' कोरोनाशी सुरु असलेली झुंज ‘त्याने’ थेट एव्हरेस्टच्या शिखरावर संपवली – InMarathi

कोरोनाशी सुरु असलेली झुंज ‘त्याने’ थेट एव्हरेस्टच्या शिखरावर संपवली

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गेल्यावर्षापासून कोरोनाच्या कचाट्यात सापडलेल्या अनेकांनी जिकरीने झुंज दिली. काहींची ही लढाई अपयशी ठरली तर काहींनी या रोगाशी दोन हात करत पुन्हा आयुष्याची गाडी रुळांवर आणली. मात्र आजही एखाद्याला कोरोना झाल्याचं कळल्यानंतर चिंता, भिती, सहानुभुती अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या जातात.

 

 

corona inmarathi

 

कोरोनाच्या या लढाईत जीव गमावणा-यांची भलीमोठी यादी आठवताच कोरोनाबद्दलची भिती वाटणं स्वाभाविक आहे, मात्र कोरोना झाला म्हणजे सगळं संपलं, असा विचार करत असाल तर जरा थांबा, कारण तुमचं हे मत बदलून टाकण्याचा चंग एका तरुणाने बांधला आहेे.

कोरोनानंतर लगेच घराबाहेर पडण्याबाबतही एकीकडे लोकं साशंक असताना ‘तो’ मात्र थेट एव्हरेस्टवर पोहोचलाय. एव्हरेस्टच्या टोकावर आयआयटीचा झेंडा रोवणा-या या वीराने केवळ संस्थेचाच नव्हे तर कोरोना लढाईतील विजयाची निशाणी फडकवली आहे.

कोरोनातून बरं झाल्यानंतरही पुढील काही महिने जाणवणारा थकवा, डॉक्टरांची नियमावली, सातत्याने येणा-या शारिरीक अडचणी या सगळ्यावर मात करणारे नीरज चौधरी भारतीयांसाठी सकारात्मकता आणि जिद्दीचा नवा आदर्श ठरत आहेत.

कोण आहेत नीरज चौधरी

दिल्लीच्या आयआयटीमधून २०११ साली उत्तीर्ण झालेले नीरज हे मुळचे राजस्थानचे!

 

neeraj inmarathi

 

सध्या ते राजस्थान सरकारच्या जलसंधारण विभागातील उच्चपदावर कार्यरत आहेत. नोकरी, संसार सांभाळणा-या नीरज यांना गिर्यारोहणाची विशेष आवड असल्याने शिक्षण घेत असल्यापासून त्यांनी अनेक मोहिमा यशस्वीरित्या पुर्ण केल्या आहेत.

बेत ठरला, मात्र….

आयआयटी दिल्लीच्या काही माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत एव्हरेस्टस्वारीचा बेत आखला. सध्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-या या मित्रांनी एकत्र येत एव्हरेस्ट चढाईचे ध्येय निश्चित केलं.

अर्थात ही केवळ सफर नव्हती, तर ज्या संस्थेने करिअरला दिशा दिली, त्या संस्थेचा गौरव करण्यासाठी ही मोहिम आखण्यात आली होती. त्यामुळे एव्हरेस्टच्या टोकावर आयआयटीचा झेंडा रोवण्याचा त्यांचा मानस होता.

 

evrest inmarathi

हे ही वाचा – एव्हरेस्ट शिखर दोनदा सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिलेची थरकाप उडवणारी कथा

मोहिमेतील सर्वांनाच गिर्यारोहणाचा अनुभव असल्याने जय्यत तयारिनीशी प्रवास सुरु झाला. मात्र सरकारी नियमानुसार प्रत्यक्ष एव्हरेस्ट चढाईपूर्वी सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली.

कोणतीही लक्षण नसलेल्या नीरज यांचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला आणि सगळ्या टिमचेच धाबे दणाणले.

 

corona test 2 inmarathi

 

कोरोनाग्रस्त ते मुसाफिर

अनेक वर्षांपाहून पाहिलेलं स्वप्न नजरेच्या टप्प्यात असताना पुन्हा माघारी फिरणं म्हणजे नीरज यांच्यासाठी महाकठीण शिक्षा होती. मात्र या रोगापुढे कुणाचेच काही चालेना. अर्ध्या वाटेवरून परत फिरलेल्या नीरज यांनी घर गाठले.

पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरु झाले, मात्र कोरोनाचा त्रासही अधिक जाणवू लागला. अंगदुखी, थकवा या वाढत्या लक्षणांमुळे पुन्हा एव्हरेस्ट मोहिम करणं निव्वळ अशक्य वाटत होतं.

डॉक्टर आणि कुटुंबियांच्या नजरेच्या धाकात पुन्हा एव्हरेस्टचे स्वप्न पूर्ण होणार का? अशी इतरांना चिंता असली तरी नीरज यांचं ध्येय पक्क होतं. म्हणूनच १४ दिवसांच्या क्वॉरन्टाइन काळातही त्यांनी शारिरीक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली.

या काळात कोरोना आणि स्वतःचा शारिरीक त्रास यांचा विचार करत बसण्यात वेळ वाया न घालवता त्यांनी अधिकाधिक सकारात्मक राहण्यासाठी जोमाने प्रयत्न केले.

यामध्ये योगा, व्यायाम, आहार याचं वेळापत्रक होतंच मात्र त्यासह उत्साह वाढवणारी अनेक पुस्तक त्यांनी वाचली. प्रेरणादायक व्यक्तींशी संवाद साधला.

 

 

healthy food inmarathi

 

औषधोपचारांनी शारिरीक ताकद मिळत होतीच, मात्र क्वारन्टाइन कालावधी पुर्ण होताच त्यांनी मोहिमेची तयारी सुरु केली. सुरवातीला अनेकांकडून विरोध झाला मात्र त्यांच्या अफा जिद्दीसमोर कुणाचाही निभाव लागू शकला नाही.

कोरोनाचा धोका टळला असला तरी थकवा दूर करण्यासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले आणि अखेर अवघ्या सात आठवड्यातच पाठीवर बॅग, पायात ट्रेकर्स बूट आणि नजरेत एव्हरेस्ट चढाईचं स्वप्न घेत ते पुन्हा निघाले.

 

neeraj 1 inmarathi

 

त्यांच्या साथीदारांच्या प्रोत्साहानमुळे अखेर त्यांनी मोहिम पूर्ण केली आणि त्यांच्यात हातून एव्हरेस्टच्या एका टोकावर आयआयटीचा झेंडा रोवला गेला.

त्यांची मोहिम पुर्ण झाल्यानंतरही अनेकांना ही बाब खरी वाटत नव्हती. मात्र राजस्थानच्या गावी, ऑफिसमध्ये आनंदाने मोहिमेची माहिती सांगणा-या नीरज यांना प्रत्यक्ष भेटल्यानंतरच सर्वांचा विश्वास बसला.

 

neeraj 2 inmarathi

 

कोरोनाने सर्वांचचं जगणं मुश्किल केलंय, अनेकांची कामं रखडली आहेत तर काहींचे वर्षानुवर्षांचे बेत अद्याप टांगणीला लागले आहेत. मात्र या एका संकटामुळे आपलं जिद्द, स्वप्न सोडून न देता त्याचा पाठपुरावा करत राहिला तर निश्चितच या लढाईत कोरोनाला हरवून आपलं स्वप्न, ध्येय जिंकेल यात शंका नाही.

आपल्यातल्याच एका भारतीयाने सर केलेलं हे यशाचं शिखर आपल्यालाही न थकता स्वप्नांचा प्रवास करण्याचं बळ देतं ना?

हे ही वाचा – माउंट एव्हरेस्ट: नाव परदेशी असलं, तरी एका भारतीयाने त्याला ‘मोठं’ केलंय!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?