' आर्थिक गणित: अमर्यादित थाळी देणाऱ्या “हॉटेल्सना” ते कसं परवडतं? – InMarathi

आर्थिक गणित: अमर्यादित थाळी देणाऱ्या “हॉटेल्सना” ते कसं परवडतं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

‘अमुक एका किंमतीत पोटभर जेवा’, ‘फक्त ३०० रुपयांत हवं तेवढं खा’ अशा पाट्या बघितल्या की आपल्याला अशा ठिकाणी जाऊन जेवणावर ताव मारण्याचा मोह आवरत नाही.

हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं तरीही चौकोनी कुटुंबाला १०००-१२०० रुपयांची फोडणी पडतेच, मग त्याच पैशांमध्ये तुडुंब जेऊया असं आपलं आर्थिक गणित असतं.

 

restaurant InMarathi

 

हे आर्थिक गणित आपण बसवतो, आणि अशा ठिकाणी जाऊन भरपेट जेवतो सुद्धा! पण असं अनलिमिटेड खायला घालणाऱ्या हॉटेल्स आणि बुफेचं नेमकं आर्थिक गणित काय असतं? बकासुर बनून अशा ठिकाणी पेटपूजा करण्यासाठी पोचलेल्या लोकांनी हवं तेवढं खाऊन सुद्धा हॉटेलवाल्यांना आर्थिक फायदा कसा मिळतो? हे तुम्हाला माहित आहे का?

 

buffet food inmarathi

 

 खाऊन खाऊन किती खाल?

बकासुराचा आवेशातच आपण अशा अनलिमिटेड खाण्याकडे वळतो. आपल्या मनात इच्छा कितीही असली, ती अगदी समुद्रा एवढी अफाट असली, तरी पोटात जागा किती आहे यावर बंधन आहेच की हो मंडळी! हाच मुद्दा अशा भरपेट जेवणांच्या आर्थिक गणितांमधील सर्वात महत्त्वाची बाब असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

आपण किती खाऊ शकतो याला ‘लिमिट’ असल्यामुळे, बिनधास्त ‘अनलिमिटेड’ खा असं ही मंडळी म्हणत असतात. यात त्यांची इतर आर्थिक आणि डोकॅलिटी असणारी गणितं सुद्धा असतात बरं का मंडळी! ती कशी असतात, हे कळल्यावर पुढच्यावेळी भरपेट खायला जाल, त्यावेळी काही चुका नक्कीच टाळता येतील. खऱ्या अर्थाने जेवणावर मनसोक्त ताव मारता येईल.

 

food inmarathi

 

द्रव पदार्थांचा वापर करून पोट भरणं

जेवणाआधी सूप प्यावं, त्यामुळे हवी तशी भूक लागते आणि अन्न पचायला सुद्धा मदत होते, हे तुम्ही ऐकलं असेल. पण याच सूपचा वापर भूक वाढवण्यासाठी नाही, तर अनावश्यकपणे तुमचं पोट भरण्यासाठी केला जातो.

 

soup inmarathi

 

काय म्हणताय, कसं ते कळलं नाही? अहो सोपं आहे; सूप आपण जेवणाच्या सुरुवातीलाच घेतो. म्हणजे पोटात भरपूर जागा शिल्लक असते. म्हणजे समोर आणून ठेवलेला पदार्थ अधिक मनापासून खाल्ला जाणार हे काही वेगळं सांगायला हवं का? सूपमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं, मग अशावेळी संपूर्ण बाऊल भरून आपल्याला सूप सर्व्ह केलं जातं. आहे की नाही गंमत!

एवढंच नाही, तर काहीवेळा अशा अनलिमिटेड गोष्टींमध्ये वेलकम ड्रिंक्सचा सुद्धा समावेश असतो. वेगवेगळ्या फ्लेवर्सचे पर्याय समोर आले, की ते सगळेच चाखून बघण्याचा मोह होईलच की नाही? याशिवाय मिनरल वॉटरच्या पाण्याच्या बाटल्या सुद्धा दिल्या जातात. नेहमी साधं पाणी पिणारी आपण मंडळी, पाणी सुद्धा अंमळ जास्तच पितो.

 

mineral water inmarathi

आर्थिक गणितं बसतात कशी?

अनलिमिटेड थाळी, त्यातही विशेषतः बुफे प्रकारातील जेवण उपलब्ध असेल, तर ‘वेटर’ या संकल्पनेची फारशी आवश्यकता भासत नाही. बुफे प्रकारात सुद्धा काही प्रमाणात सर्व्हिंग होत असतं, त्यासाठी लागणारी तेवढी माणसं कामाला ठेवली जातात. म्हणजेच वेटर्सचा पगार आणि लोकांची वर्दळ कमी नसताना त्यांचा वाया जाणारा वेळ, यात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचत होत असते.

आता वळूयात प्रत्येकाच्या खाण्याच्या क्षमतेकडे. एखादी व्यक्ती अगदी पोट फुटेपर्यंत जेवण्यात माहीर असते, मात्र ही कला सगळ्यांना अवगत असते का? तर या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. म्हणजेच कितीही खा, असं सांगितलं तरी प्रत्येक व्यक्ती तिच्या क्षमतेनुसारच खाणार आहे.

म्हणजेच एखाद्याने अगदी कितीही मिटक्या मारून जेवायचं ठरवलं, तरी त्याने जेवढं अधिक खाल्लं असेल, त्याची तूट भरून काढण्यासाठी ‘कमी खाणारी किंवा मर्यादित स्वरूपातच खाणारी’ मंडळी मदत करतात.

 

amir khan eating inmarathi

 

म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्याइतके काही जण प्रमाणापेक्षा अधिक जेवत असतीलही, मात्र अनेकजण पोट आधीच भरलेलं असल्याने कमी जेवतात किंवा त्यांच्या क्षमतेइतकंच जेवतात. त्यामुळे तिथून मिळणार नफा सरासरी गणितात अगदी योग्यप्रकारे बसतो. आहे की नाही गंमत?

अशी ठरते किंमत…

अनलिमिटेड खायला मिळणार, यासाठी आकर्षक किंमत ठरवताना सुद्धा एक आर्थिक गणित मांडलं जातं. जे आपल्या खाण्याच्या क्षमतेशी थेट निगडित असतं. एक व्यक्ती ही सरासरी दिवसाला २ किलो अन्नग्रहण करू शकते. आता समजा हे दोन किलो जेवण अगदी एकाच वेळी खायचं जरी ठरवलंत, तरी तुमच्या क्षमतेवर मर्यादा आलीच.

आधीच सूपसारख्या गोष्टी पोटात ढकलून ठेवल्या आहेत, त्यामुळे जागा कमी झालीच आहे. मग आणखी खाणार किती?

त्यातूनही तुम्ही अमर्याद खायचं ठरवलंत, तर काय होतं? बुफेमध्ये असणारी सगळ्यात महागडी डिश ही २०० रुपये किलो किंमतीची आहे असं गृहीत धरू. तुम्ही फक्त आणि फक्त याच पदार्थावर ताव मारलात, आणि एकाचवेळी दिवसाच्या पूर्ण क्षमतेप्रमाणे २ किलो जेवलात. तर तुम्ही ४०० रुपयांचा ऐवज फस्त कराल. ज्यात त्यांचा नफा समाविष्ट असतोच. म्हणजे या अनलिमिटेड थाळीची किंमत ४०० रुपये ठेवली, तरीही हॉटेल नेहमीच नफ्यात असतं.

 

unlimited thali inmarathi

 

यातंही मेख हीच आहे, की अनलिमिटेड खायला जाणारी बहुतांश मंडळी ही कधीच सर्वाधिक महागडी डिश इतक्या मोठ्या प्रमाणावर खाऊच शकत नाहीत. म्हणजे तुम्ही खादाडपणाची परिसीमा गाठलीत, तरीही तुम्हाला खायला घालणारी मंडळी बक्कळ नफा कमवत असतातच!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?