Site icon InMarathi

‘हत्येचा आरोप’ सिद्ध होऊनही, तो कोर्टात चक्क सहीसलामत सुटला कारण…

ram bahaddur thapa case inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“भूत ही लोकांना घाबरवण्यासाठी तयार केलेली एक एक कल्पनिक संकल्पना आहे” असं आपण नेहमीच ऐकत आणि बोलत असतो. काही वर्षांपूर्वी ‘रामसे’ बंधूंनी त्यांच्या सिनेमातून आपल्याला नेहमीच भुताच्या भीतीने घाबरवलं आहे.

काही सामाजिक संस्था नेहमी भूत, पिशाच्च यांच्यावर प्रबोधन करत असतात. पण तरीही भूत या विषयाबद्दल सामान्य माणसाला, लहान मुलांना एक उत्सुकता असतेच, ती म्हणजे “भुतं खरंच असतात का?”

 

 

भूत हा माणसाचा मित्र असू शकतो हा विचार काही वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘भूतनाथ’ सिनेमाने आपल्याला दिला होता. गंमत म्हणून बघतांना लोकांना हा विचार पटला असंही म्हणता येईल. ‘स्त्री’ सिनेमातून भूत सुंदर सुद्धा असू शकतं याचा प्रत्यय लोकांना आला. हे तर झालं सामान्य माणसांचं भुतांबद्दलचं मत.

 

 

विज्ञान, कायदा हे कधीच भूत या संकल्पनेला खतपाणी घालत नाहीत हे नक्की. १९५९ मध्ये मात्र ओरिसा हायकोर्टने एका केसमध्ये असा निर्णय दिला होता ज्यामुळे ‘स्त्री’ भुताने आरोपीची मदत केली असंच लोकांना वाटलं होतं.

काय आहे हे प्रकरण?

एप्रिल १९५८ मध्ये कोलकत्ताच्या ‘चटर्जी ब्रदर्स’ या व्यवसायाचे संचालक जगत बंधू चटर्जी हे ओरिसामधील ‘रासगोविंदपूर’ या ठिकाणी एका ‘एरोस्पेस’च्या आर्थिक व्यवहारासाठी गेले होते. आपल्यासोबत त्यांनी आपला नेपाळी नोकर राम बहादूर थापाला नेलं होतं. कृष्णा चंद्रा या आपल्या मित्राकडे ते रहायला गेले होते.

‘एरोस्पेस’ असलेल्या भागाजवळ आदिवासी लोकांची वस्ती होती. त्या भागात भुतांचा वावर आहे, असं आदिवासी लोकांचं म्हणणं होतं. दर गुरुवारी आणि शनिवारी ही भुतं ‘एरोस्पेस’ जवळ येतात यावर गावकरी लोकांचा पक्का विश्वास होता.

 

 

भूत बघण्याच्या उत्सुकतेपोटी २० मे १९५८ रोजी जगत बंधू चटर्जी, राम बहादूर थापा आणि कृष्णा चंद्रा हे तिघेही मध्यरात्री त्यांच्या घरातून बाहेर पडले. ‘एअरोड्रम’च्या जवळ आल्यावर त्यांना एका ठिकाणी उजेडात कोणीतरी नाचत असल्याचा भास झाला. जगत बंधू आणि राम बहाद्दूर यांना असं वाटलं, की भूत त्या उजेडात नाचत आहेत.

राम बहाद्दूर यांनी तत्परतेने आपलं हत्यार असणारी ‘खुक्ररी’ बाहेर काढली आणि ती हवेत फिरवायला सुरुवात केली.

आदिवासी लोकांपैकी काही महिला (मांझी) या त्याचवेळी ‘मोहुआ’ नावाच्या झाडाखाली ‘मोहुआ’ फुलं गोळा करण्यासाठी जमल्या होत्या. या महिलांनी आपल्या सोबत एक कंदील आणला होता. या महिलांपैकी एका महिलेला खुरकी लागली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. ‘कृष्णा चंद्रा’ हे सुद्धा त्यावेळी जबर जखमी झाले.

 

===

हे ही वाचा – हिंदी शिपायाचं भूत, इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन : १८५७च्या उठावाच्या इंग्रजी स्त्रियांच्या आठवणी

===

‘कृष्णा चंद्रा पॅट्रो’ यांची जखम काही दिवसात बरी झाली. पण, त्या काळात राम बहाद्दूर यांच्यावर एका महिलेच्या खुनाबद्दल सदोष मनुष्यवधाची तक्रार मृत व्यक्तीच्या नातेवाईकाने पोलिसात दिली होती. केस कोर्टात गेली आणि घटनेच्या कलम ३०२, ३२४ आणि ३२६ अन्वये राम बहाद्दूर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पण, त्यावेळी कलम ७९ हा राम बहाद्दूर थापा यांच्या बचावासाठी वापरण्यात आला होता.

७९ कलम काय सांगते?

भारतीय राज्यघटनेच्या ७९ व्या कलमामध्ये, झालेला गुन्हा हा मुद्दाम केला आहे, की अनवधानाने झाला आहे किंवा स्वतःच्या बचावासाठी झाला आहे? हे तपासण्याची तरतूद आहे. या कलमाचा वापर करून राम बहाद्दूर यांना वाचवता येईल असं जगत बंधू चटर्जी यांच्या वकिलाने त्यांना सांगितलं होतं.

“भुताने राम बहाद्दूरवर हल्ला केला आणि मग त्याने बचावासाठी लाठीमार केला” असा युक्तिवाद जगत बंधू चटर्जी यांच्या वकिलाने कोर्टात सादर केला आणि निकाल त्यांच्या बाजूने लागला.

 

 

‘ओरिसा सरकार विरुद्ध राम बहादूर थापा’ या नावाने १९६० च्या दशकात ओरिसामध्ये गाजलेल्या या केसचे ‘जस्टीस आर. नर्सिम्हन’ आणि ‘जस्टीस एस बर्मन’ हे दोन न्यायाधीश होते.

उपलब्ध माहिती आणि कागदपत्रांच्या आधारे, दोन्ही न्यायाधीशांनी आपला निर्णय जाहीर केला, की “गुन्हा घडला तेव्हा आरोपी राम बहाद्दूर यांच्या हातात एक बॅटरी होती. ज्याच्या आधारे ते समोर पडलेला उजेड कशाचा आहे? याची शहानिशा करू शकले असते. पण, त्यांनी तसं केलं नाही आणि त्यांनी स्वैर लाठीमार सुरू केला.

स्वतःच्या बचावासाठी कोणत्याही व्यक्तीवर इतक्या क्रूरतेने हल्ला करायच्या आधी त्या व्यक्तीला निदान प्रत्यक्ष बघणं अपेक्षित असतं. पण, हे कोर्ट राम बहाद्दूर थापा यांची घाबरलेली मनःस्थिती आणि बौद्धिक पातळी लक्षात घेऊन त्यांची या केसमधून निर्दोष मुक्तता करत आहे.”

 

 

न्यायालयाच्या निर्णयानंतर भुतांना मानणारा वर्ग हा राम बहाद्दूर थापा यांच्या बाजूने होता. “नोकर व्यक्तीला अशावेळेस जे सुचेल तो ते करेल” असं लोकांचं म्हणणं होतं. लोकांचा राग हा जगत बंधू चटर्जी आणि कृष्णा चंद्रा या सुशिक्षित लोकांवर जास्त होता.

ओरिसा न्यायालयाच्या या निर्णयानंतर कित्येक सामाजिक संस्थांनी सेक्शन ७९ चा दाखला देऊन निर्बल महिलांवर हल्ला झाल्याबद्दल न्यायालयाच्या निर्णयावर निषेध देखील नोंदवला होता.

सेक्शन ७९ मध्ये स्वरक्षणासाठी हत्यार वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. पण, ती या अटीवर की तुमच्यावर समोरच्या व्यक्तीने जाणीवपूर्वक हल्ला केला आहे आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणजे तुम्ही परतवलेला हल्ला आहे. आपल्या निकालात न्यायल्याने समाजातील भुतांबद्दल असलेली अंधश्रद्धा कमी व्हावी यासाठी सुद्धा आवाहन केलं होतं.

===

हे ही वाचा – गूढ गोष्टी: पुण्यातील तथाकथित ‘भुताने झपाटलेली’ ११ ठिकाणे

===

एका अर्थाने, राम बहाद्दूर थापा यांनी केलेल्या खुनाची शिक्षा ही भुताच्या अस्तित्वाची शक्यता म्हणूनच टळली होती. आजच्या काळात जर ही केस कोर्टात उभी राहिली असती, तर राम बहाद्दूर थापा यांना शिक्षा झाली असती असं मत काही कायदेतज्ञांनी काही वर्षांपूर्वी नोंदवलं होतं.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version