' अखेर ३४ वर्षं जुनं मारहाण प्रकरण सिद्धूला चांगलंच महागात पडलं! – InMarathi

अखेर ३४ वर्षं जुनं मारहाण प्रकरण सिद्धूला चांगलंच महागात पडलं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नवजोत सिंग सिद्धू आणि वाद हे समीकरण आपल्याला काही नवीन नाही. त्याच्या अतरंगी शायरीपासून वादग्रस्त राजकीय करियरपर्यंत आपण सगळ्यांनीच त्याच्या स्वभावाचा, त्याच्या वैचारिक धारणेचा अनुभव घेतलेला आहे.

नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने नवजोत सिंह सिद्धूला एका जुन्या प्रकरणात १ वर्षं तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना नवजोत सिंग सिद्धूच्या शिक्षेत आणखीन वाढ होऊ शकते असंही न्यायालयाने सांगितलं आहे.

 

navjyot singh siddhu inmarathi

 

एकंदरच या निर्णयामुळे सिद्धूच्या समर्थकांमध्ये गोंधळ उडालेला दिसून येतोय. अजूनही कित्येकांना सिद्धूचं हे ‘रोड रेज प्रकरण’ काय आहे ते माहीतच नाहीये. याच वादग्रस्त प्रकरणाविषयी आणि सिद्धूच्या अशाच काही वादग्रस्त स्टेटमेंटविषयी जाणून घेऊयात!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१९८८ मध्ये म्हणजेच ३४ वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता, आणि त्या अपघातात सिद्धूचं नाव देखील गोवलं गेलं होतं!

खरंतर त्या दिवशी १९८८ साली कार पार्किंगच्या जागेवरून एक वयस्कर गृहस्थ गुरनाम सिंग आणि नवजोत यांच्यात बाचाबाची झाली, आणि प्रकरण एवढं वाढलं की दोघांमध्ये शारीरिक झटापटही झाली.

 

siddhu inmarathi

 

असं म्हंटलं जातं की सिद्धूने तेव्हा त्या वयस्कर व्यक्तीला बेदम मारहाण केली, पण सिद्धूने नेहमीच ती गोष्ट एक अपघात होता असंच स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर त्या वयस्कर व्यक्तीचा मृत्यू झाला, आणि त्याचं खापर सिद्धूच्या माथी मारायचा पुरेपूर प्रयत्न केला गेला.

ट्रायल कोर्टात सिद्धूची निर्दोष मुक्तता झाली. पण उच्च न्यायालयाने २००६ साली सिद्धू आणि त्याच्या मित्राला या प्रकरणात दोषी ठरवून ३ वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर सिद्धूने सर्वोच्च न्यायलयात दाद मागितली तेव्हा त्याला निव्वळ ५० हजारांचा दंड ठोठावला होता.

यानंतर गुरनाम सिंह यांच्या नातवाईकांनी सर्वोच्च न्यायलयात एक याचिका दाखल केली, आणि २०१० साली एक सीडीसुद्धा पुरावा म्हणून सादर करण्यात आली होती. ज्यात सिद्धू यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गुरनाम यांची हत्या केल्याचे मान्य केले होते.

नातेवाईकांनी याचिका दाखल केल्यावर अखेर न्यायालयाने या प्रकरणावर पुन्हा सुनावणी करण्यात सहमति दर्शवली आणि निर्णय राखून ठेवला होता. आणि आजच यावर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देऊन या प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे.

असंही म्हणतात की या प्रकरणात सिद्धूचा भडकाऊ स्वभाव नडला, सिद्धूच्या याच घटनेमुळे आजही त्याच्या एकंदर वर्तणूकीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं.

सिद्धूच्या वादग्रस्त कृतीचं हे काही एक उदाहरण नाही. सिद्धू जितका तापट आहे तितकाच तो असंबद्ध बडबडतो, अशाच एका वादग्रस्त विधानानंतर लोकांनी सिद्धूला प्रचंड ट्रोल केलं. ते विधान म्हणजे पुलवामाचा दहशतवादी हल्ला झाल्यावर त्याने केलेलं स्टेटमेंट.

 

pulwama attack inmarathi

 

पुलवामाचा भ्याड दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर आपल्या जवानांनी त्यांना यमसदनी पाठवण्यासाठी केलेला सर्जिकल स्ट्राइक तर आपल्याला माहीत आहे, पण जेव्हा आपल्या ४० जवानांचे प्राण या दहशतवाद्यांनी घेतले आणि पाकिस्तानच्या संघटनेने या हल्ल्याची जवाबदारी स्वीकारली होती.

तेव्हा नवज्योत सिंग सिद्धूने केलेलं विधान हे अनेकांना खटकणारंच होतं, त्यावेळेस कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोमध्ये सिद्धू काम करत होता, तेव्हा त्याने पाकिस्तानचं नाव न घेता असं विधान केलं की “काही मूठभर लोकांमुळे साऱ्या देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणं योग्य आहे का?”

त्याच्या या वाक्यावरून तो कीती असंवेदनशील आहे याची प्रचिती आलीच, शिवाय या हल्ल्याचा त्याने निषेध व्यक्त केलाच पण ते करताना त्याने हाच सवाल केला की काही दहशतवादी असतात म्हणून साऱ्या देशालाच दोषी म्हणून धरणार का?

सिद्धूच्या या वक्तव्याची अनुपम खेर, मनोज जोशी अशा कित्येक कलाकारांनी आलोचनादेखील केली. त्याच्या या वर्तणूकीमुळे त्याला कपिल शर्माच्या शोमधून काढण्यात आलं आणि त्याजागी अर्चना पुराण सिंह हिला घेण्यात आलं.

 

comedy nights inmarathi

 

सिद्धू हा वायफळ तर बोलतोच पण तो तितकाच थापाड्या पण आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल, काही यूट्यूब व्हीडियोजमध्ये सिद्धू त्याचा सचिन तेंडुलकरसोबतचा एक किस्सा सांगतो ज्यात तो आणि सचिन एकत्र सलामीला गेले होते.

मुळात त्या व्हीडियोजमध्ये सिद्धूने २ वेगवेगळी वर्षे नमूद केली आहेत, आणि त्या वर्षामधला फरक बघता तोवर सचिनने क्रिकेटमध्ये पदार्पणही केलेलं नव्हतं. यावरूनच सिद्धू हा कीती फेकू आहे याची आपल्याला कल्पना आली असेल!

आपल्याकडे आपण नगरसेवक निवडतानासुद्धा त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासतो, पण इथे तर कित्येक प्रकारचं गैरवर्तन करून, गुन्हा दाखल असूनही सिद्धूला पंजाब कॉँग्रेसचा प्रेसिडेंट केलं जातं हे कुठेतरी चुकीचं आहे अशी लोकांची समजूत आहे.

 

siddhu 2 inmarati

 

बाकी सिद्धूने सर्वप्रथम एक खेळाडू म्हणून किंवा नंतर राजकारणी म्हणून त्याचं कार्य बजावलं आहेच, पण त्याच्या या वादग्रस्त कृतींमुळे आणि स्टेटमेंटमुळे तो कायम वादाच्या भोवऱ्यात अडकतो.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?