Site icon InMarathi

जर या गोष्टी केल्या तर Whatsapp अकाउंट होईल बॅन… वाचा, चुका टाळा!

whatsapp banned inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

नव्या सायबर पॉलिसीमुळे सगळेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पेटून उठले होते. काही कंपन्यांनी या पॉलिसीला मान्यता देत नियमांचे पालन करण्याचे ठरवले, तर काही कंपन्यांनी मात्र शेवटपर्यंत या पॉलिसी मान्य करण्यास नकार दिला.

याही व्यतिरिक्त व्हॉट्सअॅप हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, अजून एका कारणामुळे सध्या चर्चेचा विषय ठरला आहे, तो म्हणजे ‘व्हॉट्सअॅप बॅन पॉलिसी’.

नुकतेच व्हॉट्सअॅपकडून अनेक युझर्सची अकाउंट बंद करण्यात आली आहेत. कुठलेही कारण किंवा नोटीस न देता हे पाऊल उचलण्यात आल्याने सध्या सगळेच गोंधळात पडले आहेत. जाणून घेऊया यामागची कारणे काय आहेत आणि तुम्ही यापासून कसे सुरक्षित राहू शकता.

 

 

‘व्हॉट्सअॅप बॅन’ नक्की काय?

या बॅनचे दोन प्रकार आहेत. पर्मनंट बॅन आणि टेम्पररी बॅन. पर्मनंट बॅनमध्ये तुमचा फोन नंबर त्यांच्या ‘डेटा बेस’मध्ये कायमचा लाल अक्षरात लिहिला जातो, थोडक्यात काय, तर तुमच्या नंबरला कायमचा रेड सिग्नल दिला जातो. तो पुन्हा सुरु करता येत नाही.

टेम्पररी बॅन हा काही काळासाठी लावण्यात येतो. याला कारणीभूत असणाऱ्या चुका सुद्धा लहान असतात. बॅन केले गेलेले अकाउंट तुम्ही पुन्हा अॅक्टिव्हेट सुद्धा करू शकता.

 

 

कोणत्या कारणांमुळे तुमचे अकाउंट बॅन केले जाऊ शकते?

१. डमी अॅप

व्हॉट्सअॅपसारखी काही डमी अॅप्स सुद्धा उपलब्ध आहेत. ज्यामध्ये, सगळी फीचर्स सारखीच असतात, किंवा अधिक चांगली फीचर्स देण्यात येतात. तुमच्या प्रायव्हसीची तितकीशी काळजी घेतली जात नाही.

 

 

तुमचे अकाउंट सर्व्हरवरून कोणीही अॅक्सेस करू शकते. तुम्ही जर व्हॉट्सअॅपचे असे व्हर्जन वापरत असाल, तर तुमचा नंबर बॅन केला जाऊ शकतो.

२. अनोळखी व्यक्तींचा ग्रुप बनवणे

आपण व्हॉट्सअॅपवर सहसा आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेल्या नंबरचा ग्रुप तयार करतो. पण आपल्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीकडून आपण अनेकदा सगळ्या अनोळखी व्यक्ती असलेल्या ग्रुप्समध्ये सुद्धा अॅड केले जातो.

एखाद्याने जर असे खूप ग्रुप्स तयार केले आणि त्यात तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह नसलेले फार नंबर आढळून आले, त्यांना ग्रुपमध्ये घेण्यापूर्वी त्यांची संमती घेतली गेली नसली, तर तुमचं अकाउंट बॅन केले जाऊ शकते.

 

 

३. मोठ्या प्रमाणावर मेसेज पाठवणे (Bulk Messages)

तुम्ही जर तुमच्या व्यवसायाबद्दल, ऑफरबद्दल, एखाद्या सर्व्हिसबद्दल अनेक अनोळखी लोकांना मेसेज पाठवले, तर व्हॉट्सअॅप प्रायव्हसी पॉलिसीचे उल्लंघन केले जाते. ज्यामुळे अकाउंट बॅन होईल.

 

 

४. बेकायदेशीर मेसेज

तुम्ही जर फारच आक्षेपार्ह मेसेज, पोस्ट्स करत असाल, ज्याने समाजाची शांती आणि देशाची सुव्यवस्था भंग होऊ शकते; तर मोठा धोका आहे. असे मेसेज मोठ्या संख्येने पाठवताना आढळून आलात, तर तुमचे अकाउंट पर्मनंट बॅन होईल.

 

 

५. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर

जर मनुष्य क्षमतेपेक्षा जास्त मेसेज पाठवताना आढळून आलात आणि हे मसेज सिस्टीम जनरेटेड किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पाठवण्यात आले आहेत, हे आढळून आले तर तुमचे अकाउंट पर्मनंट बॅन केले जाईल.

 

 

६. पाठवण्यात येणाऱ्या मेसेजच्या संख्येत अचानक झालेली वाढ

एखादा नवीन नंबर घेऊन किंवा तुमच्याच अकाउंटवरून कमी वेळात अनेक मेसेज पाठवले, व्हॉट्सअॅपच्या वापरावरून तुमच्या मेसेज पाठवण्याच्या संख्येत कमीवेळात, अचानक झपाट्याने वाढ होताना आढळून आली तर तुमचे अकाउंट कायमचे बॅन केले जाईल.

 

 

७. तुमचे अकाउंट रिपोर्ट किंवा ब्लॉक होणे

अनेक व्हॉट्सअॅप उपभोगत्यांनी तुमचा नंबर जर मोठ्या संख्येत ब्लॉक किंवा रिपोर्ट केला, तर तुमचे अकाउंट संशयित ठरवून बंद करण्यात येईल.

 

 

८. Sent and received message ratio

तुमच्या सगळ्या हालचालींची नोंद आता व्हॉट्सअॅप ठेवणार आहे. त्यामुळे तर तुम्हाला आलेल्या मेसेजपेक्षा तुम्ही पाठवलेले मेसेज अनाकलनीय संख्येने जास्त असतील, तर तुमचा नंबर पर्मनंट बॅन केला जाईल.

 

 

अकाउंट बॅन झाले आहे हे कसे ओळखावे?

तुमचे अकाउंट बॅन करण्यात आले असेल, तर व्हॉट्सअॅप उघडताच तुम्हाला एक मेसेज दिसेल. ज्यात तुमचे अकाउंट बॅन केले गेले आहे, तो बॅन कोणत्या प्रकारचा आहे, आणि तुम्ही त्या बॅन विषयी तक्रार करून अधिक माहिती जाणून घेऊ शकता, असे लिहिलेले असेल.

तिथे कस्टमर सपोर्टची लिंक सुद्धा दिलेली असेल. टेम्पररी बॅन असेल, तर तुम्ही त्या दिलेल्या लिंकवर जाऊन, कस्टमर सपोर्टशी संपर्क साधून अकाउंट पुन्हा सुरु करून घेऊ शकता. पण पर्मनंट बॅन असेल तर मात्र तुमचे अकाउंट पुन्हा सुरु होऊ शकणार नाही.

 

 

अर्थात ही गोष्ट पण ध्यानात ठेवा, की व्हॉट्सअॅपकडून जर ४ ते ५ वेळा तुमचे अकाउंट टेम्पररी बॅन झाले, तर ते कायमचे बॅन करण्यात येऊ शकते. त्यामुळे जरा जपूनच!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version