Site icon InMarathi

सध्या ‘ट्रोल’ होणाऱ्या मराठी मालिकांची भुरळ इतर भाषांनाही पडली होती

star pravah seria inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सोशल मीडियावर सध्या मराठी मालिकांवर जोरदार टीका होताना दिसते आहे. प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार मराठी मालिका आता अत्यंत दर्जाहीन, एकसारख्या पटकथा असलेल्या होत चालल्या आहेत.

एक गरीब कुटुंबातील स्वाभिमानी नायिका, अशिक्षित किंवा मोठ्या श्रीमंत घरातील नायक, त्यांचे काही तरी करून एकत्र येणे, आणि नायकाच्या घरच्यांचा याला विरोध, नायिकेचे सतत स्वाभिमान जपणे हा एक विषय किंवा दुसरा नवऱ्याची बाहेर लफडी असणे आणि नायिकेने नंतर त्याला उत्तर देणे, कट- कारस्थाने हे सगळे सध्या प्रत्येक दुसऱ्या मालिकेत सुरु आहे.

 

 

या रटाळ मालिकांमुळे कंटाळलेल्या प्रेक्षकांना वादळवाट, अभाळमाया, असंभव, घडलंय बिघडलंय या दर्जेदार आणि निराळे विषय असलेल्या मालिका आजही आठवतात. पण एक अशीही गोष्ट बघायला मिळते आहे की, या मालिकांनी जो दर्जा मिळवून दिलाय तिथपर्यंत पोहोचणे आजच्या मालिकांना शक्य नसले तरीही ह्या नवीन मालिकांपैकी काही मालिका फार लोकप्रिय होतायत, हिट होतायत.

प्रेक्षकांना त्या इतक्या भावल्या आहेत की चक्क त्यांचे हिंदी मालिकांमध्ये रिमेक करण्यात येतायत. पण हे काही नवीन नाही. या आधीही काही जुन्या गाजलेल्या मराठी मालिकांचे हिंदी रिमेक करण्यात आले होते.

आश्चर्य वाटलं ना? कारण आज पर्यंत आपण हिंदी मालिकांचे मराठी मालिकांमध्ये केलेले रिमेक पाहिले पण मराठी प्रादेशिक वाहिन्यानवरील मालिका सुद्धा आजकाल तितक्याच हिट होताना दिसतायत आणि ह्या सगळ्या लेटेस्ट मराठी मालिकांचे हिंदी मालिकांमध्ये रिमेक आणि डबिंग करण्यात येतायत.

कोणत्या आहेत ह्या मालिका जरा ते आपण बघूया.

१)  होणार सून मी ह्या घरची 

श्री आणि जान्हवी ही नावं उच्चारली तरी गोखल्यांचं घर, सहा सासुबाईंची गंमत आणि अडचणीतून वाट काढणारे शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान हे चित्र आपोआप डोळ्यासमोर उभं राहतं.

 

 

वारंवार वेगवेगळी वळणं घेणारी ही मालिका मराठी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेवर इतका कौतुकाचा इतका वर्षाव करण्यात आला होता की मालिकेचा वाढता टी आर पी पाहून, झी टीव्ही ने याच कथेवर आधारित ‘सातरंगी सासुराल’ हा रिमेक बनवला.

 

 

या मालिकांवरून प्रेरित होऊन मराठी कलाकारांना वाव देण्यासाठी ह्या दरम्यान दोन मराठी मालिकांचं हिंदीत डबिंग करण्यात आलं होतं. त्या दोन मालिका होत्या स्पृहा जोशी आणि उमेश कामत यांची ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ आणि प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकरची ‘जुळून येती रेशीमगाठी’!

 

 

या मालिकांमुळे मराठी कलाकारांना पूर्ण भारतात आपलं स्थान निर्माण करण्याची एक संधी मिळाली होती.

 

२) तुला पाहते रे:

आणि डॉ काशिनाथ घाणेकर चित्रपटाच्या यशानंतर सुबोध भावे पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवला होता. तुला पाहते रे या मालिकेद्वारे त्याने पुन्हा एकदा मालिकाविश्वात पदार्पण केले होते. नवोदित अभिनेत्री गायत्री दातार आणि सुबोध भावेची केमिस्ट्री चांगली जुळून आली होती. याच मालिकेचे अनुक्रमे सहा भाषेत रिमेक करण्यात आले होते.

 

 

 

३) तुझ्यात जीव रंगला :

शहरी प्रेक्षकांच्या बरोबरीने गावाकडच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी झी ने तुझ्यात जीव रंगला ही मालिका सुरु केली होती. कोल्हापूरच्या मातीतला पैलवान एका शिक्षकेच्या प्रेमात पडतो, अशी कथा असणारी ही मालिका, सोबतीला अस्सल कोल्हापुरी भाषेतील ठसकेदार संवाद यामुळे ती प्रेक्षांच्या पसंतीस उतरली. कोल्हापूरचे कथानक असलेली ही मालिका सुद्धा कन्नड भाषेत जोडी हके या नावाने दाखवली गेली.

 

 

हे ही वाचा – ‘ते’ मूर्ख बनवणार आणि आपण बनत राहणार! ‘सो कॉल्ड नवी मालिका’ही त्याच वळणावर

४) आई कुठे काय करते 

स्टार प्रवाहवरील अरुंधती देशमुख सध्या सगळ्यांच्याच घरा घरात पोहोचली आहे. रोज संध्याकाळी ७.३० वाजता न चुकता सगळे ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आवर्जून बघतात.

एक आई आपलं व्यक्तिगत अस्तित्व विसरून, स्वतःची स्वप्न बाजूला सारून घर कसं सांभाळते, घराचं घरपण जपण्यात ती इतकी व्यस्त असते, की सगळे तिला गृहीत धरायला लागतात मात्र त्यातून ती आपली वेगळी वाट कशी शोधते हे वास्तव ह्या मालिकेत ठळकपणे मांडलं गेलं आहे.

 

 

मराठी वाहिन्यांवरील नंबर एक वर असणा-या या मालिकेची भुरळ हिंदी मनोरंजन क्षेत्रालाही पडल्याने हिंदीमध्ये ‘अनुपमा’ नावाने ह्या मालिकेचा रिमेक करण्यात आला.

 

 

रुपाली गांगुली ह्या मालिकेत अनुपमाच्या मुख्य भूमिकेत आपल्याला बघायला मिळते आहे.

५) रंग माझा वेगळा 

 

 

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिकासुद्धा सध्या प्रचंड चर्चेत आहे. एखाद्या व्यक्तीचा रंग ती व्यक्ती स्वतः नाही तर निसर्गाने त्याला दिलेली देणगी असते आणि यामुळे कुठलाच रंग वाईट नसतो. रंगावरून केला जाणारा भेदभाव कायमचा संपवून व्यक्तीचं मन किती स्वच्छ आहे हे आपण बघायला हवं, हा संदेश मालिकेव्दारे दिला जातो.

 

 

एकंदरित या विषयाने प्रेक्षकांना आकर्षित केल्याने या मालिकेचा रिमेक ‘कार्तिक पूर्णिमा’ या नावाने हिंदी वाहिनीवर करण्यात आला आहे.

६) सहकुटुंब सहपरिवार

 

 

विभक्त कुटुंबाच्या गर्दीत दुर्मिळ झालेल्या एकत्र कुटुंबाची कथा आणि व्यथा मांडणारी ही मालिका सध्या स्टार प्रवाहवर यशस्वी घोडदौड करतीय. या मालिकेतील सुर्या आणि सरिता या जोडीची गोष्ट हिंदीतील रिमेकमध्ये दाखवली जाणार आहे.

 

 

आपलं वेगळेपण दाखवण्यासाठी ‘पंड्या स्टोर’ या रिमेकमध्ये लग्नाआधीपासून कथा रंगवण्यात आली आहे. मात्र एकंदरित कथा, आशय, पात्र हे सारं काही मराठी मालिकेवर बेतलं आहे.

७) जीव झाला येडापीसा

रांगड्या प्रेमाची गोष्ट सांगणारी या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. शिक्षणाची आवड असणारी सिद्धी आणि रांगडा शीवा यांच्या कथेत कधी गावातील राजाकरण आलं तर कधी कौटुंबिक कलह!

अवघ्या काही महिन्यांपुर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आता हीच कथा हिंदी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

 

 

मराठी मालिकेला मिळालेले यश लक्षात घेऊन कलर्स हिंदी वाहिनीवर या कथेवर आधारित मालिका सुरु होणार आहे.

८) राजा राणीची गं जोडी

 

 

फौदाराची वेंंधळी बायको ते थेट पोलिस ऑफिसर असा लांबचा पल्ला गाठणा-या संजुची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहेच मात्र राणीइतकाच समजुतदार राजालाही महिला वर्गाची पसंती मिळत आहे.

 

 

राजा राणीची ही भन्नाट जोडी आता मराठमोळ्या प्रेक्षकांसह तामीळ प्रेक्षकांनाही एन्जॉय करता येणार आहे.

ही झाली मराठी मालिकांची गोष्ट. पण अनेक प्रादेशिक मालिकांचे रिमेक्स आता हिंदी मालिकांमध्ये करण्यात येत आहेत.

इमली- इस्टी कुटुम (बंगाली)

शौर्य और अनोखी की कहानी – मोहोर (बंगाली)

गुम है किसी के प्यार में- कुसुम डोला (बंगाली)
साथ निभाना साथिया २- के आपोन पोर (बंगाली)
पवित्र रिश्ता- थिरुमथी सेल्वम (तमिळ)
हे ही वाचा – आताच्या टुकार मालिका सोडा.. या १० मराठी सिरीयल आजही आवर्जून बघा!!!
गुप्ता ब्रदर्स – के वादिनम्मा (तेलुगु)

तुम्हाला या पैकी कुठली मालिका आवडते किंवा कोणत्या हिंदी मालिकेचा मराठीत रिमेक पहायला आवडेल ते आम्हाला नक्की कळवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version