नेटकऱ्यांचा अनुपम खेर यांच्यावर निशाणा! पण लता दीदींनी खरंच अभिनय केलाय…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
अनुपम खेर हे व्यक्तिमत्व चर्चेत आलं नाही, असे फार कमी दिवस जात असतील नाही का? विशेषतः ट्विटरवर काही ना काही टिपण्णी करणं आणि त्यातून होणारे वादंग, हेदेखील त्यांच्यासाठी नवीन नाहीत. आता पुन्हा एकदा अनुपम खेर त्यांच्या एका ट्विटमधून चर्चेत आलेले आहेत.
अनुपम खेर यांनी फोटोसह एक ट्विट केलं आहे. दिलीप कुमार हे एका स्त्रीसोबत बोलताना या फोटोमध्ये पाहायला मिळत आहेत. ही स्त्री नेमकी कोण आहे, असा प्रश्न विचारताना अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये ‘अभिनेत्री’ असा उल्लेख केल्यामुळेच, या ट्विटला नेटकऱ्यांनी रडारवर घेतलेलं दिसतंय.
पाठमोरी दिसणारी ही महिला, त्यांची साडी आणि केसांची ठेवण पाहता, लता दीदी आहेत, हे लक्षात येतंय. त्यामुळे त्यांचा अभिनेत्री असा उल्लेख करणं योग्य नाही, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. बघुयात हे नेटकरी नेमकं काय म्हणतायत…
ती महिला म्हणजे लता दीदी आहेत असं म्हणताना, त्या नेहमीच भारतीय संस्कृतीचं प्रतीक असणारा वेष परिधान करतात असंही इथे म्हटलंय.
लता मंगेशकरजी अभिनेत्री नाहीत, अशी शंकाही इथे लगेचंच व्यक्त करण्यात आलेली पाहायला मिळतेय.
पहिल्यांदा बघितल्यावर त्या लता दीदी वाटतात, पण मग अभिनेत्री हा शब्द वापरणं काहीसं गोंधळात टाकणारं आहे, अशी प्रतिक्रिया सुद्धा पाहायला मिळतेय. याला उत्तर म्हणून, त्या लताजी असत्या तर असा प्रश्नच विचारला नसता असंही एका वाचकाने म्हटलंय.
ही चर्चा केवळ लता दीदींपर्यंत सीमित राहिली नाही, तर दिलीप कुमार यांच्या धर्माविषयी आणि नावाविषयी व्यक्त होण्याची संधी सुद्धा सोडलेली दिसत नाही.
विनाकारण टीका करणारी मंडळी कधी कुठला मुद्दा उचलून धरतील, सांगता येत नाही. युसूफ खान असं त्यांचं खरं नाव आहे ते दिलीप कुमार नाहीत असं म्हणत अनुपम खेर यांना लक्ष्य केलं जातंय.
आता एकदा ट्रोल करायचं ठरवलं, की माणूस कुठल्या विषयावर बोलेल देवच जाणे. बघा बरं हे ट्रोलर काय म्हणतायत.
वैयक्तिक पातळीवर टीका करून थेट अनुपम खेर यांचीच मस्करी करणारी ही मंडळी चूक आहेत की बरोबर हे ज्याचं त्यांनी ठरवावं…
अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर या भारतीय जनता पार्टीच्या खासदार होत्या, आणि अनुपमजी स्वतः भाजप समर्थक आहेत. त्यामुळे मग त्यांच्या पक्षपातीपणावर तोंडसुख घेण्याची संधी सोडली जात नाही.
त्यांनी पेट्रोलच्या वाढत्या दरांविषयी सुद्धा बोलायला हवं असं आवाहनच यातून केलेलं दिसतंय.
ही परिस्थिती तर झाली ट्विटरवरची. पण यात जो प्रश्न किंवा जी शंका उपस्थिती केलेली दिसतेय, त्याबद्दल बोलू. ती महिला लता मंगेशकर असेल, तर त्यांचा उल्लेख अभिनेत्री म्हणून का केला गेलाय? आता हे जर तुम्हालाही माहीत नसेल, तर खास तुमच्यासाठी सांगतो, की लता दीदी यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ही गायिका म्हणून नव्हे, तर अभिनेत्री म्हणून केली होती.
===
हे ही वाचा – अनुपम खेर यांचं ‘मोदी’ समर्थनातील एक विधान अनेकांना खटकलं आहे!
===
लता दीदी आणि अभिनय
आज गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लता मंगेशकर यांचे वडील म्हणजेच पंडित दीनानाथ मंगेशकर. लता दीदी घडल्या, त्यांच्यावर कलेचे संस्कार झाले ते दीनानाथ मंगेशकर यांच्या अखत्यारीत. लता दीदी यांच्या कलाक्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात सुद्धा त्याचवेळी झाली असं म्हणता येईल.
दीनानाथजी उत्तम कलावंत होते. ते शास्त्रीय संगीत, संगीत नाटकांचे अनेक कार्यक्रम करत असत. त्यांची ज्येष्ठ कन्या असणारी लता, त्यांच्यासोबत काम करू लागली. वयाच्या पाचव्या वर्षीपासूनच त्यांनी कलाक्षेत्रात पाऊल ठेवलं.
दीनानाथ मंगेशकर जी संगीत नाटकं सादर करत असत, त्यात छोट्या लता दीदी काम करत. म्हणजेच त्यांनी अभिनय सुरु केला होता, तो चक्क एक बालकलाकर म्हणून…
लता मंगेशकर अवघ्या १३ वर्षांच्या होत्या, त्यावेळी त्यांचे वडील स्वर्गवासी झाले. भावंडांमध्ये सर्वात मोठ्या असल्याने त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. त्यावेळी नाट्यगृहातून त्या हिंदी आणि मराठी चित्रपटांकडे वळल्या. काही चित्रपट करण्याची संधी त्यांना मिळाली मात्र तिथे त्यांना विशेष छाप पाडता आली नाही.
अभिनयऐवजी त्यांनी पार्श्वगायनाची वाट धरण्याचं ठरवलं. त्यांचं पहिलं मराठी गाणं मात्र कधीही रिलीज होऊ शकलं नाही. मात्र १९४३ साली हिंदी सिनेमात पार्श्वगायक म्हणून त्यांना यश मिळालं. या वळणावर पोचलेल्या लता दीदींनी त्यांनतर मात्र कधीही मागे वळून पाहिलं नाही.
आज गानकोकिळा म्हणून अवघं जग त्यांना ओळखतं. त्यांच्या गायनकलेचा आदर केला जातो. वडिलांच्या छत्रछायेत अभिनय करणारी लता, आता अवघ्या भारतवर्षासाठी भारतरत्न लता मंगेशकर आहेत.
===
हे ही वाचा – आशाताई ‘रियाज’ करत होत्या, आणि ड्रायव्हरने विचारलं “डॉक्टरकडे जायचंय का?”
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.