Site icon InMarathi

“संसद भवनातील” पंखे उलटे बसवलेले असतात जाणून घ्या यामागचं कारण!

parliament 3 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

कडक उन्हाच्या काहिलीत हवेची थंडगार झुळूक देणारा पंखा सर्वांनाच माहिती आहे. अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा पंखा हवाहवासा वाटतो. सीलिंग फॅन, टेबल फॅन, हे पंख्यांचे लोकप्रिय प्रकार. बाहेर कुठेही जाऊन घरी आलो की आपण पहिले पंख्याचे बटण सुरू करतो. कूलर किंवा एअर कंडिशनर चा जमाना असला तरी अनेक घरात आजही पंखेच राज्य करतात.

पंखा ही आपल्या रोजच्या जगण्यातली जीवनावश्यक गोष्ट आहे. जरी कूलर , एसीज असले तरी पंखे देखील असतातच. वेगवेगळ्या डिझाईन चे, वेगवेगळ्या फॅशन चे हे पंखे घरी असणे पूर्वी प्रतिष्ठेचे समजले जात असे. ज्याच्या घरी पंखा त्याचा वट मोठा असेही गणित होते. पण समजा, जर तुम्हाला कोणी विचारले की तुमच्या घरी पंखे कसे लावले आहेत? तर तुम्ही त्या विचारणार्‍याला नक्कीच म्हणाल, की हा काही प्रश्न आहे का? एक तर सीलिंग फॅन किंवा टेबल फॅन हे तुमचे उत्तर असेल.

 

 

मित्रांनो, जसे आपल्या घर, ऑफिस इ. ठिकाणी पंखे असतात तसेच ते आपल्या देशाचे आणि आपले भवितव्य ठरवणार्‍या संसदेतही आहेत. आता तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष? तर, विशेष गोष्ट ही आहे की आपल्या देशाच्या या ऐतिहासिक अशा संसद भवनातील पंखे सुद्धा आपल्या राजकारणी नेत्यांसारखेच युनिक आहेत बर का? कारण ते चक्क उलटे, म्हणजेच जमिनीकडून छताच्या दिशेने असे उलटे लावण्यात आलेले आहेत. आहे ना आश्चर्याची गोष्ट?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

हे असे पंखे लावण्यामागचे कारण आणि त्याची कहाणी देखील अशीच रोचक आहे. जाणून घ्यायची आहे ती कहाणी? चला तर मग पाहूया काय आहे या उलट्या पंख्यांची गोष्ट..

 

 

तुम्हाला तर माहित आहे, की आपले संसदभवन हे देशातील अतिशय उत्कृष्ट स्थापत्यशैलीचे उदाहरण आहे. ते आपल्या संस्कृतीचे वारसास्थळ देखील आहे. दिल्लीच्या रायसिना भागातील ही १०० वर्षे जुनी इमारत पहाण्यासाठी आपल्या देशातीलच नाही तर परदेशातील पर्यटक ही गर्दी करतात. अशा ऐतिहासिक वस्तूची स्थापना सन १९२१ रोजी करण्यात आली होती. २१ फेब्रुवारी १९२१ रोजी ‘ड्यूक ऑफ कनाट’ यांच्या हस्ते या वस्तूचे भूमिपूजन करण्यात आले होते.

प्रसिद्ध ब्रिटिश आर्किटेक्चर ‘एडिवन लुटियंस (Sir Edwin Lutyens) और हर्बर्ट बेकर (Sir Herbert Baker)’ यांच्याकडे या वास्तूच्या संपूर्ण रचनेची जबाबदारी देण्यात आली होती. संपूर्ण संसद भवन बनवण्यास ६ वर्षांचा काळ लागला होता. भारताचे त्यावेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड इर्विन यांनी १८ जनवरी १९२७ या दिवशी या वास्तूचे उद्घाटन केले होते.

 

 

अशा या अनोख्या वास्तूमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे संसदेच्या सेंट्रल हॉलमधील जमिनीपासून छताकडे असे लावण्यात आलेले पंखे. तुम्ही जर या सेंट्रल हॉलचा फोटो पाहिला तर तुम्हाला हे वेगळ्या धाटणीचे पंखे नक्की पहायला मिळतील. उलटे पंखे असण्याचे जगातील हे एकमेव उदाहरण असावे. याला कारण आहे हॉलचे आर्किटेक्चर.

सेंट्रल हॉलचा हा घुमट पूर्ण संसद भवनाच्या मध्यभागी आहे. तज्ञांच्या मते जेव्हा संसदेचे निर्माण पूर्ण झाले तेव्हा तिचा घुमट हा खूपच उंच बनवण्यात आला होता. हे गोलाकार छतच संसदेची खरी ओळख सांगणारे होते. त्यावेळी काही एसीचा शोध लागलेला नव्हता त्यामुळे त्या हॉलमध्ये पंखेच लावण्यात येणार होते, पण हॉलचे छत खूपच उंचीवर असल्याने त्यावर पंखे लावले जाऊ शकत नव्हते.

 

लांब रॉडवर पंखे लावले असते तर त्या हॉलचे सौंदर्य कमी झाले असते. त्यामुळे पंखे खांबांच्या मदतीने जमिनीवर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आणि म्हणूनच इथले पंखे उलटे आहेत

आणखी एक युनिक गोष्ट म्हणजे आपल्या संसद भवनाचे हे डिझाईन एका मंदिराच्या डिझाईनच्या आधारे बनवण्यात आले आहे. ते मंदिर आहे मध्यप्रदेशातील ‘चौसष्ट योगिनी मंदिर’. मध्यप्रदेशातील हे सर्वात जुने आणि मुख्य मंदिर आहे.

 

 

दोन्ही ब्रिटिश आर्किटेक्चरनी या योगिनी मंदिराला आधार मानून संसदेची रचना केली होती. मंदिरातील खांबांप्रमाणे संसदेच्या मुख्य हॉलमध्ये देखील १४४ खांब आहेत.

प्रत्येक खांबाची ऊंची २७ फूट असून संसद भवनाला एकूण १२ दरवाजे व एक मुख्य दरवाजा आहे. तेव्हा मित्रांनो संसद भवनातील हे पंखे पहिल्यापासून असेच उलटे बसवण्यात आले होते.

नंतरही त्यांचे ऐतिहासिक महत्व कायम ठेवण्यासाठी त्यांच्या रचनेत दूसरा कोणताही बदल केला गेला नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version