आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कोणत्याही देशाचा पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष हा कडक सुरक्षेत असतो. दिवसरात्र आजूबाजूला सुरक्षासेवकांचा गराडा असतानाही अनेकदा अशा काही दुर्दैवी घटना घडतात की हे घडलंच कसं असावं? हा प्रश्न पडतो.
अशीच घटना घडली ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत. आजही त्यांच्याबाबतीत जे घडलं त्या रहस्याची उकल होऊ शकली नाही.
भारतात ज्याप्रमाणे लालबहाद्दुर शास्त्री आणि सुभाषबाबू यांच्या मृत्यूचं रहस्य आज इतक्या वर्षांनंतरही उलगडलेलं नाही तशीच एक घटना ऑस्ट्रेलियन पंतप्रधान हॅरोल्ड होल्ट यांच्याबाबतही घडली.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे ही वाचा – साऱ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या ‘शास्त्रींच्या’ मृत्यूमागचं हे गूढ अजूनही कायम आहे!
–
गायब झालेले आणि आजही त्यांचं पुढे काय झालं? हे प्रश्न चिन्ह असणारे हॅरोल्ड होल्ट बेपत्ता आहेत. १९६६ मधे हेरॉल्ड होल्ट हे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बनले. रॉबर्ट यांच्या निवृत्तीनंतर हेरॉल्ड पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.
तरूण वयातच राजकारणात प्रवेश केलेले हेरॉल्ड झपाट्यानं वर चढत जात अखेर पंतप्रधान बनले होते. पदाची शपथ ग्रहण करताना त्यांनी स्पष्ट केलेलं होतं की मला अतिरिक्त सुरक्षेची गरज नाही.
देशातील सामान्य नागरिकांप्रमाणेच मला रहायचं आहे. पंतप्रधान आहे म्हणून सुरक्षासैनिकांचा ताफा बाळगणं त्यांना अनावश्य तर वाटत होतंच शिवाय देशातील सामान्य नागरिकांहून उगाचच फ़टकून राहिल्यासारखं वाटत असे.
लोकांत मिळून मिसळून काम करणारा नेता अशी प्रतिमा त्यांना आवडत असल्यानं त्यांनी कायमच सुरक्षा नाकारली. मात्र १९६६ च्या मध्यावर घडलेल्या दोन घटनांनी त्यांना त्यांचं हे मत बदलणं भाग पडलं.
त्यांच्या कार्यालयाची एक काचेची खिडकी अज्ञात स्नायपरनं अक्षरश: चुरा करून टाकली होती. त्यानंतर होल्ट यांच्या एका सहकार्याच्या हत्येचा प्रयत्न केला गेला. या हल्ल्यात होल्टचा सहकारी गंभीररित्या जखमी झाला.
जे हल्ला करत होते त्यांचा हेतू स्पष्टच होता आणि कोणत्या थराला जाऊन ते हल्ले कात होते हेही स्पष्ट होतं. अखेर होल्ड यांनी सुरक्षा घेण्यास मान्यता दर्शविली मात्र ही सुरक्षा स्विकारताना त्यांनी सुट्टीवर असताना सुरक्षा रक्षकांचा ताफा बाळगणार नाही हेही स्पष्ट केलं.
याचं कारण देताना त्यांनी खाजगी जीवनात कोणाचिही ढवळाढवळ, उपस्थिती नको असल्याचं कारण दिलं. पंतप्रधान म्हणून सतत प्रकाश झोतात काम करत असताना खाजगी क्षणांत तरी कोणी लक्ष ठेवणारं नको असं त्यांनी स्पष्ट केलं.
होल्ड यांना समुद्र किनारी रहायला खूप आवडत असे. अनेक समुद्र किनार्यांवर त्यांची घरण होती. समुद्राच्या लाटांशी त्यांचा विशेष स्नेह होता. स्पियर फिशिंग आणि फ्री डायव्हिंगची त्यांना आवड होती आणि कामातून विरंगुळा म्हणून ते नियमितपणे समुद्रावर जात असत.
गंमत म्हणजे, अंडरवॉटर डायव्हिंगमधे निपूण असणारे होल्ट पाण्यावर इतरांसारखे सफाईने पोहू मात्र शकत नसत. त्यांच्या उणिवेमुळे काही अपघातही झाले होते. एक दोनदा त्यांना बुडताना वाचविण्यात आलं होतं.
एरवी तब्येतिनं एकदम ठणठणीत असणार्या होल्टना कसलिही व्याधी नव्हतीच मात्र लहानपणी फुटबॉल खेळताना झालेल्या अपघातामुळे त्यांचा डावा खांदा अधूनमधून त्रास देत असे.
होल्ट बेपत्ता झाले त्याच्या काही दिवसच आधी त्यांनी या त्रासामुळेच डॉक्टरना भेट दिलेली होती आणि या तपासणीनंतर डॉक्टरनी त्यांना टेनिस आणि पोहणे या दोन्ही प्रकारांसाठी मज्जाव केलेला होता.
होल्ट गायब होण्यापूर्वी दोन दिवस आधी त्यांची एक महत्वाची कॅबिनेट मिटिंग होती. जी रात्री उशिरा चालू होऊन पहाटेपर्यंत चालली होती. मिटिंगनंतर त्यांनी सकाळी साडे आठला एक पत्रकार परिषदही घेतली आणि त्यानंतर ते त्यांच्या हॉटेलवर गेले. त्यानंतर ते आपल्या घरी परतले.
घरी आल्यावर त्यांनी आपल्या केअरटेकरला सांगितलं की, विकेंडसाठी ते बिचहाऊसवर जाणार आहेत. हेही काही नविन नव्हतंच. जेंव्हा जेंव्हा होल्ट कामानं कंटाळत तेंव्हा ते बिचहाऊसवर रहायला जात असत बहुतेकदा त्यांच्यासोबत त्यांचे खास मित्रही असत.
बिचहाऊसवर गेल्यानंतर दुसर्या दिवशी त्यांनी स्थानिक जनरल स्टोअरला भेट देऊन काही रोजच्या गरजेच्या वस्तू विकत घेतल्या. त्यानंतर होल्ट आणि त्यांचे चार मित्र पॉईंट नेपोलियनला गेले, ज्याठिकाणी त्यांनी थोडावेळ मासेमारी केली. त्यानंतर सगळे घरी परतायच्या तयारीला लागले.
मात्र होल्ट बिचवरच रेंगाळत असलेलं पाहिलं. यावेळेस दुपारचे सव्वाबारा वाजले होते. घरी जाण्याऐवजी थोडा वेळ अजून समुद्रावर घालविण्याची कल्पना त्यांनी मांडली. समुद्र शांत होता आणि वातावरही प्रसन्न होतं त्यामुळे त्यांनी पोहण्याचा प्रस्ताव मांडला. या बिचवर ते पूर्वीही अनेकदा आले असल्यानं इथल्या प्रवाहाशी ते परिचित होते.
इथे अनेकदा पोहलेले असल्यानं या पाण्यात काही धोका नसल्याची त्यांची खात्री होती. सगळेजण सुट्टीच्याच मूड असल्यानं घरी जाण्याचं रहित करून सगळे पाण्यात उतरले.
मित्रांची अशी धमाल चाललेली असतानाच अचानक होल्ट त्यांच्यापासून दूर जाऊ लागले इतर मित्रांच्या डोळ्यादेखत बघता बघता ते पाण्यात आत ओढले गेले आणि नजरेसमोरून गायब झाले.
अचानक घडलेल्या या घटनेचा होल्ट यांच्या मित्रांना याचा इतका धक्का बसला होता की डोळ्यासमोर जे घडत आहे ते खरं आहे याचं भान यायलाही त्यांना काही मिनिटांचा वेळ लागला.
–
हे ही वाचा – १७ वर्षाच्या ह्या मुलाचा ‘जगावेगळा’ विक्रम पाहून भल्याभल्यांची “झोप” उडाली आहे…!
–
पाण्यात आत जाऊन होल्ट यांचा शोध घ्यावा की बाहेर येऊन मदत मागावी हेच कळत नव्हतं. त्यातून किनार्यावरही कोणिच नव्हतं. मित्र जरी पोहण्यात तरबेज असले तरीही खोल समुद्रात तळाला जाऊन जो शोध घ्यावा लागतो ते पोहण्याचं कौशल्य त्यांच्याकडे नव्हतं.
अखेर सगळेजण धक्क्यातून सावरत कसे बसे किनार्यावर आले आणि त्यांनी व्हिक्टोरिया पोलिसांशी संपर्क साधला.
देशाचे पंतप्रधान पाण्यात वाहून गेले ही काही साधीसुधी घटना नव्हती. घटना घडल्यानंतर अर्ध्या पाऊण तासातच पोलिसांची मदत तुकडी तातडीनं बीचवर आली आणि तीसजणांच्या बचाव टीमनं त्यांचं काम चालू केलं.
दरम्यान अनेक हेलिकॉप्टर्स, ऑस्ट्रेलियन नेव्ही, व्यावसायिक डायव्हर्स यांचे ताफेच्या ताफे बचाव कार्यात सहभागी झाले. चोविस तास अथक प्रयत्नांनंतरही काहीही साध्य झालं नाही. ही शोध मोहिम आठवडाभर राबविण्यात आली.
या घटनेत काही दगा फटका तर नाही ना? याची कसून तपासणी करण्यात आली. मात्र या चौकशीतही हाती काहीच लागलं नाही. त्यानंतर मात्र हा अपघाती मुत्यू असल्याचं घोषित करण्यात आलं. ही गोष्ट इथेच संपत नाही.
होल्ट यांच्या आकस्मात गायब होण्यानं अनेक तर्क आणि चर्चांचा जन्म दिला. काहींच्या मते ते पाण्यात बुडले आणि त्यांना समुद्रातील जेलिफिशसारख्या माशानं गिळून टाकलं. काहींच्या मते होल्ट यांनी जाणीवपूर्वक आत्महत्या केली मात्र हा दावा त्यांच्या पत्नी आणि निकटवर्तियांनी खोडून काढला.
होल्ट हे आपल्या जिवनात आनंदी आणि समाधानी असल्यानं आत्महत्येसारखं पाऊल उचलण्यासाठी त्यांच्याकडे कारण नसल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतरचा एक तर्क म्हणजे, होल्ट हे वास्तवात चीनचे हेर होते आणि ते चीनला परतले, त्यानंतर ओळख बदलून ते कायमचे चीनमधेच राहिले.
या तर्काला धरूनच आणखिन एक तर्क जास्त चर्चिला गेला आणि तो म्हणजे, होल्ट यांचं चीनच्या सबमरीनने अपहरण केलं.
काही वर्षं या चर्चांना नविन रंग चढत गेले मात्र यापैकी एकही दावा सिध्द होऊ शकला नाही आणि आजही होल्ट यांच्या बेपत्ता होण्याचं रहस्य तसंच कायम राहिलं आहे.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
—
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.