Site icon InMarathi

आशाताई ‘रियाज’ करत होत्या, आणि ड्रायव्हरने विचारलं “डॉक्टरकडे जायचंय का?”

asha bhosle featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोणतीही कला सादर करण्यासाठी त्याची रंगीत तालीम ही सर्वात जास्त आवश्यक असते. सध्या टीव्हीवर सुरू असलेल्या गाण्यांच्या विविध रिऍलिटी शोजमधून आपण बघतो की, कमी वयाचे मुलं मुली खूप छान गात आहेत.

गाणं गाण्यासाठी मुळात आवाज चांगला असावा लागतो, गळ्यात एक फिरत असावी लागते. हे ज्या व्यक्तींमध्ये उपजत असतं ते गायन क्षेत्राकडे वळतात, संगीत गुरूंकडून शिक्षण घेतात आणि लोकांना आनंद देतात.

भारतात संगीत लोकप्रिय होण्यात लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचा फार मोठा वाटा आहे. गोड आवाज, सततचा ‘रियाझ’ आणि गायन कलेबद्दलचं प्रेम यामुळे हे घराणं येणाऱ्या कैक पिढ्यांसाठी एक आदर्श असणार यात शंकाच नाही.

 

 

आशा भोसले यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत की, हा त्यांचाच आवाज आहे हे कधी खरं वाटत नाही.

हे ही वाचा यशाचा गर्व आणि अपयशाचं भांडवल न करणाऱ्या सदाबहार आशाताईंच्या ६ रंजक गोष्टी!

‘केव्हा तरी पहाटे…’ सारखं संथ गाणारी गायिका ‘एकदम खल्लास…’ हे झटपट गाणं पण गाऊ शकते हे एक आश्चर्य आहे. कोणत्याही ‘बाझ’मध्ये अडकून न राहणे हाच त्यांचा ‘बाझ’ आहे असं म्हणता येईल.

जवळपास ५० वर्षांपासून संगीत क्षेत्रात आपलं योगदान देणाऱ्या आशा भोसले यांना आजही त्याच उत्साहाने गाणं गातांना बघणं हे प्रेरणादायी आहे.

मध्यंतरी एका वहिनीला दिलेल्या मुलाखतीत आशा भोसले यांनी त्यांच्या “आजा आजा मै हूं प्यार तेरा… अह अह आ जा… ” या लोकप्रिय गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळचा एक किस्सा सांगितला होता.

 

 

आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं गाण्यासाठी खूप श्वासाची आवश्यकता होती. आर डी बर्मन हे असे संगीतकार होते की, ते प्रत्येक उपलब्ध रिसोर्सचा पुरेपूर वापर करून घ्यायचे. गाणं समेवर येतांना गायकांचा श्वास हा सुद्धा त्यांच्या या गाण्याचा संगीताचाच भाग होता.

आशा भोसले कोणत्याही गाण्याचं फायनल रेकॉर्डिंग करण्याआधी त्यातील बारकाव्यांचा सराव करत असतात. “आजा आजा मै हूं प्यार तेरा… अह अह आ जा… ” या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या दिवशी लागणाऱ्या अतिरिक्त श्वासाचा त्यांनी काही दिवसांपूर्वी सराव सुरू केला होता.

आपल्या कारमधून जात असतांना त्या रोज दीर्घ श्वसन करायच्या आणि गाण्याच्या गरजेप्रमाणे श्वास जोरात सोडायच्या. हा प्रकार ३-४ दिवस सुरू होता.

एक दिवशी आशा भोसले या हाजी अली येथे त्यांच्या घराजवळ असतांना त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना न राहवून विचारलं की, “मॅडम, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत आहे का? इथे जवळच हॉस्पिटल आहे. आपण तुमची तब्येत दाखवून घेऊ.”

आशा भोसले हा प्रश्न ऐकून खूप हसल्या आणि त्यांनी ड्रायव्हरला गाण्याबद्दल सांगितलं आणि संगीतकार आर डी बर्मन यांना त्यांच्या आवाजातून काय अपेक्षित आहे हे सुद्धा सांगितलं.

 

 

१९६६ मध्ये तिसरी मंजिल या सिनेमाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी झालेला हा किस्सा आजही त्यांच्या लक्षात आहे यातच त्यांचं आपल्या कलेवर किती प्रेम आहे हे दिसून येतं. मोहम्मद रफी यांच्यासोबत हे ड्युएट गाणं त्यांनी दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग केलं आणि गाणं सुपरहिट झालं.

आशा भोसले यांनी या गाण्याबद्दल सांगितलेली अजून एक आठवण सांगितली होती. “आर डी बर्मन यांनी सर्वप्रथम जेव्हा हे गाणं कसं असेल असं सांगितलं तेव्हा मला प्रचंड दडपण आलं होतं. मी लता दीदी सोबत बोलायला तिच्याकडे गेले होते.”

लता मंगेशकर यांनी तेव्हा हे गाणं ऐकलं आणि त्याबद्दलची पूर्ण भीती आशा भोसलेंच्या मनातून काढून टाकली.

लता मंगेशकर यांनी सांगितलं की, “तू हे गाऊ शकतेस म्हणून हे गाणं तुझ्याकडे आलं आहे. तू चांगलंच गाशील. एक विसरू नको की तू सुद्धा आधी ‘मंगेशकर’ आहेस आणि मग ‘भोसले’. सरस्वतीची सेवा करणं हे आपल्या घरण्याचं कर्तव्य आहे. आपण तेच करत आहोत. निर्भय होऊन रेकॉर्डिंग कर.”

 

 

नवीन होतकरू कलाकारांनी यामधून ३ गोष्टी शिकण्यासारख्या आहेत :

१. सरावाशिवाय काहीच सर्वोत्तम होऊ शकत नाही.

२. आपल्याला कोणत्या गोष्टीचं दडपण आलं असेल तर ते स्वतःपुरतं मर्यादित ठेवू नका. तुम्ही ज्या लोकांना मानतात त्यांच्याशी बोला. मार्ग सापडेल.

३. एखादं गाणं किंवा कोणतंही काम “मला का मिळालं नाही ?” फक्त हाच विचार करण्यापेक्षा ज्याला ते काम मिळालं आहे तो ते सर्वोत्तम कसं करेल यासाठी मदत करत रहा. ती खरी कलेची सेवा आहे.

===

हे ही वाचा आर डी… आगे भी होगा जो उसका करम!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version