' जेव्हा मार्व्हलचा ‘आयर्न मॅन’ लगानच्या ‘भुवन’चे कौतुक करतो तेव्हा…! – InMarathi

जेव्हा मार्व्हलचा ‘आयर्न मॅन’ लगानच्या ‘भुवन’चे कौतुक करतो तेव्हा…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

स्तुती करणं कोणाला आवडत नाही, माणूस संपूर्ण आयुष्यात लोकांकडून फक्त एका गोष्टीची अपेक्षा करत असतो ती म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने आपल्याबद्दल चार गोष्टी चांगल्या बोलाव्यात, आपली स्तुती करावी.

सच्चा कलाकार तर पैशांपेक्षा प्रेक्षकांच्या कौतुकाचा भुकेलेला असतो. विनोदी नाटकात येणारी टाळी जर एखाद्या प्रयोगात प्रेक्षकांकडून आली नाही तर तो प्रयोग चांगला होत नाही, अशी भावना सतत त्या कलाकाराच्या मनात राहते.

 

salman khan inmarathi

 

मराठी कलाकारांचं कौतुक हिंदीवाले करतात हिंदी कलाकारांचे कौतुक हॉलिवूडचे कलाकार करतात. मार्व्हल सिरीजचा हिरो आयर्न मन अर्थात रॉबर्ट डाऊनी ज्युनियर याने चक्क आपल्या बॉलीवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची स्तुती केली आहे…

 

robert downey inmarathi

 

आज जगभरात दोन कट्टर गट मानले जातात ते म्हणजे डीसी सिरीजचे चाहते आणि मार्व्हल सीरिजचे चाहते, या गटातील लोक कुठेही भेटू देत लगेच आपापल्या आवडत्या सिरीजवरून भांडायला सुरवात करतात.

 

dc marvel inmarathi

 

मार्व्हल सिरीज ही खरं तर एका कॉमिक बुक मधील सुपरहिरोवर बेतली आहे, ज्याचे आजवर ४ भाग येऊन गेले आहेत. त्यातील प्रत्येक सुपरहिरो हिट आहेच मात्र त्यातील आर्यन हे पात्र खूपच  गाजलं आहे त्यावर बरेच मिम्स देखील येत असतात.

आयर्न मॅनची भूमिका करणारा रॉबर्ट डाऊनी हा स्वतः उत्तम अभिनेता आहेच, त्याचबरोबरीने तो एक स्वतः निर्माता सुद्धा आहे. वयाच्या ५ वर्षपासून तो चित्रपटात काम करत आहे. २०१० साली बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले होते की, मी लगान हा चित्रपट पहिला आहे त्यात आमिर खानने विलक्षण काम केले आहे. तसेच मला जर संधी मिळाली तर नक्कीच भारतात येईन.

 

aamir khan inmarathi

 

एवढ्या गोष्टीवरून न थांबता रॉबर्टने आमिर खानची तुलना थेट टॉम हँक्ससारख्या दिगज्ज अभिनेत्याशी केली आहे. भारताचा टॉम हँक्स असं त्याने आमिरला संबोधित केले आहे.

लगान या सिनेमाने एकूणच हिंदी चित्रपटाने यशाचे अनेक मनोरे उभे केलेच मात्र दुसरीकडे जगभरातील वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये बक्षीस सुद्धा मिळवली. यशाचा चढता आलेख बघता लगान थेट ऑस्करचे दरवाजे ठोठावले होते.

 

lagaan team

 

लगानला ऑस्कर जरी मिळाला नाही तरी त्याचे दुःख आपण कुरवाळत बसलो नाही. २१ शतकात अनेक नवनवे बदल होत होते त्यातच २००१ साली लगानने पुन्हा एकदा बॉलीवूडला ग्रामीण बाज सिनेमाच्या पठडीत नेऊन बसवले.

ज्या चित्रपटाला अनेक निर्मात्यांनी नकार दिला, कथा आवडून त्यात लोकांना आवडेल हे दाखवणायचा हट्ट ठेवला मात्र आपले मराठमोळे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी मोडेन पण वाकणार नाही हा बाणा घेऊन आपलीच कथा पडद्यावर आली पाहिजे हा हट्ट ठेवला आणि पुढे जाऊन या सिनेमाने इतिहास घडवला.

 

lagaan-story-marathipizza01

हे ही वाचा – आमिर खानने दिला होता ‘लगान’ साठी नकार, वाचा ‘लगान’च्या निर्मितीची कथा

सुरवातीला या सिनेमाला आमिरने देखील नकार दिला होता तसेच त्याने सुद्धा या सिनेमात बदल करण्याचे सुचवले होते मात्र आशुतोष गोवारीकर ठाम होते. त्यांनी प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेवर मेहनत घेतली.

खासकरून जो चित्रपटाचा नायक आहे भुवन जो आमिर खानने साकारला आहे. त्या पात्राला मिशी हवी कि नको यावरून सुद्धा दोघांमध्ये कलगीतुरा रंगला होता मात्र शेवटी director is the captain हे मानून आमिरने मिशी न ठेवण्याचा आग्रह मान्य केला. आणि आमिरने तो रोल उत्तमच केला.

एखाद्या हॉलिवूडच्या हिरोने बॉलीवूडचा सिनेमा बघणे आणि त्यातील कलाकाराचे कौतुक करणे हीच एक मोठी गोष्ट आहे. मुळात भारत देश आपली संस्कृती, बॉलीवूड याबद्दल जभरात चर्चा केली जाते. आज भारतीय सिनेमे, खाद्यपदार्थ, संस्कृती जगभरात नावाजली जाते.

तोंडावर कौतुक मागून निंदा करणारे अनेकजण आपल्या आयुष्यात भेटत असतात. चित्रपटसृष्टीत सुद्धा फक्त तोंडावर स्तुती करणारे मागून बोलणारे अनेकजण सापडतील. शेवटी सच्चा कलाकार हा दुसऱ्या कलाकाराची मनापासून कौतुक करतोच काहीजण मात्र आपणच श्रेष्ठ यातच समाधान मानणारे असतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?