' गाडी थांबवताना ब्रेक आणि क्लचचा वापर चुकीचा तर करत नाही ना? जाणून घ्या – InMarathi

गाडी थांबवताना ब्रेक आणि क्लचचा वापर चुकीचा तर करत नाही ना? जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पावसाळा सुरू असला की गाडी चालवताना खूप सतर्क रहावं लागतं. दुचाकी गाडी ‘स्लीप’ होणे, पहिल्या प्रयत्नात सुरू न होणे असे प्रकार आपण पावसाळ्यात होतांना बघत असतो. अपघात होण्याची शक्यताही असतेच.

अपघात हे मुख्यतः दोन प्रकारात मोडतात. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे झालेले अपघात आणि गाडी चालवतांना आपण केलेल्या चुकांमुळे झालेले अपघात. वाहन परवाना मिळतांना आपल्याकडे दुचाकी असो वा चार चाकी यांचं किती ज्ञान आहे हे फारसं तपासून बघितलं जात नाही.

 

bike driving test inmarathi

 

‘गाडी थांबवताना ब्रेक दाबायच्या आधी क्लच दाबावा की नाही?’ हा एक प्रश्न बऱ्याच लोकांच्या डोक्यात असतो. याचं नेमकं उत्तर कळण्यासाठी गाडीमध्ये क्लचचा उपयोग काय आहे? हे आधी जाणून घेऊयात.

क्लच हा इंजिन आणि गियर बॉक्स यांच्यातील दुवा म्हणून काम करत असतो. क्लच दाबणं म्हणजे गाडीला आपण देत असलेला वेग गियरपर्यंत पोचवण्याचा मार्ग बंद करणं. मग ब्रेक लावताना क्लचचा वापर करणं योग्य ठरेल की नाही, आणि तो कधी करावा हे माहित असायला हवंच, नाही का?

१. वेग कमी असेल तर

प्रत्येक गियरसाठी गाडीची एक गती निर्धारित असते. १०-२० च्या स्पीडपर्यंत पहिला गियर, २० च्या वर दुसरा, तर ३०-४० दरम्यान तिसरा, ४० पासून पुढे चौथा आणि ६० पासून पुढे पाचवा याप्रमाणे गियर बदलणं योग्य ठरतं.

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानात तुम्ही फक्त क्लच जरी हळूहळू सोडलात, तरी गाडी पुढे जात असते. तसंच, जर तुमची गाडी गियरच्या निर्धारित केलेल्या स्पीडपेक्षा कमी स्पीडने चालत असेल, आणि तेव्हाच तुम्ही ब्रेक लावलात तर त्याचा इंजिनवर इफेक्ट होतो.

हे टाळण्यासाठी गाडी कमी वेगात असताना आधी क्लच प्रेस करणं योग्य ठरतं. ज्यामुळे इंजिनचा वेग चाकांपर्यंत पोचत नाही. इंजिनवर कुठलाही ताण येत नाही.

 

clutch pedal inmarathi

 

२. अचानक ब्रेक लावत असाल तर

भारतीय रस्त्यांवर गाडी चालवतांना मध्ये काहीही आणि कोणीही येऊ शकतं. समोरची गाडी जर थांबली असेल, तर आपल्याकडे ‘हजार्ड लाईट्स’ चालू ठेवण्याची सवय सुद्धा फारशी पाहायला मिळत नाही.

 

hazard light inmarathi

 

अशा वेळी अचानक ब्रेक लावण्याची गरज आपल्याला कधी ना कधी तरी पडतेच. अशा वेळेस क्लच आणि ब्रेक एकत्र वापरणं इंजिनसाठी योग्य असतं. 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – या ५ टिप्स वापरुन टायर्सची काळजी घ्या आणि पावसाळ्यात होणारे बाईक अपघात टाळा!

===

३. जास्त स्पीड असताना गाडी थांबवायची असेल तर

एक्सप्रेस हायवेसारख्या ठिकाणी गाडी चालवत असताना जेव्हा आपण गाडीचा स्पीड कमी करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आधी ब्रेक दाबणं योग्य. ब्रेक दाबून वेग थोडा कमी करायचा आणि मग क्लच दाबून गियर कमी करायचा हे करणं कधीही योग्य असतं.

 

bike overspeeding inmarathi

 

असं केल्याने आपण गाडीला रोहित शेट्टीच्या सिनेमात दाखवतात तसं उडण्यापासून वाचवू शकतो. कारण, गाडीची गती कमी झाल्यावरच क्लचचा वापर करणं, हे इंजिनसाठी कधीही योग्य आहे.

४. फक्त गती कमी करतांना

जेव्हा तुम्ही साधारण ५० च्या स्पीडने तिसऱ्या किंवा चौथ्या गियरमध्ये गाडी चालवत असता, आणि तुम्हाला गाडीची फक्त थोडी गती कमी करायची असते, समोर कोणताही अडथळा नसतो, तेव्हा आपण केवळ ब्रेक दाबून गाडीची गती कमी करू शकता.

हायवे वर १०० च्या स्पीडने गाडी चालवत असतांना सुद्धा तुम्ही एकदा फक्त ब्रेकवर पाय ठेवला तरी स्पीड कमी होते.

 

braking a car inmarathi

 

ब्रेक दाबल्यावर गाडी लगेच त्या गियरच्या किमान स्पीडवर जात नाही. त्यामुळे क्लच वापरायची गरज नसते. 

दुचाकी चालवतांना काही जणांना गरज नसतांना क्लचचा वापर करण्याची सवय असते. त्यामुळे इंजिनवरील ताण वाढतो आणि गाडीला पेट्रोलसुद्धा जास्त लागतं.

कारमध्ये आलेल्या ऑटोमॅटिक प्रकारामुळे इथून पुढे क्लच हा पार्ट काही वर्षांनी गाडीतून नाहीसा होण्यास सुरुवात झाली आहे. काही वर्षात दुचाकी सुद्धा तशी होऊ शकते. पण, ज्यांना क्लच, गियरची सवय आहे त्यांना मात्र क्लच असलेली गाडी चालवण्यात एक वेगळीच मजा येते हे ही तितकंच खरं आहे.

 

bike rider inmarathi

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – ‘चप्पल’ घालून (!) बाईक चालवणं गुन्हा – तुम्ही किती ‘नियम मोडताय’ हे माहिती आहे का?

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?