' भाजपच्या या १० आमदारांनी स्वतःच कुटुंब नियोजन विधेयकाची खिल्ली उडवली आहे – InMarathi

भाजपच्या या १० आमदारांनी स्वतःच कुटुंब नियोजन विधेयकाची खिल्ली उडवली आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हाची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या यात १२.५ % वाढली आहे आणि एका अहवालानुसार येत्या दहा वर्षांत सुद्धा लोकसंख्या ८% ने वाढणार आहे.

आज आपल्या देशात कोरोनाने लोकांचे जगणे मुश्किल आहे, पण आपला सर्वात मोठा क्षत्रू म्हणजे आपली वाढणारी लोकसंख्या, लोकसंख्या नियंत्रणात असल्यास आपले अनेक प्रश्न कमी होतील.

लोकसंख्या नियंत्रणावर चक्क आता उत्तर प्रदेश सरकारने पाऊले चालली आहेत. योगी सरकारने आता कुटुंब नियोजनाचा घाट घातला आहे ज्या व्यक्तीला दोन पेक्षा अधिक मुले असतील त्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही.

उत्तर प्रदेश सरकारने घेतलेला हा निर्णय नक्कीच एक सकारात्मक आहे मात्र आज उत्तर प्रदेशच्या अनेक आमदारांनाच दोनच्या वर अपत्य आहेत. हे विधेयक उत्तर प्रदेशच्या विधासभेत सादर करण्याची जबाबदारी सोपवली आहे ती अभिनेता रवी किशन यांच्यावर सोपवली आहे. मात्र स्वतः रवी किशन यां ४ मुले आहेत आणि त्यांनी असे विधायक विधासभेत मांडणे म्हणजे हास्यास्पद आहे.

 

ravi kishan inmarathi

 

आज समाजमाध्यमातून रवी किशन यांच्यावर टीका होत आहे, केवळ रवी किशनच नव्हे तर उत्तर प्रदेश विधानसभेतील अर्ध्याहून अधिक आमदारांना दोन पेक्षा अधिक अपत्य आहेत. चला तर मग जाणून घेऊयात नेमके किती आमदार आहेत.

१. रोशन लाल वर्मा :

तिहार भागातून निवडून आलेले रोशन वर्मा यांना तब्बल ८ अपत्य आहेत. त्यात ५ मुली आणि ३ मुले आहेत. त्यांचा एक मुलगा मध्यंतरी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

 

bjp mla inmarathi

 

२. माधुरी वर्मा:

रोशन वर्मा यांच्या पाठोपाठ असलेल्या माधुरी वर्मा यांना ७ अपत्ये आहेत, ज्यातील ६ मुली आहेत आणि एकमेव मुलगा आहे. मध्यंतरी त्यांच्या पतींनी तहसीलदाराला कानाखाली मारल्याने पतीला अटक करण्यात आली होती.

 

bjp mla inmarathi 1

 

३. कुंवार अजय प्रताप सिंग:

कुवर अजय प्रताप सिंग यांना करनैलगंज विभागातले कृष्ण म्हणून ओळखले जातात. वडील राजकारणी असल्याने वडिलांचा वारसा आता ते पुढे चालवत आहेत. त्यांना देखील ६ अपत्ये असून त्यातील ४ मुलगे आणि २ मुली आहेत.

 

bjp mla inmarathi 2

 

४. अस्वस्था बाला प्रसाद:

अस्वस्था बाला प्रसाद हे धौराहरा विभागातुन हे निवडून आले आहेत, त्यांना ६ अपत्ये आहेत ज्यात ३ मुलगे आणि ३ मुली आहेत.

 

bjp mla inmarathi 3

हे ही वाचा – कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यात नेमका फरक काय असतो? जाणून घ्या…

५. कृष्णा पासवान :

आपल्या रोकठोक विधानांमुळे त्या कायमच चर्चेत असलेल्या कृष्णा पासवान यांना, ६ अपत्ये आहेत ज्यात ३ मुली आणि ३ मुलगे आहेत.

 

bjp mla inmarathi 4

 

६.  डॉ. धरमसिंग सायनी:

पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर असलेले धर्मसिंग यांना सुद्धा ४ अपत्ये आहेत ज्यात ३ मुले आणि १ मुलगी आहे. नाकूर विभागातून ते निवडून आलेले आहेत.

 

dharm sing inmarathi

 

७. प्रो. अवदेश सिंग :

पेशाने शिक्षक असेलेले आवडेश सिंग पिंद्रा विभागातून निवडून आलेले आहेत. त्यांना देखील ५ अपत्ये आहेत ज्यात ३ मुली आणि २ मुले आहेत.

 

bjp mla inmarathi 6

 

८. हृदय नारायण दीक्षित:

आणीबाणीच्या काळात अनेकवेळा जेल मध्ये गेलेले हृदय नारायण दीक्षित भगवंतनगर विभागाचे आमदार आहेत. त्यांना देखील ५ अपत्ये आहेत ज्यात तीन मुली आणि २ मुले आहेत.

 

bjp mla 7 inmarathi

 

९. अतुल गर्ग :

अतुल गर्ग यांच्या भावाने त्यांच्यावर मालमत्ता हडपण्याचा आरोप केला होता तेव्हा पासून ते चर्चेत आले होते. त्यांना देखील ३ मुले आहेत ज्यात २ मुलगे आणि १ मुलगी आहे.

 

bjp mla 9 inmarathi

 

 

१०. रवींद्र प्रताप सिंग:

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असलेले रवींद्र प्रताप सिंग यांना देखील ४ अपत्ये आहेत ज्यात २ मुले आणि २ मुली असा परिवार आहे.

 

bjp 22 inmarathi

हे ही वाचा – लव्ह जिहाद नंतर धर्मांतरच्या बाबतीत यूपीमध्ये आणखीन एक कायदा लागू होणार..

सध्या उत्तर प्रदेशमध्ये आधीच पुरामुळे काही भागात हाहाकार उडालेला दिसून येत आहे. त्यात पुढच्या वर्षी येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणूका म्हणूनच कदाचित हे विधेयक सरकार आणत असावे. त्यातच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक चक्क भारतीयाने नव्हे तर ऑस्ट्रेलिया मधील एका राजकीय व्यक्तीने केले आहे.

उत्तर प्रदेश लव्ह जिहाद असो,गुन्हेगारी किंवा अल कायद्याच्या अतिरेक्यांना पकडणे असो, त्यातच आलेले हे विधेयक त्यामुळे उत्तर प्रदेश पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?