Site icon InMarathi

निराश-हताश मनःस्थिती फक्त ह्या ३ गोष्टी लक्षात ठेवा – नक्कीच नव्या उमेदीने उभे रहाल.

this-too-shall-pass_LG InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

Life में प्रॉब्लम? कठीण काळातून जाताय? पैश्याची अडचण? फॅमिली इश्यूज्? Medical प्रॉब्लम? आणि ह्यातून बाहेर पडायचा मार्ग सापडत नाहीये?

खाली दिलेल्या 3 facts वाचून तुमचा त्रास नक्की कमी होईल.

काही गोष्टी मनावर ठसवल्या की कठीण प्रसंगातुन बाहेर पडणं सोपं होतं. Here are 3 things to remember in tough times, ज्या तुमच्या मनाला नक्कीच उभारी देईल.

1) This Too Shall Pass

एका राजाच्या हातात एक अंगठी असते ज्यावर कोरलेलं असतं – This Too Shall Pass – हा काळ, ही परिस्थिती सुद्धा बदलेल.

 

Image source: seanryonsaddles.com

 

ह्या एका वाक्यामुळे तो राजा “अच्छे दिन” असताना जमिनीवरच रहातो आणि ह्याच वाक्यामुळे तो कठीण दिवसात निराश, नाऊमेदसुद्धा होत नाही.

लक्षात ठेवा – बदल हा निसर्गाचा आणि जीवनाचा नियम आहे. परिस्थिती बदलू शकते. फक्त आपण – जरा धीर धरून, जिद्द नं सोडता, योग्य मार्ग निवडत राहिलं पाहिजे.

 

2) अनेक लोक आपल्याहूनही अधिक कठीण प्रसंगातून जात आहेत

मेळघाटातील स्त्रिया डोळ्यासमोर आणा…दक्षिण अफ्रिकेतील शेतमजूर…दोन वेळच्या शिळ्या अन्नासाठी खस्ता खाणारे, कचरा वेचणारे बालमजूर…

 

Image source: rippleeffectimages

 

रोज, अनेक achievers कठीण प्रसंगातून जात असतात. निगेटिव्ह तापमानात आपली सीमा सुरक्षित ठेवणारे आपले शूर सैनिक, अपंग असूनसुद्धा स्वाभिमानाने स्वयंरोजगार करणारे स्वाभिमानी लोक, दिवसभर अंगमेहनत करून अर्धवेळ किंवा रात्रशाळेत शिकणारे शेकडो विद्यार्थी…

ह्यांच्यासमोर आपले प्रॉबलम्स किती मोठे आहेत? आपल्या समस्या बालमजुरांइतक्या hopeless आहेत का? की आपण त्या सैनिकांपेक्षा कठीण परिस्थितीत आहोत?

 

3) ह्या ब्रह्माण्डातलं आपलं इवलंसं अस्तित्व…!

मला हा विचार नेहेमी तारून नेतो.

Hubble telescope ने घेतलेला, आपल्या विश्वाचा फोटो बघा.

 

Source: Nasa

ह्या विश्वात, अगणित गॅलॅक्सीज् आहेत. अश्या अगणित गॅलॅक्सीज् पैकी आपली – Milkyway ही एक आकाशगंगा!

 

Image source: Nasa

प्रत्येक आकाशगंगेत अगणित सूर्य अन् तितक्याच सूर्यमाला – solar systems! Milkyway ह्या आपल्या गॅलॅक्सीतील एक – आपली सूर्यमाला!

 

Image source: Nasa

त्यातील एक ग्रह म्हणजे आपली पृथ्वी! पृथ्वीवर 196 देश, अब्जावधी लोक…सेकंदाला सुमारे 3ने वाढणारे!

त्यात आपण एक!

 

Image source: theguardian.com

आपण किती लहान आहोत आणि आपलं रक्त आटवणाऱ्या, ब्लड प्रेशर वाढवणाऱ्या आपल्या समस्या किती क्षुल्लक आहेत – हे कळण्यासाठी आणखी कुठला awareness आवश्यक आहे?

 

So… धीर धरा.

एखादा ब्रेक घ्या. ज्या प्रश्नामुळे खूप त्रास होतोय त्या प्रश्नाला विसरून एखाद्या बागेत किंवा शांत मंदिरात – कुठल्याही शांत जागी जरावेळ बसा, फेरफटका मारा आणि वरील 3 गोष्टी स्वतःला सांगा.

एका नव्या उमेदीने परत याल…!

गुड लक!

 

 

आणि हो -ह्या लिस्टचा कसा परिणाम होतोय ते आम्हाला नक्की कळवा. तुमची सुद्धा अशीच एखादी लिस्ट असेल तर तीसुद्धा आम्हाला कळवा!

Cheers!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version