' परदेशात बंदी मात्र आपल्याकडे सर्रास विकल्या जातात ‘या’ वस्तू… वाचा!!! – InMarathi

परदेशात बंदी मात्र आपल्याकडे सर्रास विकल्या जातात ‘या’ वस्तू… वाचा!!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय ग्राहक किती सजग आहेत याचं परीक्षण केलं गेलं तर आपण सगळे शेवटून पहिले नक्की येऊ! आम्ही असं का म्हणतोय? चला एक छोटासा खेळ खेळूया, आज पर्यंत तुम्ही विकत घेतलेल्या खाद्य पदार्थात, रोज वापरण्याचा वस्तू जसे शॅम्पू, साबण, चेहऱ्याला आणि अंगाला लावण्याचे क्रीम्स, कपडे धुण्यासाठी वापरले जाणारे डिटर्जंट, इत्यादी

ज्या वस्तूचं फॅक्टरीत उत्पादन केलं गेलं असतं, ह्यांचा कंटेंट पाहिला आहे? ह्या वस्तू बनवण्यासाठी कोणता कच्चा माल वापरतात, त्यात कोणते केमिकल्स असतात, त्यांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो याची पडताळणी केली आहे? ते ही जाऊद्या!

 

medicien-expiry-marathipizza00

 

कधी तरी बाटलीची किंवा पाकिटाची मागील बाजू पहिली आहे? किंमत सोडली तर आपण मागील बाजूचं काहीच बघत नाही. औषध गोळ्यांची सुद्धा एक्सपायरी तारीख चेक करा म्हणून प्रोत्साहित करण्यासाठी, सरकारला जाहिरात करावी लागते म्हणजे आपण खरंच किती सजग ग्राहक आहोत नाही?

आपल्या आणि आपल्या सरकारच्या ह्याच हलगर्जीपणाचा  गैरफायदा घेऊन अनेक आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक कंपन्यांनी आपल्याला नको ते विकणं सुरु केलं आहे. तेच प्रॉडक्ट्स, जे अमेरिका, इंग्लंड, औट्रेलिया, कॅनडा, इत्यादी सारख्या देशांमध्ये बॅन आहेत, ज्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे ते भारतात सर्रास विकले जातात. आणि ह्यात ते उत्पादन खरेदी करणारे ग्राहक आणि त्या उत्पादनांच्या विक्रीला परवानगी देणारे सरकार दोन्ही दोषी आहेत. आपण आपण तर ह्याचा अभ्यास करून सजग बनू शकतो ना? ह्याच उद्देशाने आम्ही आजचा लेख घेऊन आलो आहे. पूर्ण वाचा!

परदेशात विक्रीवर बंदी असलेल्या पण भारतात सर्रास पणे विकल्या जाणाऱ्या काही प्राणघातक वस्तू –

१) लाईफ बॉय साबण –

 

lifeboy inmarathi

 

हेल्दी होगा हिंदुस्थान, लाईफ बॉय है जहाँ तंदुरुस्ती है वहा, असं म्हणत म्हणत कंपनीने आपल्याला अत्यंत वाईट केमिकल्स असलेलं प्रॉडक्ट विकलं. अमेरिकेत लाईफ बॉय साबणावर बंदी आहे. हा साबण तिथली माणसं स्वतःसाठी नाही, तर आपल्या पाळीव कुत्र्यांना अंघोळ घालायला वापरायची. त्यांच्या संशोधनानुसार लाईफ बॉय मधील केमिकल्स हे माणसांच्या त्वचेवर खूप हार्ष असतात.

 

 

२) औषधे –

 

disprin inmarathi

 

डि- कोल्ड टोटल, डिस्प्रिन, निम्युलीड, निमुसलीड अमेरिका, ब्रिटेन, कॅनडाआणि ऑस्ट्रेलिया सारख्या अनेक देशात ह्या गोळ्या विकायला बंदी आहे. डि-कोल्ड टोटल आणि डिस्प्रिन ह्या गोळ्या सर्दी बरी करण्यासाठी वापरल्या जातात.

त्यांच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार डि- कोल्ड टोटलचा माणसाच्या किडनी वर तर डिस्प्रिनचा माणसाच्या लिव्हर वर अत्यंत घातक परिणाम होतो. निम्युलीड, निमुसलीड ह्या पेनकीलर्स सुद्धा त्या देशांमध्ये बॅन करण्यात आल्या आहेत कारण ह्या गोळ्यांचा सुद्धा लिव्हर, किडनी आणि इतरही अवयवांवर घातक परिणाम होतो. पण ह्या गोळ्या आजही आपल्याला भारतीय बाजारात हमखास विकली जाताना आढळते.

 

३) अनपाश्चराइज्ड दूध –

 

milk inmarathi

 

भारतात गाय, म्हैस, बकरी, अशा पाळीव प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधाचा आणि दुधापासून बनलेल्या पदार्थांचा खूप उपयोग केला जातो. आपण सहसा कच्चं दूध घेऊन ते तापवून वापरतो, सायी पासून तूप लोणी सुद्धा बनवतो. पण इतर देशात ह्या दुधावर बंदी घालण्यात आली आहे.

अनपाश्चराइज्ड दुधात अनेक जिवाणू, मैक्रोब्स, इत्यादी आढळतात. त्यातील काही आपल्या शरीरासाठी चांगले तर काही हानीकारकही ठरू शकतात. म्हणून कोणत्याही प्रकारची ईजा होऊ नये म्हणून परदेशात अनपाश्चराइज्ड दुधावर बंदी घालण्यात आली आहे.

 

४) कीटकनाशके –

 

pesticides inmarathi

 

DDT आणि एंडोसल्फान सारख्या जवळ जवळ 60 पेक्षा अधिक नुकसानदायक कीटकनाशकांवर अमेरिका, ब्रिटन सहित अनेक देशात बंदी घालण्यात आली आहे. ह्या किटनाशकांमुळे कॅन्सर, पॅरॅलीसीस, त्वचा रोग असे अनेक जीवघेणे आजार होतात. आणि आपल्या इथे मात्र भाजी-पाल्यावर, फळांवर सर्रास पणे ह्या विषारी कीटकनाशकांचा प्रयोग केला जातो.

५) ऑल्टो 800 आणि नॅनो कार – 

 

nano inmarathi

 

भारतात मध्यमवर्गीय लोकांची पहिली पसंती असलेली ऑल्टो 800 हि गाडी अनेक देशांत सुरक्षा चाचणीत यशस्वी न ठरल्यामुळे बॅन केल्या गेली आहे. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट मध्ये या गाड्यांचे साचे हे अत्यंत तकलादू असल्याचे व त्यांच्यात फिट केलेल्या सेफ्टी बॅगच्या अत्यंत दर्जाहीन असण्यामुळे ह्या गाड्यांवर परदेशात बंदी घालण्यात आली आहे. ह्यात बसलेल्या लोकांचा जीव अजिबात सुरक्षित राहणार नाही हे त्यामागील मुख्य कारण आहे.

 

६) किंडर सरप्राईज –

 

kinder joy inmrathi

 

लहान मुलांचं अत्यंत आवडीचं किंडर जॉय चंच किंडर सरप्राईज हे चॉकलेट परदेशात विकल्या जात नाही. कारण ह्या चॉकोलेटच्या आत खेळणी लपवून ठेवलेली असतात ज्यामुळे ती मुलांच्या घशात अडकून मुलांना ईजा होऊ शकते, एखाद्यावेळी त्यांच्या जीवाची हानी सुद्धा होऊ शकते, ह्या कारणाने चॉकलेट वर तिथे बंदी आहे.

 

७) जेली स्वीट –

 

jelly inmarathi

 

अमेरिका, कॅनडा ह्या सारख्या अनेक देशात हे चॉकलेट सुद्धा बॅन करण्यात आले आहे. आकार छोटा असल्याने व चिकट असल्याने अनेक मुलांनी गिळून घेतल्याने त्यांच्या श्वसन नलिकेत हे चॉकलेट अडकून त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना तिथे घडल्या. ज्यामुळे तिथल्या सरकार ने हे चॉकलेट बॅन करण्याचा निर्णय घेतला.

 

८) रेड बुल –

 

red bull inmarathi

हे ही वाचा – जाहिरातींमधल्या महागड्या वस्तूंपेक्षा या सवयी तुम्हाला सर्वार्थाने “चार्मिंग” बनवतील

डेन्मार्क, फ्रांस सारख्या युरोपियन देशात हे एनर्जी ड्रिंक बॅन करण्यात आलं आहे. तिथल्या डॉक्टर्सच्या म्हणण्यानुसार रेड बुल मुळे डिहायड्रेशन, हार्ट अटॅक, हायपरटेन्शन यांसारखे आजार वाढू लागले होते. सगळ्या चाचण्याकरून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र आपल्याकडे अगदी फॅशन म्हणून आणि इन्स्टंट एनर्जी मिळते म्हणून अनेक तरुण ह्या ड्रिंकचं आवडीने सेवन करतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?