‘भुज’चा हल्ला: भारताच्या स्वाभिमानासाठी लढलेला ‘मराठमोळा जवान’ आहे तरी कोण?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लॉकडाऊनमुळे मनोरंजन विश्व चांगलीच हादरली आहे, जवळजवळ गेलं दीड वर्षं थिएटर, नाट्यगृह बंद असल्याने सगळेच प्रोड्यूसर कलाकार आता ओटीटी माध्यमांकडे वळले आहेत. अक्षय कुमारपासून सलमान खानपर्यंत कित्येकांनी ऑनलाइन माध्यमांचा सहारा घेत आपले सिनेमे लोकांच्या भेटीसाठी आणले.
कालच अजय देवगणचा बहुचर्चित सिनेमा ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. येत्या ऑगस्ट महिन्यात भुज हॉटस्टार सिनेप्लेक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवार येतोय.
१९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धावर बेतलेल्या या सिनेमात अजय देवगण, शरद केळकर, संजय दत्त, नोरा फतेही, सोनाक्षी सिन्हा हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा सध्या सगळीकडेच होत आहे, सिनेमातले अॅक्शन सिक्वेन्स, प्रत्येक कलाकाराचा परफॉर्मन्स, देशभक्तीने ओतप्रोत डायलॉग, व्हिएफएक्स हे सगळंच बघता हा सिनेमा थिएटरमध्ये यायला हवा होता अशीच हळहळ सगळे व्यक्त करतायत.
या सिनेमात अजय देवगणने स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांची भूमिका निभावली आहे, त्यावेळेस भुजच्या एयरबेसची विजय कर्णिक यांनी कशाप्रकारे सुरक्षा केली होती, त्याचं चित्रण या सिनेमात तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे.
–
हे ही वाचा – जेव्हा ‘रॉ’ने स्वतःच इंडियन एअरलाईन्सचं विमान ‘हायजॅक’ केलं होतं…
–
ती घटना नेमकी आहे तरी काय?
३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी एयर फोर्सकडून ऑपरेशन चंगेज खानची सुरुवात झाली, भारतीय वायुसेनेच्या ११ एयरफील्डवर पाकिस्तानने बॉम्बहल्ला करायला सुरुवात केली, यामुळेच खरंतर युद्धाला सुरुवात झाली.
काश्मीर, अमृतसर, अंबाला, जोधपुर, जैसलमेर, पठाणकोट, भुज बरोबरच आणखी काही एयरबेसवर पाकिस्तानने हल्ला केला. यानंतर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी युद्धाची घोषणा केली!
भुजचा हल्ला इतका भयानक का होता?
सलग वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बहल्ले केल्यानंतर गुजरातच्या कच्छमधील रुद्रमाता एयरफोर्स बेसवरसुद्धा पाकिस्तानी विमानांनी हल्ला सुरू केला. १४ दिवसात ३५ वेळा हल्ला करून पाकिस्तानी एयरफोर्सने ९२ बॉम्ब आणि २२ रॉकेटसह भुजचा एयरबेस बेचिराख केला होता.
७२ तासात ३०० महिलांच्या मदतीने हा सगळा एयरबेस पुन्हा पूर्णपणे तयार करण्यात आला, ज्यात तिथल्याच माधोपुर गावाच्या कित्येक महिलांना मोलाचं योगदान दिलं!
त्यावेळेस या एयरबेसचे कमांडर होते स्क्वाड्रन लीडर विजय कुमार कर्णिक.
कोण आहेत स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक?
महाराष्ट्राच्या मातीत म्हणजे नागपूरमध्ये लहानाचे मोठे झालेले आणि शिक्षणही इथेच पूर्ण केलेले विजय कर्णिक यांनी नंतर १९६२ मध्ये इंडियन एयर फोर्समध्ये भरती होणे पसंत केले, आपला भाऊदेखील सैन्यात असल्याने देशसेवेचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते.
१९७१ च्या युद्धाच्या दरम्यान ते भुजच्याच एयरबेसवर तैनात होते आणि बेचिराख झालेला एयरबेस पुन्हा उभा करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवण्यात आली होती.
स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांनी आपले २ सहकारी ऑफिसर्स आणि ५० वायुसैनिक यांना हाताशी घेऊन भुजच्या एयरबेसला पूर्ववत करण्यासाठी प्राण पणाला लावून लढले.
शिवाय तिथल्याच स्थानिक महिलांना हाताशी घेऊन त्यांनी तो एयरबेस पुन्हा ऑपरेशनल केला ज्यामुळे एयरस्ट्राइक होत असतानाही जवानांना बेसवर आणण्यासाठी येणाऱ्या लढाऊ विमानांची गैरसोय झाली नाही.
नंतर सरकारकडून या ३०० महिलांना रोख रक्कम ५०००० रुपयांचं बक्षीसही देण्यात आलं!
या सगळ्या आठवणींना उजाळा देताना विजय कर्णिक म्हणतात “त्या युद्धजन्य परिस्थितीत त्या महिलांची जबाबदारी माझ्यावर होती, या भयानक हल्ल्यात त्यांच्यापैकी कोणालाही दगा फटका झाला असता तर ते नुकसान भरून काढणं निव्वळ अशक्य होतं, पण आम्ही आणि त्या शूर महिलांना ते करून दाखवलं”
अक्षय कुमारच्या हॉलिडे चित्रपटातला एक डायलॉग आहे बघा “देश की सेवा करनेका ठेका सिर्फ हम सोल्जर्सने लिया है क्या? तुम सिविलियन्स देश की सेवा नही कर सकते क्या?”
या डायलॉगप्रमाणेच भुजच्या त्या एयरबेसवर युद्धजन्य परिस्थितीतही तिथल्या महिलांनी स्वतःच्या जिवावर उदार होऊन जी देशाची सेवा केली आहे त्यावरून हे नक्की सिद्ध होतं की देशाची रक्षा करणं हे आपलंही तितकंच कर्तव्य आहे.
आपण भले फ्रंटवर नसू पण जेव्हा वेळ आणि संधी मिळेल तेव्हा आपणही फ्रंटवर जाऊन आपल्या जवानांप्रमाणे आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे.
भुजच्या या संघर्षाची कहाणी, स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांची ही शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहता येणार नाही याची खंत आहेच पण आपल्या देशाच्या या शूर जवानांची आणि त्यांच्या पराक्रमाची सगळ्यांना ओळख होईल हे ही नसे थोडके!
===
हे ही वाचा – २००० पाकिस्तानी सैनिक+रणगाड्यांना हरवणारे १२० शूर भारतीय सैनिक!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.