Site icon InMarathi

माध्यमांच्या बेजबाबदार पत्रकारितेवर उमेश कामत करणार कायदेशीर कारवाई!!!

umesh kamat feature inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

भारताने लोकशाही स्वीकारली आहे मात्र लोकशाहीने भारतासारख्या देशाला स्वीकारले आहे का? असा सवाल एकूणच आज देशात चाललेल्या परिस्थितीवरून अनेकांच्या मनात येत असेल. आज आपली लोकशाही चार स्तंभावर उभी आहे मात्र त्यातील चौथा स्तंभ हल्ली जास्तच ढासळत चालला आहे.

 

 

उमेश कामत या गुणी मराठी अभिनेत्याला हिंदी पत्रकारांच्या निष्काळजीपणमुळे नाहक त्रास भोगावा लागत आहे. या संदर्भातील पोस्ट स्वतःच्या फेसबुक अकॉउंटवरून टाकली आहे.

नक्की प्रकरण काय?

शिल्पा शेट्टी या अभिनेत्रीच्या पतीला नुकतंच पॉर्न फिल्म विकल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर शिल्पाचे पती राज कुंद्रा यांचा जबाब घेण्यात आला. ज्यात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची देखील नाव सांगितले तसेच त्याचे पर्सनल मोबाईल आणि व्हॉट्सअॅप चेक करण्यात आले.

 

 

उमेश कामतचा उल्लेख का?

राज कुंद्रा याचे जेव्हा व्हॉट्सअॅप चेक करण्यात आले, तेव्हा या प्रकरणाशी संबंधित असलेला एक माणूस होता ज्याचे नाव होते उमेश कामत. माध्यमांच्या हाती जेव्हा हे चॅट लागले, तेव्हा त्यांनी लगेच आपल्या चॅनेलवर दाखवण्यास सुरवात केली, इथपर्यंत ठीक होतं. त्यापुढची हद्द म्हणजे राज कुंद्रासोबत उमेश कामातच फोटोदेखील माध्यमांनी दाखवला.

 

 

कोणत्याही प्रकराची माहिती न घेता चॅनेल उमेश कामतसारख्या सेलिब्रेटीचा फोटो चॅनेलवर दाखवून किती टीआरपी मिळवला त्यांचं त्यांनाच माहिती, मात्र ज्या प्रकरणाशी सुतराम संबंध नसताना केवळ व्यक्तीचे नाव सारखे आहे म्हणून चॅनेलने फोटो वापरणे पत्रकारितेच्या कोणत्या नियमात बसते हे चॅनेलचे सांगावे.

नाव कमवायला वर्ष लागतात, मात्र तेच खराब व्हायला थोड्याशा अवधीची सुद्धा गरज नसते. गेलेली इज्जत परत येत नाही, असले संवाद आपण अनेक वर्षांपासून थोरामोठ्यांकडून ऐकत होतो. या प्रकरणात आपली कोणतीही चूक नसताना दुसरा कोणीतरी आपल्या चारित्र्याचे असे धिंडवडे काढतो आहे हे कोणता माणूस बघू शकतो?

 

 

उमेश कामतने आपला संताप पोस्टमधून व्यक्त केला, त्याच्या पाठीशी आज मराठीतले अनेक कलाकार उभे राहिले आहेत. उमेशने पोस्टमध्ये असे पुढे म्हंटले आहे की ‘वैयक्तिक आणि सामाजिक नुकसानीला चॅनेलच जबाबदार राहील’. उमेश आता पुढे कायदेशीर कारवाई  करणारच आहे हे तो पोस्टद्वारे सांगतोच आहे. पण झालेल्या प्रकारामुळे एकूणच लोकांमध्ये उमेशबद्दल गैरसमजूत तर नक्कीच होणार.

सध्या अजिंक्य रहाणेच्या एका जुन्या ट्विटवरून त्याला ट्रोल केले जात आहे. ते ट्विट राज कुंद्रा यांच्या संदर्भातील असल्याने लोक त्यावरून ट्रोल केले जात आहे.

 

 

हिंदी पत्रकारिता फक्त आक्रमक होऊन चालत नाही तर विषयांची सखोल आणि निष्पक्ष मांडणी हवी. विषयाला आपल्याला हवा तसा अँगल देऊन आपली पोळी भाजून घेण्याचे प्रकार सध्या एकूणच सर्व चॅनेलमध्ये चाललेले आहेत.

सावकरांना देशद्रोही मानून त्यावर कार्यक्रम करणारे चॅनेलवाले मराठीत सुद्धा आहेत. कित्येकदा मराठी बातम्यांमध्ये मराठी व्याकरणाचे वाभाडे काढलेले दिसून येतात. चॅनेलमधील निवेदक आपल्याच मायमराठी भाषेतुन बातम्या देताना अडखळतात, शब्द शुकीचे उच्चारतात.

चॅनेल मात्र अशा लोकांना सांभाळून घेतात आणि सामान्य माणसाने मास्क घातला नाही तर लगेचच त्याची बातमी करून आपल्या चॅनेलवर दाखवतात.

 

हे ही वाचा – कुवत नसतानाही(?) परीक्षकाची खुर्ची: रीऍलिटी शोजच्या थिल्लरपणावरील खरमरीत उत्तर

पत्रकारितेची मुख्य काम असतात ती म्हणजे माहिती घेणे, जागृत करणे आणि मनोरंजन करणे, मात्र या तिन्ही कामात आजची पत्रकारिता मागे पडत आहे. माहिती ऐवजी लोकांना फक्त घाबरवणायचे काम कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणावर केले आहे.

टिळकांनी १०० वर्षपूर्वी पत्रकारिता सुरु करून सरकारला डोके ठिकाणावर आहे का? असं ठणकावून विचारलं होत मात्र आताची परिस्थिती बघता आता पत्रकारांचे डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल विचारायची वेळ आली आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version