आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
अनेकांच्या लाडक्या, आवडत्या मालिकेला म्हणजेच ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ येत्या २८ जुलैला आता १३ वर्षे पूर्ण होतील. या मालिकेत दाखवल्या जाणाऱ्या विषयांमुळे आणि निखळ विनोदामुळे ही मालिका लोकांना अगदी आपलीशी वाटली.
या मालिकेच्या कास्टिंगपासून, वेशभूषा, सेट, डायलॉग, रंगवून दाखवलेले सामाजिक प्रसंग, मुख्यतः सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक बंधुत्वाची भावना या सगळ्यामुळेसुद्धा ही मालिका अधिक गाजली.
नेहमीच्या रटाळ डेली सोप्सपेक्षा काहीतरी वेगळं प्रेक्षकांना बघायला मिळालं, हे या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणता येईल.
सगळ्या पात्रांपैकी जेठालाल आणि दया या दोन मुख्य पात्रांवर आधारित असलेल्या या मालिकेचे अनेक छोटे मोठे गमतीदार किस्से आहेत. अनेकवेळा ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहचतातच. असाच एक किस्सा मध्यंतरी पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळाला होता, “कॉमेडीचे बादशाह राजपाल यादव यांनी जेठालालची भूमिका नाकारली” हा तो किस्सा होता. जाणून घेऊया काय आहे नेमकी गोष्ट.
राजपाल यादव यांची कारकीर्द
फिर हेरा फेरी, चूप चूप के, ढोल, दे दनादन, अशा सगळ्या चित्रपटांतून घराघरात पोचले राजपाल यादव! आपल्या कॉमेडीमुळे बॉलिवूडमध्ये, पूर्णपणे आपल्या जोरावर, आपलं एक अढळ स्थान निर्माण केलं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
त्यांनी आपल्या चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात, १९९९ च्या ‘दिल क्या करे’ या चित्रपटापासून केली. अनेक कठीण प्रसंगांमधून मार्ग काढत त्यांनी आपला हा प्रवास सुरू ठेवला. आणि आज त्यांची गणती बॉलिवूडमधल्या सगळ्यात मोठ्या कॉमेडी कलाकारांमध्ये केली जाते.
मध्यंतरी अशी गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, की ‘राजपाल यादव यांना पॉप्युलर सिटकॉम ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील ‘जेठालाल चंपकलाल गडा’ या भूमिकेची ऑफर आली होती. त्यांना ऑफर येण्याआधी ही भूमिका दिलीप जोशी साकारत होते. पण राजपाल यादव यांनी इतकी प्रसिद्ध आणि लोकप्रिय भूमिका साकारण्यास नकार दिला.’
राजपाल यादव यांनी एका मुलाखतीत ही गोष्ट खरी आहे असं सांगितलं. त्यांना खरंच ही भूमिका ऑफर केली गेली होती, पण त्यांनी ती नाकारली. इतकी मोठी संधी समोरून चालून आल्यावर कोणी ती कशी काय नाकारू शकतं, असा आपल्याला आता प्रश्न पडला असेल.
‘तारक मेहता’सारख्या प्रसिद्ध मालिकेचा भाग होणं ही एक किती मोठी गोष्ट असू शकते हे आपल्याला सुनैना फौजदार आणि आराधना शर्मा यांच्या झपाट्याने वाढलेल्या फॅन फॉलोविंग वरून लक्षातच येतं. या दोन्ही अभिनेत्रींनी नुकतंच या मालिकेत काम सुरु केलं आहे.
राजपाल यादव यांनी ही संधी का सोडली, हे जाणून घेतल्यावर आपल्याला सुद्धा त्यांचं म्हणणं पटेल. त्यांच्या म्हणण्यानुसार “जेठालाल या पात्राची ओळख एका अत्यंत गुणी आणि आपल्या कलेत पारंगत असलेल्या कलाकारामुळे (दिलीप जोशींमुळे) झाली आहे. ते पात्र त्यांना इतकं शोभून दिसतं की ते त्यांच्याचसाठी बनलेलं आहे हे मला वाटतं. मी प्रत्येक पात्राला ज्या त्या कलाकाराचं पात्र मानतो, म्हणजे ते पात्र त्यांच्यासाठीच, त्या कलाकारालाच समोर ठेऊन बनवलं गेलं होतं असं मला वाटतं. त्या भूमिकेला त्या-त्या कलाकारानेच न्याय देणं योग्य असतं.”
पुढे राजपाल यादव असंही म्हणाले आहेत, की “आपण सगळे मोरंजनविश्वाचा एक भाग आहोत, त्यामुळे मी कोणत्याही दुसऱ्या कलाकाराच्या पात्रात स्वतःचं पात्र, स्वतःची छाप फिट करू शकत नाही. ती त्या कलाकारानेच केलेली योग्य ठरते. नाहीतर भूमिकेचे प्राण हरवल्यासारखे वाटतात.”
राजपाल यादव यांना कोणतीही फ्रेश आणि त्यांना नजरेसमोर ठेऊन लिहिलेली भूमिका साकारायला आवडते. त्यांचं म्हणणं असं आहे, की “जे पात्र राजपालला मिळेल ते फक्त त्यांच्यासाठी लिहिलेलं असावं, त्या पात्राला साकारण्याचं सौभाग्य त्यांना मिळावं, पण कोणत्या दुसऱ्या कलाकाराने साकारलेली त्याने घडवलेली भूमिका साकारण्याची संधी राजपालना कधीच मिळू नये.”
===
हे ही वाचा – वयाच्या सत्तरीतही कित्येक नटांना लाजवणारा हा ‘फिट’ अभिनेता मागे का पडला? वाचा
===
प्रत्येक कलाकाराची काम करण्याची, अभिनय करण्याची त्याची अशी वेगळी पद्धत असते, एक वेगळी शैली असते. अनेकदा या भूमिका विशिष्ट कलाकारांना समोर ठेवूनच लिहिलेल्या असतात. पण बरेचदा एखाद्या पात्राची व्यक्तिरेखा आधी तयार केली जाते आणि मग कास्टिंग केलं जातं.
जो कलाकार दिग्दर्शकाने घडवलेल्या पात्राच्या जवळपास अभिनय करत असेल तर त्याला त्या भूमिकेसाठी निवडलं जातं. जेठालालची भूमिका दिलीप जोशींनी उत्तमपणे साकारली, आणि आता त्यांना त्यांच्या खऱ्या नावाने नाही तर “जेठालाल” म्हणूनच अनेक लोक ओळखतात.
ही त्या भूमिकेची आणि त्या कलाकाराची किमया आहे. त्यांनी जेठालालला अगदी जिवंत केलंय, ज्यामुळे प्रेक्षकांना आता जेठालाल म्हणून दिलीप जोशींशिवाय इतर कोणीही रुचलं नसतं.
राजपाल यादव यांच्या आधी, ही भूमिका अनेक कलाकारांना दिल्याचं सुद्धा नंतर समजलं. त्या कलाकारांमध्ये अली असगर, कीकू शारदा, अहसान कुरेशी आणि ‘हप्पू सिंह की उल्टन पल्टन’ फेम योगेश त्रिपाठी या अनेक दिग्गज कॉमेडी कलाकारांचा समावेश आहे.
अशी सुवर्णसंधी चालून आली असूनही, ती नाकारता येणं ही खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे. राजपाल यादव सारखे कलाकार, अजूनही खरोखरंच कलेसाठी आणि भूमिकांना जपण्यासाठी काम करतायत हे पाहून आश्चर्य वाटतं.
आजकाल दुसऱ्याला संधी मिळू नये म्हणून कट कारस्थानं करून ती संधी ओरबाडून घेणाऱ्या लोकांच्या काळात राजपाल यादवसारखे सच्चे कलाकार मिळणं हे बॉलिवूडचं नशीब म्हणावं लागेल. आता बॉलिवूड अशा कलाकारांना कसा न्याय देतं आणि त्यांची किती किंमत करतं हे वेळ ठरवेल.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.