Site icon InMarathi

गांधीजींनी एक वृत्तपत्र सुरू केलं आणि हा देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

महात्मा गांधी यांना बहाल करण्यात आलेली ‘राष्ट्रपिता’ ही पदवी किती सार्थ आहे हे त्यांच्या बद्दल जितकं जास्त वाचण्यात येतं त्यावरून लक्षात येतं. अहिंसेच्या मार्गानेसुद्धा देश स्वातंत्र्य होऊ शकतो हे या अवलिया व्यक्तिमत्वाने देशाला सांगितलं आणि आपल्या कृतीतून ते पटवून दिलं.

‘सत्याग्रह’ या त्यांच्या न्याय मागण्याच्या शांत पद्धतीने जगाला इतकं भारावून टाकलं आहे की, आज महात्मा गांधी यांचे स्मारक हे इंग्लंडच्या संसदेत आहे, अमेरिकेत आहे, त्यांना ट्रेन मधून बाहेर काढणाऱ्या दक्षिण आफ्रिकेत आहे आणि मॉरिशसमध्ये सुद्धा आहे.

इंटरनेटवर उपलब्ध असलेली ही माहिती बघितली की, “बंदे मे था दम” हे लगेच पटतं.

 

 

भारताप्रमाणेच मॉरिशस या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या बापूंनी जे कार्य केलं आहे ते तर हा देश कधीच विसरणार नाही असं आहे. काय होतं हे महान कार्य? जाणून घेऊयात.

१९०१ मध्ये महात्मा गांधी हे मॉरिशसमध्ये १८ दिवसांसाठी वास्तव्यास होते. ३८ वर्षीय महात्मा गांधी यांनी या दौऱ्यात सत्याग्रह, अन्यायाविरुद्ध शांततेचा लढा याबद्दल त्यांनी लोकांना माहिती दिली.

मॉरिशसमधील लोकांना त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अधिकारांची जाणीव करून देणे हे गांधीजींचं सर्वात मोठं योगदान मानलं जातं.

‘माय एक्सपेरिमेन्ट विथ ट्रूथ’ या आत्मचरित्रात गांधीजी यांनी आपल्या मॉरिशसमधील वास्तव्याची सुद्धा नोंद केली आहे.

१९०७ मध्ये मॉरिशसमध्ये राहणारे भारतीय नागरिक हे ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यावेळी महात्मा गांधी यांनी त्यांचे मित्र श्री. मणीलाल ठाकूर यांना मॉरिशसला ‘हिंदुस्थानी’ नावाचं वृत्तपत्र काढण्यासाठी पाठवलं.

भारतीय नागरिकांची व्यथा सांगणारं, हिंदी भाषेतील आणि परदेशातून प्रकाशित होणारं ते पहिलं वृत्तपत्र होतं. स्वातंत्र्याचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून सुरुवातीला ‘हिंदुस्थानी’ हे इंग्रजी, गुजराती आणि भोजपुरी भाषेमधून सुद्धा प्रकाशित केलं जायचं.

 

 

मॉरिशसमध्ये त्या काळात केवळ फ्रेंच भाषेतील वर्तमानपत्र पोर्ट लुईस इथून प्रकाशित केले जायचे. ‘हिंदुस्थानी’ हे हिंदी वर्तमानपत्र सुरू झाल्यानंतर अजून १० हिंदी वर्तमानपत्र मॉरिशसमधून प्रकाशित केली जाऊ लागली.

हे ही वाचा एक विलक्षण स्त्री, जिचा पुनर्जन्म झालाय अशी ग्वाही महात्मा गांधींनी दिली होती

मणीलाल डॉक्टर हे सुद्धा एक बॅरिस्टर होते. भारतीय कामगारांच्या हक्कांसाठी मॉरिशसमध्ये त्यांनी ‘हिंदुस्थानी’ वर्तमानपत्राच्या माध्यमातून एक संघटन उभं केलं. भारतीयांना एकत्रित करण्यासाठी, आपला हक्क मागायला शिकवण्यासाठी मणीलाल डॉक्टर यांनी ३४ वर्ष काम केलं.

१९३५ मध्ये या स्वातंत्र्य चळवळीने एक आकार घेतला आणि ‘रामगुलामन’ नावाचा एक भारतीय कामगार हा मॉरिशसचा नेता म्हणून नावारूपास आला.

३३ वर्ष स्वातंत्र्याचा लढा दिल्यानंतर १९६८ मध्ये जेव्हा मॉरिशस इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र झाला तेव्हा ‘रामगुलामन’ यांना मॉरिशसचे पाहिले पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आलं होतं.

 

 

महात्मा गांधी यांचे अनुयायी म्हणून मॉरिशसमध्ये दाखल झालेल्या मणीराम डॉक्टर यांच्या या प्रवासाबद्दल ‘मॉरिशस : इंडियन कल्चर अँड मीडिया’ या पुस्तकात माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. मॉरिशसचे वरिष्ठ टीव्ही पत्रकार सर्वेश तिवारी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

महात्मा गांधी यांनी शिकवलेला सत्य व अहिंसेची शिकवण, भारतीय संस्कृती याचा मोठा पगडा आजही मॉरिशसच्या लोकांवर आहे असं नेहमीच बोललं जातं. एका बेटावर वसलेला मॉरिशस हा सुंदर देश तिथल्या लोकांच्या नम्र वागणुकीमुळे अजूनच सुंदर वाटतो अशी नोंद पर्यटक नेहमीच करत असतात.

मॉरिशस देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी तिथे शेतीला प्राधान्य देण्यातही भारतीय कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. प्रामुख्याने उसाची लागवड केलेल्या मॉरिशसमध्ये उत्तरप्रदेश आणि बिहारमधील भोजपुरी बोलणाऱ्या कामगारांचा समावेश आहे.

 

 

१८३४ ते १९२३ या काळात मॉरिशसमध्ये भारतातून जवळपास ४.५ लाख कामगार केवळ शेती करण्यासाठी गेल्याची नोंद आहे. यापैकी १.५ लाख लोक हे आपला करार संपवल्या नंतर भारतात परतले आणि उर्वरित ३ लाख लोकांनी मॉरिशसमध्येच रहाणं पसंत केलं.

मॉरिशसची लोकसंख्या आज १३ लाखच्या आसपास आहे ज्यामधील बहुतांश लोक हे भारतीय आहेत. भारतीय लोक मॉरिशस या दक्षिण आफ्रिका आणि डचच्या सीमारेषेलगत असलेल्या देशात वास्तव्यास गेले आणि त्यांनीच देशाचं ब्रिटनवर असलेलं परावलंबन कमी केलं असं सांगितलं जातं.

मॉरिशसमध्ये आजही ‘महात्मा गांधी इन्स्टिट्यूट, गांधी भवन आणि गांधी मैदान यासारख्या ठिकाणाच्या नावावरून महात्मा गांधींची आठवण काढली जाते. स्वतंत्र मॉरिशसमध्ये कित्येक खादी भांडार आहेत. दरवर्षी गांधी जयंती ही मॉरिशसचे लोक पोर्टवर येऊन साजरी करत असतात.

 

 

“स्वातंत्र्य हे केवळ माझ्या देशापुरतं असावं” असा संकुचित विचार न करता त्याची व्यापक व्याख्या लोकांना समजावून सांगणाऱ्या महात्मा गांधी यांना ही माहिती वाचल्यावर वंदन करावं असं तुम्हाला सुद्धा नक्कीच वाटलं असेल.

===

हे ही वाचा एकमेव हिंदी सिनेमा बघण्याआधी गांधीजींनी डॉक्टरांची परवानगी का घेतली होती, ते वाचा

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version