प्रेस कॉन्फरन्ससाठी ट्रायडेंट हॉटेलमध्ये येणार आहे. सुधीर तेथे गेला आणि सचिनला पाहताच त्याने त्याच्या पायाशी लोळण घेतली. आपल्या चाहत्याचे असे प्रेम पाहून सचिन देखील गहिवरला, त्याने सुधीरला आपल्या घरी जेवायला येण्याचे आमंत्रण दिले.

सुधीर दरवर्षी मुझ्झफरनगरच्या प्रसिद्ध लीचीचे १००० पीस घेऊन सचिनच्या घरी जातो, सचिन देखील स्वत:वरच्या प्रेमाची परतफेड म्हणून संपूर्ण भारतभरात कुठेही भारताचा सामना असला की सुधीरच्या तिकीटाची व्यवस्था करतो.

प्रत्येक सामान्यावेळी सचिन आणि भारतीय टीमला चीअर करण्यासाठी उपस्थित राहता यावे म्हणून सुधीरने आजवर ३ नोकऱ्या सोडल्या आहेत.

IPL मध्ये सुधीर मुंबई इंडियन्सला सपोर्ट करतो, कारण सचिन तेंडूलकर देखील याचं टीमचा भाग आहे ना!

mensxp.com

दरवेळी सचिनला पाहताच सुधीर त्याच्याकडे धाव घेत असे. यामुळे अनेकदा त्याला पोलिसांचा मार देखील खावा लागला आहे, पण प्रत्येक वेळी सचिनच्या मध्यस्थीमुळे तो अश्या प्रसंगातून सहीसलामत सुटला आहे.

२०११ चा वर्ल्डकप भारताने जिंकावा यासाठी सुधीरने आपल्या डोक्यावर वर्ल्डकपचा रेप्लिका बनवला होता आणि तो भारतासाठी लकी देखील ठरला असेच म्हणावे लागेल कारण त्या वर्षी भारताने वर्ल्डकप जिंकला. स्वत: सचिनने सुधीरला ड्रेसिंग रुममध्ये बोलावून वर्ल्डकप त्याच्या हातात दिला होता.

cricketcountry.com

३३ वर्षीय सुधीर याचने अजूनही लग्न केलेलं नाही. कारण त्याला आयुष्यभर भारतीय क्रिकेटचा चाहता बनून राहायचं आहे. या मागे त्याची हीच भावना आहे की आपल्या या क्रिकेट प्रेमापायी एखाद्या मुलीचं आयुष्य बरबाद व्हायला नको.

जेव्हापासून सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे तेव्हापासून आपल्या शरीरावर सचिन तेंडूलकर असे न लिहिता तो ‘मिस यु तेंडूलकर’ असे लिहितो.

तसेच अजून एक गोष्ट जी बऱ्याच जणांना माहित नाही ती म्हणजे सुधीरने आपल्या डोक्यावरचे केस देखील भारतीय नकाशाच्या आकारात कापलेले आहेत.

1.uspa24.com

अखेरच्या श्वासापर्यंत भारतीय क्रिकेट ला चीअर करत राहण्याची जणू भीष्मप्रतिज्ञा घेतलेल्या या अवलियाला सलाम!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version