सरकारच्याच पैशांनी आणि परवानगीने, ‘हा’ पठ्ठ्या करतोय हॅकिंग! जाणून घ्या त्याचा गेम!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
ऑनलाईन पद्धतीने कोणताही व्यवहार करतांना ‘हॅकर्स’पासून सर्वात जास्त सतर्क रहावं लागतं. घरातून बाहेर जातांना आपण जसं कुलूप व्यवस्थित लागलं आहे की नाही हे दोनवेळा तपासून पाहतो, तसं आजकाल प्रत्येक व्यवहार करतांना, बारीकसारीक नियम आणि अटी तपासून घ्याव्या लागतात.
९० च्या दशकापर्यंत हॅकर्सकडे एक दहशत म्हणूनच बघितलं जायचं. पण, काही वर्षात ‘एथिकल हॅकर’ हा एक प्रकार जगासमोर आला. ‘उरी’, ‘अ वेनसडे’ सारख्या हिंदी सिनेमात आपण हॅकर्सला गुन्हेगार शोधण्यासाठी पोलिसांची मदत करतांना बघितलंच आहे.
सायबर क्राईमवर वाढता ताण बघता येणाऱ्या काळात ‘हॅकिंग’ ही एक शिक्षणातील शाखा देखील होऊ शकते.
केविन मिटनिक हा असाच एक अमेरिकेतील ‘एथिकल हॅकर’ आहे ज्याला पोलिसांची नेहमीच मदत होत असते. ‘ब्लॅक हॅट हॅकर’ या टोपण नावाने ओळखला जाणारा हा हॅकर जगातील सर्वात हुशार हॅकर आहे असं गुगलने देखील मान्य केलं आहे. कोण आहे हा केविन मिटनिक? कसा तो या क्षेत्रात इतका तज्ञ झाला? हे जाणून घेऊयात.
आयुष्याचा पूर्वार्ध
केविन मिटनिकचा जन्म ६ ऑगस्ट १९६३ रोजी अमेरुकेतील कॅलिफोर्निया इथे झाला. लहानपणीच त्याला कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचा पासवर्ड शोधून काढणे, वडिलांच्या इमेलचा पासवर्ड काय असेल? असे उद्योग करण्याची सवय होती.
वयाच्या १२ व्या वर्षी त्याने लॉस एंजेलीसमधील प्रयव्हेट बस बुकिंगचा पासवर्ड ‘क्रॅक’ केला आणि स्वतः मोफत सगळीकडे प्रवास करू लागला.
१९८० च्या दशकात केविनने नोकिया, आयबीएम, मोटोरोलासारख्या जगातील कित्येक मोठ्या कंपन्यांचे सर्वर हॅक करून त्यांची झोप उडवली होती. अमेरिकेतील कोणत्याही सरकारी टेंडरचा कोड हस्तगत करणं त्याला सहज शक्य व्हायचं. १९९० च्या दशकात केविन मिटनिक हा अमेरिकेचा ‘मोस्ट वॉन्टेड सायबर गुन्हेगार’ म्हणून घोषित करण्यात आला होता.
केविनला त्याकाळी कित्येकदा अनधिकृत हॅकिंग प्रकरणात जेलमध्ये जावं लागलं होतं. हॅकिंगच्या कामामुळे केविनने एकूण ६ वर्ष जेलची हवा खाल्ली आहे. यापैकी ३ वर्षांची शिक्षा ही अमेरिकेची सर्वोच्च सुरक्षा संस्था असलेल्या ‘पेंटागॉन’चा पासवर्ड हॅक केल्यामुळे होती, तर उर्वरित ३ वर्षं अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी अलर्ट प्रोग्राम’चे ‘कॉर्पोरेट सिक्रेट्स’ लिक करण्याच्या सायबर गुन्ह्यासाठी झाली होती.
===
हे ही वाचा – सरकारने विरोधकांचे फोन हॅक केले आहेत का? जाणून घ्या काय आहे प्रकरण!
===
वाल्याचा वाल्मिकी
२१ वं शतक सुरु होतांना मात्र केविनला एक साक्षात्कार झाला आणि त्याने आपलं ज्ञान फक्त चांगल्या गोष्टींसाठी वापरण्याचं ठरवलं. केविन मिटनिकने सर्व शिक्षा भोगल्यानंतर वयाच्या ३८ व्या वर्षी ‘आयटी कन्सल्टंट’ व्हायचं ठरवलं.
सुरुवातीला छोट्या आयटी कंपनीसाठी ‘सायबर सिक्युरिटी’मध्ये काम करत त्याने आपली एक नवीन ओळख निर्माण केली. २००१ मध्ये केविनचं टॅलेंट हे गुगल, याहू, अमेझॉनपर्यंत पोहोचलं. ‘सायबर हॅकिंग’ थांबवण्यासठी या कंपन्यांनी केविन मिटनिकची ‘कन्सल्टंट’ म्हणून नेमणूक केली.
काही वर्षांपूर्वी केविनला जेलमध्ये टाकणाऱ्या अमेरिकन सरकारने सुद्धा ‘सायबर सिक्युरिटी सेल’चं नेतृत्व करण्याची संधी केविनला दिली.
आज केविन मिटनिक हा अमेरिकन सरकारकडून आपल्या कामासाठी प्रति महिना करोडो रुपये पगार घेत आहे. ‘फोर्च्यून ५००’ कंपनींसाठी केविन मिटनिक हा सध्या सल्लागार म्हणून काम बघत आहे.
एकेकाळी इतर कंपन्यांचे पासवर्ड हॅक करणाऱ्या केविनने आता अमेरिकेत स्वतःची ‘मिटनिक सिक्युरिटी कन्सलटिंग’ ही आयटी कंपनी सुरू केली आहे. KnowB4 या सायबर सिक्युरिटीचा केविन हा ‘को-ओनर’ सुद्धा आहे. ‘फिशप्रोटेक्शन डॉट कॉम’ या त्याच्या वेबसाईटचा आयटी क्षेत्राला नेहमीच फायदा होत असतो.
इथेही त्याचे हात चालतात
हॅकिंग शिवाय केविन मिटनिकला लिखाणाची सुद्धा खूप आवड आहे. ‘द आर्ट ऑफ डिसेप्शन’ आणि ‘द आर्ट ऑफ इन्ट्रुरजन’ ही सायबर सिक्युरिटीवर त्यांनी लिहिलेली पुस्तकं, म्हणजे हॅकिंग या विषयावर उपलब्ध असलेली सर्वोत्तम माहिती मानली जाते.
केविन मिटनिक हे इमेल वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने, फक्त ‘एनक्रिप्ट’ होणाऱ्या मेल्स, मेसेजचा वापर करावा असं आपल्या लेक्चरमधून नेहमीच सांगत असतात. आपला आयपी अॅड्रेस कोणाही पर्यंत पोहोचेल असं कोणतंही सर्च इमेलमध्ये लॉगिन असल्यावर करू नये ही सुद्धा एक बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे.
विचार बदलले की, माणूस कसा बदलतो याचा मूर्तीमंत प्रत्यय म्हणजे केविन मिटनिक आहे. शाळेतील खोडकर विद्यार्थ्याला जसं ‘मॉनिटर’ करण्याची जशी पद्धत असते तसंच केविन हा अमेरिकेच्या सायबर सिक्युरिटीचं रक्षण करतोय ही कौतुकाची गोष्ट आहे. केविन मिटनिक चं आयुष्य इतकं चढ उतारांचं आहे की, त्यावर हॉलीवूड मध्ये २ सिनेमे तयार करण्यात आले आहेत.
सुरुवातीला गुन्हेगार असलेल्या केविन मिटनिक याच्यावर, हॅकिंग क्षेत्रात अजून पारंगत होण्यासाठी अमेरिकन सरकारने विश्वास टाकला आणि त्याला सर्व प्रकारचे सहाय्य केलं ही बाब जगातील इतर देशांनी शिकण्यासारखी आहे.
===
हे ही वाचा – हॅकिंग म्हणजे नेमकं काय? VIP लोकांचंही अकाऊंट हॅक होतं? जाणून घ्या
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.