Site icon InMarathi

सत्यजित रे यांचा The Alien चित्रपट कधीही न बनण्यामागचं हॉलीवूड कनेक्शन!

the alien-marathipizza00

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सत्यजित रे हे २० व्या शतकामधील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक मानले जातात. केवळ बॉलीवूडचेच नाही तर हॉलीवूडचे दिग्दर्शक देखील त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यापुढे ठेवतात. Steven Spielberg आणि Martin Scorsese सारखे आजच्या घडीला नावाजलेले दिग्दर्शक देखील सत्यजित रे यांच्या चित्रपटांचे फॅन आहेत. सत्यजित रे यांनी बनवलेल्या सर्वच्या सर्व ३६ चित्रपटांचा आस्वाद घेणे म्हणजे अस्सल चित्रपट रसिकासाठी पर्वणीच ठरते.

त्यांच्यात दिग्दर्शक गुण किती ठासून भरले होते याची साक्ष देतो त्यांचा पहिलाच चित्रपट- पाथेर पांचाली! या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांनी ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते. जागतिक सिनेजगतात नवीन दिग्दर्शक या चित्रपटाचा आवर्जून अभ्यास करतात.

obituarytoday.com

तर अश्या या हरहुन्नरी दिग्दर्शकाने १९६७ साली The Alien नावाचा एक चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेस भारतामध्ये अश्या प्रकारची साय-फाय फिल्म बनवण्यासाठी आवश्यक संसाधने नव्हती, म्हणून सत्यजित रे यांनी हॉलीवूडच्या मदतीने हा चित्रपट बनवण्याचा विचार केला. या फिल्मची स्क्रिप्ट स्वत: सत्यजित रे यांच्या लेखणीमधून उतरली होती. फिल्मचं प्रोडक्शन कोलंबिया पिक्चर्स या हॉलीवूड स्टुडियोच्या अंतर्गत होणार होतं. परंतु सगळी तयारी होऊन देखील हा चित्रपट कधीच बनला नाही हे दुर्दैव!

असं न होण्यामध्ये अनेक कारणे सांगितली जातात, अनेक दावे केले जातात, त्यापैकी काहीतर निव्वळ अफवा आहेत. पण आज आपण जाणून घेऊया ते कारण जे सर्वमान्य आहे.

pinterest.com

सत्यजित रे यांच्या या चित्रपटाची स्क्रिप्ट बंकूबाबुर बंधू या बंगाली कथेवर आधारित होती. ही कथा देखील सत्यजित रे यांनीच लिहिली होती आणि एका मासिकाने ती प्रकाशित देखील केली होती. त्या काळी या कथेला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. तेव्हाच्या काळात विज्ञान कथा वाचणारा वाचक वर्ग मोठ्या प्रमाणावर होता. दरवेळी एलीयन येतात आणि पृथ्वीवर हल्ला करतात, अश्या धाटणीच्या कथा वाचायला लोकांना कंटाळा येऊ लागला होता. परंतु सत्यजित रे यांची बंकूबाबुर बंधू ही कथा मात्र एलीयन आणि एका मुलगा यांच्या मैत्रीची होती. त्यामुळेच वाचकांना ती प्रचंड भावली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कथेला लाभलेली प्रसिद्धी पाहून सत्यजित रे यांनी याचं कथेमध्ये बदल करून The Alien ची कथा लिहिली. या चित्रपटात हॉलीवूडमधील त्या काळाचे सुपरस्टार मार्लोन ब्रँडॉ, पीटर सेलर्स आणि जेम्स कुबार्न मुख्य भूमिका करणार होते आणि हा चित्रपट प्रोड्यूस करणार होते माइक विल्सन! कथा ऐकताक्षणीच त्यांनी या चित्रपट निर्मितीमध्ये योगान देण्याचे ठरवले. सर्व काही सुरळीत जुळून आलं होतं. एक नावाजलेला भारतीय दिग्दर्शक चक्क हॉलीवूड चित्रपट बनवणार होता, परंतु माशी तेव्हा शिंकली जेव्हा माइक विल्सन यांनी चित्रपटाची कथा स्वत:च्या आणि सत्यजित रे यांच्या नावाने कॉपीराईट करून घेतली.

sundaytimes.lk

या कॉपीराईट मध्ये माइक विल्सन यांचे नाव केवळ contributor च्या रुपामध्ये होते, परंतु काही दिवसांनी सत्यजित रे यांना कळले की माइक विल्सन यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट अनेक लोकांना पाठवली आहे, त्यांनी हे यासाठी केले कारण त्यांना हा चित्रपट एखाद्या हॉलीवूड दिग्दर्शकाने बनवावा असे वाटत होते. सत्यजित रे यांनी या नंतर The Alien चित्रपटासाठी अनेक हातपाय मारले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. माइक विल्सन यांनी माघार घेतली आणि चित्रपट बनवण्यास नकार दिला.

पुढे १९८२ साली स्टीवन स्पीलबर्ग यांचा E.T. the Extra-Terrestrial हा चित्रपट रिलीज झाला. केवळ सत्यजित रे यांनाच नाही तर ज्यांनी The Alien चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली होती, त्यांना देखील E.T. the Extra-Terrestrial आणि The Alien मध्ये अनेक ठिकाणी साम्य आढळून आले.

fakeassposters.com

स्टीवन स्पीलबर्ग यांनी मात्र या गोष्टीला नकार दिला.

imdb.com

परंतु २०१० साली हॉलीवूडचे दिग्दर्शक Martin Scorsese यांनी स्वत: सांगितले की E.T. the Extra-Terrestrial ची कथा सत्यजित रे यांच्या The Alien च्या कथेशी inspired आहे.
हॉलीवूडचं झालं, पण बॉलीवूडमध्ये देखील The Alien च्या कथेशी साधर्म्य दाखवणारा एक चित्रपट आहे म्हटलं…!

बरोबर ओळखलंत, तो चित्रपट आहे ऋतिक रोशनचा ‘कोई मिल गया’!

lyricsmasti.com

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version