दोन्ही हात गमावलेला क्रिकेटपटू – काश्मीरचा आमीर हुसैन
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
भारताचा (अघोषित) राष्ट्रीय खेळ कोणता? असं विचारल्यास पट्कन क्रिकेट असं उत्तर येतं. सगळ्यांनाच झपाटलंय ह्या खेळाने. वय, सीमा, जात, धर्म असली सगळी बेगडी बंधनं झुगारून हा खेळ भारतात सगळ्या थरांत पोहोचलाय.
असाच एक क्रिकेटपटू – ठार सचिनवेडा – आमीर हुसैन नाव त्याचं, जम्मू काश्मीर मधल्या अनंतनाग जिल्ह्यातील रहिवासी.
वयाच्या नवव्या वर्षी वडिलांच्या लाकडाच्या कारखान्यात एका अपघातात दोन्ही हात गमावून बसलेला आमीर, आधीपासूनच क्रिकेट चा चाहता आहे.
आमीर च्या उपचारासाठी त्याच्या वडिलांना त्यांचा लाकडाचा कारखाना विकावा लागला. तीन वर्षांच्या उपचारानंतर जेव्हा आमीर पुन्हा शाळेत गेला तेव्हा त्याला त्याच्या शिक्षकांनी शाळेत नं येण्यास सांगितले. तिथूनच त्याचा ‘स्वावलंबनाचा’ मार्ग सुरु झाला. त्याने अक्रोड विकत विकत अभ्यासासाठी आणि क्रिकेटच्या सरावासाठी मेहनत घेतली. स्वतःची एक विशिष्ट अशी स्टाईल विकसित केली.
आमीर त्याच्या उजव्या पायाने बोलिंग करतो. दोन्ही हात गमावले असले तरी आमीर अनंतनाग मधला एक चांगला बॉलर आहे. बॅटींग करतांना आमीर बॅट गळा आणि दावा खांदा ह्यांमध्ये पकडतो.
आणि हो – आमीर “Jammu and Kashmir state para-cricket team” चा कॅप्टन आहे.
तो स्वप्न बघायचा इथेच थांबला नाहीये.
त्याला सचिन सारखं खेळायचंय, देशासाठी खेळायचंय.
जिद्द, चिकाटी, Positive Attitude आणि घरच्यांचा आधार ह्या बळावर आमीर ने तर जग जिंकायला सुरुवात केलीये, चला तर मग घेऊया त्याच्याकडून प्रेरणा? 🙂
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi