Site icon InMarathi

ऑलिंपिकमध्ये ‘अँटी-सेक्स बेड्स’; खेळाडूंना रोखण्यासाठी भलताच पर्याय! वाचा.

Anti sex beds olympics

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

==

क्रिकेट खेळाडू जेव्हा कुठल्याही दौऱ्यावर जातात, त्यावेळी सोबत बायको किंवा गर्लफ्रेंडला नेण्याची परवानगी सहसा दिली जात नाही. सध्या ही परिस्थिती काही प्रमाणात बदललेली दिसून येते. काही मालिकांच्यावेळी आपल्या जोडीदाराच्या सोबतीने जाण्याची, त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी मिळते. मात्र, ऑलिम्पिकची संस्कृती फारच पुढे आहे असं म्हणायला हवं.

ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये, चक्क खेळाडूंना कंडोम वाटले जातात, तेदेखील फुकट!

 

 

या प्रथेची सुरुवात झाली, ती १९९२ साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्यावेळी. एड्ससारखा आजार त्यावेळी भयानक रूप घेऊ लागला होता. गर्भनिरोधक असण्याशिवाय, अशा आजारांवरील उपाय म्हणूनही कंडोमचा वापर करण्यात येतो. म्हणूनच १९९२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेपासून, खेळाडूंना कंडोम वाटण्याची सुरुवात झाली.

थोडक्यात काय, तर ऑलिम्पिक स्पर्धा आणि खेळाडूंची अय्याशी, शारीरिक संबंध, हे काही नवीन नाही. २०१० च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत तर फारच, अजब प्रकार घडला होता. या स्पर्धेच्यावेळी चक्क गावांमधील ड्रेनेज व्यवस्था तुंबण्याची नामुष्की ओढवली होती. याचं कारण होतं, ते म्हणजे त्यात वाहून गेलेली कंडोम्स!

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये अजब फतवा

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये एक अजबच निर्णय घेतला गेलाय. खेळाडूंसाठी ज्या बेड्सची व्यवस्था करण्यात येते, ते बेड्स ‘अँटी सेक्स’ असणार आहेत. आता हे अँटीसेक्स बेड्स म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे, आणि हे असं का केलं गेलंय, हा तर चर्चेचा विषय ठरलाच आहे.

 

 

हे अँटी-सेक्स बेड्स देण्याचं मुख्य कारण हेसुद्धा आहे, की कोरोनाचे नियम पाळले जावेत. होय, अगदी बरोबर वाचलंय तुम्ही. कोरोना काळात सुरक्षित राहण्यासाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे ‘सुरक्षित अंतर राखणं’, अर्थातच सोशल डिस्टंसिन्ग! खेळाडूंनी शारीरिक संबंध ठेऊन जवळीक वाढवू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

बेड्स नक्की कसे आहेत?

हे बेड्स पुठ्ठे आणि कार्डबोर्ड यांचा वापर करून बनवण्यात आले आहेत. साहजिकपणे फार वजन पेलू शकण्याची क्षमता त्यांच्यात नसणार, हे वेगळं सांगायला नको. एकावेळी एकाच माणसाचं वजन पेलण्याची क्षमता या बेड्समध्ये आहे. दुसरं माणूस या बेडवर बसूही शकणार नाही. म्हणजे सेक्ससाठी शारीरिक संबंध तर दूर, पण या बेडवर एकत्र बसणं सुद्धा अशक्य आहे.

या सगळ्याचा विचार केला, तर या बेडला अँटी सेक्स बेड असं नाव देण्यात आलं असलं, तरीही त्याचा उद्देश केवळ खेळाडूंनी सेक्स करण्यावर नियंत्रण ठेवावं एवढाच नाहीये, असंही नक्कीच म्हणता येईल. हे असं म्हणणं चुकीचं ठरणारच नाही, हे नक्की…

 

 

अचानक घडलेली हालचाल, बेडवर अचानक पडणारा जोर यामुळे हा बेड थेट तुटून जाऊ शकतो. म्हणजे या बेडवर जे काही करायचंय ते जपूनच करावं लागणार. अर्थात, हे मोडलेला बेड पुन्हा जोडला जाऊ शकतो, म्हणजेच रिसायकल होऊ शकतो.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बनवलेली नवी ऑलिम्पिक नियमावली योग्यप्रकारे पाळली जातेय का, हे तपासणं, हाच असे बेड निर्माण करण्याचा मूळ उद्देश असल्याचं स्पष्ट आहे.

===

हे ही वाचा – त्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेट होतं; पण आज मात्र स्थान नाही! वाचा यामागची कारणं

===

विनोदी शैलीत थट्टा…

मागील ऑलिम्पिक स्पर्धेतील ५००० मीटर शर्यतीचा रौप्यपदक विजेता पॉल चेलिमो याने याविषयी ट्विट करत या निर्णयावर विनोदी पद्धतीने भाष्य केल्याचं पाहायला मिळतंय.

 

 

कार्डबोर्डपासून बेड बनवण्यात येणार आहेत, ज्यामुळे खेळाव्यतिरिक्त इतर गोष्टींवर नियंत्रण ठेवणं शक्य होईल, असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटर थ्रेडचा वापर करून, या खेळाडूने निराळ्या कोपरखळ्या मारलेल्या पाहायला मिळत आहेत.

 

 

“मला आता जमिनीवर झोपण्याची सवय करायला हवी, कारण बेड मोडला तर मला जमिनीवर झोपायला लागणार आहे, ज्याचा सराव मी केलेला नाही.” अशी प्रतिक्रिया देत, पॉलने कमाल केली आहे.

खरंच फायदा आहे का?

पाश्चिमात्य संस्कृती, छोट्यामोठ्या देशांमधून तिथे येणारे खेळाडू असा माहोल नेहमीच ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळतो. यंदा ही स्पर्धा टोकियोमध्ये होणार आहे. जपान सुद्धा बिनधास्त संस्कृतीच्या बाबतीत मागे नाही. त्यामुळे हे प्रकार इथेही घडू शकतात, या शंकेला वाव आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, तो म्हणजे खेळाडूंना देण्यात येणारी कंडोम्स, ही सुरुवातीलाच वापरण्याची परवानगी नसून, टोकियो सोडल्यानंतर घरी जाऊन त्याचा वापर करावा असं सांगण्यात आलं आहे.

‘एचआयव्हीविषयी प्रबोधन’ करणं हाच कंडोम्स वाटण्याचा उद्देश असल्यामुळे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय योग्य ठरणार आहे.

 

 

अर्थात, असं असलं तरीही फुकट कंडोम वाटल्यानंतर अँटी सेक्स बेड्सचा वापर खरोखरंच फायदेशीर ठरणार का, हा प्रश्न आहेच. ज्यांना शारीरिक संबंध ठेवायचेच असतील, अय्याशी करायचीच असेल त्यांना त्यासाठी खरंच बेड्सची आवश्यकता भासेल का?

टेबल, खुर्ची किंवा तत्सम इतर साधनांचा वापर करणं अशक्य नक्कीच नाही. अगदीच काही नाही, तरी जमिनीवर सुद्धा शारीरिक संबंध ठेवणं अशक्य आहे का? ज्यांना खेळाव्यतिरिक्त इतर गोष्टी करायच्याच असतील, त्यांना ते करणं अगदीच अशक्य आहे का?!

 

 

आता या अँटी सेक्स बेड्सचा सोशल डिस्टंसिन्गसाठी खरंच फायदा होईल का, खेळाडूंच्या अय्याशीला खरंच आळा बसेल का, हे तर येणारा काळच ठरवेल. मात्र सध्या तरी हा चर्चेचा विषय झालाय हे मात्र खरं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version