Site icon InMarathi

तैमुरच्या ‘हिंदू’ आईने लिहिलंय गरोदरपणावर ‘बायबल’: करीनाचा अजबच पब्लिसिटी स्टंट

kareena featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि पतौडी खानदानाची सून करीना कपूर खान ही तिच्या अभिनयाइतकीच तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळेही चर्चेत असतेच. शाहिद कपूरसोबतच्या एमएमएस पासून सैफसोबत लग्नापर्यंत करीनाच्या प्रत्येक गोष्टीची न्यूज झाली.

अर्थात लाईम लाइटमध्ये राहणं तिला पसंत आहे त्यामुळेच तिला बॉलिवूडची गॉसिप गर्लही म्हंटलं जातं. लग्नानंतरसुद्धा तिला प्रचंड ट्रोल केलं गेलं. लव्ह जिहाद असो, तिच्या शारीरिक आकारावर टिप्पणी असो किंवा आपल्या मुलाचं तैमुर असं नामकरण करणं असो.

 

 

सतत चर्चेत राहण्यासाठी करीना आणि सैफ यांनी जे जे शक्य होईल ते ते सगळं केलं. नुकतंच करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिलेला असून त्याच्या नावावरूनही प्रचंड उलट सुलट चर्चा होताना दिसत आहे.

हे ही वाचा ‘विवाहानंतरच मातृत्व’ : या सामाजिक बंधनाला झुगारणाऱ्या ७ ‘खऱ्या बोल्ड’ अभिनेत्री!

पण सध्या करीना चर्चेत येण्याचं कारण फार वेगळंच आहे, करीनाने चक्क एक पुस्तक लिहिलं आहे आणि त्या पुस्तकाच्या नावावरून सगळीकडेच वातावरण तापलेलं आहे. तिच्या या पुस्तकाचं नाव आहे ‘Kareena Kapoor Khan : Pregnancy Bible’!

या नावातल्या ‘बायबल’ या शब्दामुळे सध्या एकच हलकल्लोळ माजला आहे. देशातले मायनॉरिटीज ख्रिश्चन लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याने त्यांनी याच्या विरोधात आवाज उठवला आहे.

 

 

वयाच्या चाळीशीमध्ये आल्यावर २ मुलांना जन्म दिल्यानंतर करीनाने गरोदरपणाचा तिचा अनुभव तिने यात मांडला असून, तिला शारीरिक आणि मानसिक पातळीवर कसं वाटत होतं याविषयी तिने या पुस्तकात सविस्तर भाष्य केलं आहे.

एका अर्थी बघायला गेलं तर गरोदरपणाचा अनुभव आणि काही खास टिप्सच या पुस्तकाच्या मध्यमातून करीना आपल्यासोबत शेअर करू पाहतीये.

पण हे सगळं होऊनही त्या पुस्तकाच्या नावामुळे बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भगवद्गीता हा जसा आपल्या हिंदू लोकांचा पवित्र ग्रंथ आहे, कुराण जसं इस्लाममध्ये पवित्र मानलं जातं तसंच ख्रिश्चन लोकांसाठी बायबल हे पवित्र असतं, त्याचा संबंध थेट ईश्वराशी असतो.

 

 

आणि याबाबतीत जर कुणी त्या ग्रंथाच्या नावाचा वापर करून स्वतःची पोळी भाजून घेत असेल तर ते चुकीचंच आहे. करीनाच्या या पुस्तकाच्या नावामुळे महाराष्ट्रात तिच्यावर धार्मिक भावना दुखावण्याच्या अंतर्गत केस करण्यात आली आहे.

बीडच्या शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये ‘अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ’चे प्रेसिडेंट आशिष शिंदे यांनी याविरोधात तक्रार नोंदवली असून या पुस्तकाची सहलेखिका आणि प्रकाशक यांच्यावरही तक्रार करण्यात आली आहे.

आशिष शिंदे यांची तक्रार लिहून घेतली असली तरी अजून अधिकृत FIR दाखल केलेली नाही असं बीडच्या पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे इनचार्ज साईनाथ ठोंबरे म्हणतात की – “आम्ही तक्रार स्वीकारली जरी असली तरी ही घटना इथे घडली नसल्याने इथे त्याबद्दल अधिकृत FIR करता येणार नाही. आम्ही तक्रार शिंदे यांना मुंबईत तक्रार करण्याचा सल्ला दिलेला आहे!”

एकंदरच या सगळ्या गोष्टीमुळे सोशल मीडियावर सगळेच व्यक्त होत आहे. pregnancy bible च्या ऐवजी pregnancy quran असं नाव करीनाला का सुचलं नाही असा सवालही लोकं करताना दिसत आहे.

 

 

कितीही नाही म्हंटलं तरी हा एक पद्धतशीरपणे ठरवून केलेला स्टंट आहे यात तर काहीच वाद नाही, कारण एवढं मोठं पाऊल उचलताना कोणताही माणूस हजारवेळा विचार करेल, इथे तर सेलिब्रिटीजसुद्धा जाणून बुजून असे वागतात मग काय म्हणायचं.

क्रूर मुस्लिम शासकाचं नाव आपल्या मुलाला देणं इतपतही लोकांनी खूप सहन केलं, पण आता पाणी डोक्यावरून गेलं आहे, कोणत्याही धर्माच्या पवित्र ग्रंथाला लागणारा हा धक्का किती मोठं नुकसान करणार आहे आत्ता आपल्याला कळणार नाही.

या गोष्टीचा विरोध व्हायलाच हवा कारण आज करीना आहे उद्या कोणी आणखीन उठून काहीतरी इतर धर्माबद्दल बोलेल आणि हे सगळं असंच सुरू राहील.

 

 

भारत हा कितीही धर्मनिरपेक्ष देश असला तरी इथे आपण प्रत्येक जातीचा धर्माचा तेवढाच मान ठेवतो त्यामुळे करीनाच्या या पुस्तकावरून उद्भवणारे वाद हे काही चुकीचे नाहीत आणि याला सर्वस्वी जवाबदार आहेत ते हे कलाकार आणि त्यांचे हे छुपे अजेंडे!

===

हे ही वाचा ‘कपूर अण्ड सन्स’ चे हे २७ दुर्मिळ B&W फोटो चित्रपटप्रेमींनी पहायलाच हवेत

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version