' लोकांना एनर्जी देणाऱ्या रेड बुलला, अशाप्रकारे एक टॅगलाईन भलतीच महागात पडली… – InMarathi

लोकांना एनर्जी देणाऱ्या रेड बुलला, अशाप्रकारे एक टॅगलाईन भलतीच महागात पडली…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“बदनाम हुए तो क्या हुआ? नाम तो हुआ” अशी हिंदीमध्ये एक म्हण आहे. बिझनेस जगतात या म्हणीचा उपयोग हा आपलं प्रोडक्ट, सर्विस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जातो.

एखादी ‘कॅची’ टॅगलाईन तयार करायची आणि आपल्या वस्तूची मार्केटमध्ये एक उत्सुकता निर्माण करायची असा काही कंपन्यांचा शिरस्ता असतो. उदाहरण द्यायचं झालं तर, ‘फाईव्ह स्टार’ कॅडबरीची टॅगलाईन आहे “इसे खाओगे, तो खो जाओगे” किंवा “दाग अच्छे होते है” किंवा “मेंटॉस, दिमाग की बत्ती जला दे.”

 

mentos dimag ki batti jala de inmarathi

 

आपण या टॅगलाईन गंमत म्हणून ऐकतो आणि सोडून देतो. पण, अमेरिकेच्या बेंजामिन केरेर्थर्स या माणसाने ‘रेड बुल’ या एनर्जी ड्रिंकच्या कंपनीला “गिव्ह्ज यु विंग्स” या स्लोगनसाठी २०१३ मध्ये चक्क कोर्टात खेचलं होतं हे कदाचित आपल्याला माहीत नसेल.

१९७६ मध्ये ऑस्ट्रियामधून सुरू झालेल्या आणि जगभरात १७१ देशात आवडीने प्यायल्या जाणाऱ्या ‘रेड बुल’ या एनर्जी ड्रिंक कंपनीसाठी सुद्धा हा एक धक्का होता.

बेंजामिन याची इच्छा ‘रेड बुल’ हे एनर्जी ड्रिंक प्यायल्यावर शब्दशः ‘पंख यावेत’ अशी नव्हतीच. ‘विंग्ज’ म्हणजे आपल्याला मिळणारी प्रचंड ऊर्जा हा अर्थ त्याला माहीत होता. पण, त्याचा असा दावा होता की, “रेड बुल प्यायल्यानंतर असा कोणताही अनुभव येत नाही.”

 

red bull inmarathi

 

नक्की काय घडलं?

रेड बुल कंपनीच्या सगळ्याच जाहिराती आणि मार्केटिंग कॅम्पेनमध्ये केलेले दावे खोटे आहेत, असा आरोप करून बेंजामिन यांनी कोर्टात केस उभी केली होती. खोटी जाहिरात केल्याबद्दल कंपनीला शिक्षा सुनावण्यात यावी असं त्यांचं स्पष्ट मत होतं.

‘२५० मिलीच्या रेड बुल कॅनमधून एक कप कॉफी इतकी सुद्धा एनर्जी मिळत नाही’ हे त्यांनी दोन्ही पेयांमधील घटकांच्या आधारे कोर्टात सिद्ध करून दाखवलं होतं. रेड बुलमध्ये ग्लुकोनेरेक्टन, व्हिटॅमिन बी, सुक्रोज हे कॅनवर लिहिलेल्या प्रमाणात नाहीत हे या मागचं कारण होतं.

रेड बुलच्या जाहिराती या केवळ अतिशयोक्ती असणाऱ्या नाहीत, तर त्या धादांत खोट्या आणि फसव्या आहेत, म्हणून रेड बुल आणि त्यांच्या मार्केटिंग टीमला त्वरित शिक्षा सुनावण्यात यावी. अशी त्यांनी मागणी केली. त्यांचा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला होता.

 

red bull in hand inmarathi

 

रेडबुलच्या ‘सुपीरियर/बेस्ट सोर्स ऑफ एनर्जी’ या ओळीवर सुद्धा बेंजामिन यांचा आक्षेप होता. त्यांचं म्हणणं होतं, की ‘रेड बुल म्हणजे काही एखादी बॅटरी नव्हे. त्यांनी असा दावा करणं हे एकवेळ मान्य होऊ शकतं. कारण ती वस्तू कमी जास्त प्रमाणात चार्ज करता येऊ शकते. रेड बुल हे प्येय आहे, त्यामुळे त्यांनी स्वतःला असं ‘बेस्ट’ म्हणवून घेणं चुकीचं आहे.’

रेड बुलला हा युक्तिवाद फारसा पटला नाही. तरीही कोर्टाच्या आदेशानुसार कंपनीला बेंजामिन यांना २०१५ मध्ये १३ मिलियन म्हणजेच १.३ करोड यूएस डॉलर्स इतकी भरपाई द्यावी लागली होती.

ग्राहक हा राजा असतो हे या घटनेने सिद्ध केलं होतं. रेड बुलने सुरुवातीला बेंजामिन यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष केलं होतं. पण, जसा त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचा प्रतिसाद मिळायला लागला, तसा रेड बुलच्या विक्रीवर फरक पडत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

त्यांना भरपाई देऊन प्रकरण संपवूनही रेड बुलने आपल्या स्लोगनमध्ये कोणताही फरक केला नाही.

 

red bull gives you wings inmarathi

 

स्पर्धेत टिकून राहणं गरजेचं

‘एनर्जी ड्रिंक्स’ या क्षेत्रात रोज नवनवीन कंपनी येत असतात. चव आणि किंमत अशा विविध पैलूंवर त्यांची ग्राहकांकडून चाचणी होत असते. जास्तीत जास्त गोष्टींमध्ये उत्तम ठरणारं पेय हे या स्पर्धेत तग धरून रहातं.

रेड बुलचं मार्केटमधील या स्पर्धेबद्दल असं म्हणणं आहे, की ते कोका-कोलाप्रमाणे एनर्जी ड्रिंक्समध्ये मार्केट लिडर आहेत. त्यांनी एनर्जी ड्रिंक या प्रोडक्टची सुरुवात केली आहे. त्यांच्या विक्रीचे आकडे हेच त्यांचं यश दाखवून देण्यासाठी पुरेसे आहेत, असंही कंपनीचं म्हणणं आहे.

 

red bull drink inmarathi

 

आपल्या यशाचा अभिमान असणं आणि त्याविषयी अहंकार असणं यात खूप फरक आहे. रेड बुलसारख्या कंपन्यांनी नुकताच झालेला रोनाल्डोचा किस्सा आणि नंतर कंपनीचे पडलेले शेअर्स, या घटना लक्षात ठेवल्या पाहिजेत. कारण, मार्केट लिडर होण्यासाठी तुम्हाला खूप लोकांची गरज असते. पण, मार्केटमध्ये तयार झालेलं नाव खराब होण्यासाठी एक माणूसही खूप असतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?