सुपरहिट ‘कहो ना प्यार है’च्या या १० गोष्टी आज वाचाल तर कपाळावर हात मारून घ्याल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जानेवारी २००० हा महिना बॉलीवूडसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या महिन्यात सुपरहिट ‘कहो ना प्यार है’ रिलीज झाला होता. सिनेमागृहांसमोर पुन्हा लोकांच्या रांगा बघायला मिळत होत्या. लोकांना काहीही करून ‘कहो ना प्यार है’ बघायचाच होता. परत परत बघायचा होता.\
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
सिनेमा बघितलेला प्रत्येक जण हा ६ फूट उंची, सुदृढ शरीरयष्टी, घारे डोळे आणि नृत्य निपुण असलेल्या ह्रितीक रोशनच्या प्रेमात पडला होता.
‘इक पल का जिना..’ या गाण्यातील त्याचा डान्स हा लोकांच्या मनात कोरला गेला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवरचे सगळे विक्रम मोडीत काढले होते. २१ व्या शतकात पदार्पण करतांना बॉलीवूडमध्ये ह्रितीक रोशन नावाचा सुपरस्टार उदयास आला होता.
आजच्या वास्तववादी सिनेमांसोबत तुलना केली, तर साधी प्रेमकथा असलेल्या या सिनेमाला मिळालेलं घवघवीत यश हे एक आश्चर्य वाटू शकतं.
‘कहो ना प्यार है’ या सिनेमात काही चुका आहेत हे त्या काळात जर कोणी म्हटलं असतं तर त्याला लोकांनी वेड्यात काढलं असतं. पण, आज २० वर्षानंतर जेव्हा आपण तो सिनेमा बघतो तेव्हा त्यातील काही तांत्रिक चुका स्पष्टपणे आढळून येतात.
या कलाकृतीला कुठेही नावं न ठेवता यातील आम्हाला सापडलेल्या १० चुका केवळ गंमत म्हणून आम्ही सिनेप्रेमी लोकांना सांगत आहोत!
१. रोहित (सिनेमातील ह्रितीक रोशन) हा त्याच्या लहान भावाला शाळेला सोडायला जात असतो. सिग्नलवर त्याला अमिशा पटेलची कार दिसते. आपला लहान भाऊ सोबत असल्यावर कोणता मोठा भाऊ एखाद्या मुलीकडे टक लावून बघत बसतो? तिच्या मेकअप करण्यावर हसतो? ती तिची कार आहे, तिचा मेकअप आहे, तिचा वेळ आहे.
अनोळखी व्यक्तीकडे सामान्यतः आपण इतक्या वेळ बघत बसत नाही. हल्लीच्या काळात तर नाहीच नाही. पुढे तो भाऊ शाळेत जातो की नाही? येतांना घरी कसा येतो? हे प्रश्न आजच्या प्रेक्षकांना नक्कीच पडले असते.
–
हे ही वाचा – बॉलीवूडच्या या ६ बीभत्स सिनेमांची आजही लोकं प्रचंड टर उडवतात!
–
२. रोहित जेव्हा त्या ‘प्यार की कष्ती मे…’ मधील जहाजावर येतो. तेव्हा त्याला स्वाभाविकच मुली गराडा घालतात. तिथे अमिशा पटेल समोर जाते आणि सर्व मुलींना “त्याला मोकळं सोडा” असं सांगते. कोणत्या हक्काने? तोपर्यंत ते दोघं एकमेकांना फारसं ओळखतही नव्हते.
तिच्या मैत्रिणी सुद्धा तिचं असं वागणं बघून आश्चर्यचकित होतात. आजच्या मुलींमध्ये इतका तर समजूतदारपणा असतो, की आपल्याला कोणी आवडतो म्हणजे त्यालाही आपणच आवडत असू असं नसतं. विचारून होकारार्थी उत्तर आल्यावर मगच तुम्ही कोणावर हक्क दाखवू शकता.
३. मोठ्या जहाजातून प्रवास करतांना ब्रिजेश हिरजी हा एका माणसाचे कपडे “लाँड्री सर” म्हणून चोरतो. इतकी सुरक्षा असतांना असं घडू शकतं हे आजच्या डोक्याने विचार करणाऱ्या प्रेक्षकांच्या पचनी पडलं नसतं.
याचं अजून एक कारण म्हणजे ती व्यक्ती अंगात घातलेला कोट इस्त्री करण्यासाठी काढून देतो. असं कधी होतं का?
४. रोहित आणि सोनिया (अमिशा पटेल) हे समुद्राच्या मध्यभागी एका छोट्या होडीत बसलेले असतात. रोहित त्या होडीला किनाऱ्याला नेण्यासाठी विचार, प्रयत्न, धडपड करत असतो.
त्या विचारात तो एक मदत म्हणून “आता काय करायचं ?” असं सोनियाला विचारतो. त्यावेळी सोनिया म्हणते, “लपंडाव खेळूया”. आजची किंवा त्या काळातली त्या वयातली मुलगी अशा कठीण प्रसंगात अशी बावळट उत्तरं गमतीत सुद्धा देत नाही.
५. सोनियासारखा रोहित सुद्धा होडी किनाऱ्यावर पोहोचल्यावर वेडेपणा करताना दिसतो. एक अनोळखी मुलगी तुमच्यासोबत किनाऱ्यावर आहे. तिची सुरक्षा ही त्यावेळी तुमची जबाबदारी आहे.
अशावेळी रोहित काय करतो तर सोनियाला आपण लवकर दिसावेत म्हणून निशाणा म्हणून तिचा स्कर्ट मागतो. ती देत नाही म्हंटलं तर हा तिच्या मागे पळत जाऊन त्याच्या मनाला योग्य वाटतं तेच करतो. आजच्या मुलाने किंवा हिरोने असं केलं नसतं आणि मुलीने असं काही मान्य पण केलं नसतं.
६. रोहितचा अपघात होतो आणि तो जगाचा निरोप घेतो. सोनिया त्यामुळे प्रचंड नाराज झालेली असते. त्यावेळी सोनियाचे वडील तिच्या मनाचा विचार न करता तिला नातेवाईकांकडे न्यूझीलंडला पाठवून देतात. आज मुलीचे वडील असं करत नाहीत. मुलगी ही त्याची मैत्रीण देखील असते. ते अशा भावनिक प्रसंगात तिला एकटं सोडत नाही.
७. सोनिया जेव्हा न्यूझीलंडमध्ये राज (ह्रितीक रोशनच्या डुप्लीकेटला) बघते. तेव्हा ती त्या डिस्कोच्या बाहेर जाते आणि राजच्या बाईकमध्ये ठेवलेलं त्याचं आयडी कार्ड बघते. एक तर आपले महत्वाचे कागदपत्र कोणी असे ठेवत नाही आणि ठेवलेलं दिसलं तरी कोणीही ते कागदपत्र संमतीशिवाय बघत नसतं.
८. राजचे वडील सोनियाला त्याच्या अपरोक्ष फक्त एकदाच बघतात. राज त्याच्या वडिलांना प्रश्न विचारतो की, “तिलाही मी आवडत असेन का?” तेव्हा ते काका क्षणाचाही विलंब न करता “हो” असं उत्तर देतात. सोनियाच्या मनात काय आहे? हे त्यांना कधी कळलं?
९. २००० मध्ये मोबाईल फोन्स बाजारात आले होते. ‘कहो ना प्यार है’ या सिनेमात सुद्धा मोबाईल दाखवले आहेत. पण, ते फक्त सिनेमातील व्हिलनकडेच. रोहित हा गायक असतो, त्याच्याकडे फोन नसतो. सोनियाचे वडील हे तिला वाढदिवसाला कार गिफ्ट देतात. पण, मोबाईल देत नाहीत.
१०. न्यूझीलंडमध्ये जन्म घेतलेल्या राजला सोनिया जेव्हा भारतात गेली हे कळतं तेव्हा त्यालासुद्धा त्याच विमानाचं तिकीट मिळतं. व्हिसा वगैरे कुठेच घोडं अडत नाही.
शिवाय, डान्सची आवड असलेला राज हा भारतात येऊन इतक्या लोकांसमोर गाणं गाऊन डान्स पण करू शकेल याची खात्री सोनियाला आधीच होती. राजसुद्धा कोणत्याही तयारी शिवाय रोहितच्या गाण्यावर तसाच डान्स करतो आणि नंतर थोड्या फाईटनंतर सिनेमा संपतो.
–
हे ही वाचा – सिनेमातल्या केवळ बोल्ड, भडक सीन्समुळेच या ७ अभिनेत्रींचा इंडस्ट्रीत निभाव लागला!
–
बॉलीवूड, हॉलीवूड, मराठी सिनेमा किंवा अगदी OTT मध्ये सुद्धा प्रत्येक कलाकृतीत अश्या काही तरी चुका असतातच.
मनोरंजन म्हणून या गोष्टींकडे बघावं आणि सोडून द्यावं. कारण, प्रत्येक गोष्ट लॉजिकल दाखवायची ठरवली तर तो सिनेमा नसेल, माहितीपट असेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.