Site icon InMarathi

हजारो रुपयांची चिखल लागलेली जीन्स – आजची नवीन फॅशन!

mud-jeans-marathipizz00

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपल्या घरी आई आणि आजी कायम आपल्याला सांगत असतात की स्वच्छ कपडे घालावे. नीटनेटके राहावे. आपले कपडे पांढरेशुभ्र राहावे आणि स्वच्छ दिसावे म्हणून घरातील स्त्री वर्ग कायम आग्रही असतो. पण कुठून कशी “डाग अच्छे होते है” ही जाहिरात टीव्ही वर आली आणि जरी ती एका डीटर्जंटची जाहिरात असली म्हणजेच कितीही डाग पाडा, हे साबण वापरले तर तुमचे कपडे अगदी शुभ्र दिसणार असा संदेश ह्या जाहिरातीद्वारे दिला असला, तरी एका फॅशन डिझायनरने मात्र ह्या जाहिरातीचा अगदी उलट अर्थ घेतलाय. जुनाट दिसणाऱ्या जीन्स, फॅशन म्हणून रेडीमेड फाडून दिलेल्या जीन्स, धागे दोरे लोंबकळत असलेल्या जीन्स , ह्या सगळ्या अतरंगी फॅशन नंतर आता मळक्या, चिखलाचे डाग पडलेल्या जीन्सची सध्या फॅशन जोर धरते आहे. म्हणजेच दुकानातूनच तुम्हाला रेडीमेड चिखल लागल्यासारखी दिसणारी जीन्स मिळणार आहे. शिंप्याच्या हातून चूक झाली कि नवी फॅशन तयार होते असं जे म्हणतात त्यावर ही फॅशन बघितल्यावर आता माझा पूर्ण विश्वास बसू लागला आहे.

http://metro.co.uk

आपल्याकडे पूर्वीपासून अंगावर फाटके कपडे घालणं दळभद्रीपणाच लक्षण मानलं जातं, तर डाग पडलेले कपडे घालणं अस्वच्छपणा समजला जातो. पण ह्या समजुतींना पूर्ण फाटा देत हल्ली मांडीच्या ठिकाणी, गुढग्याच्या ठिकाणी फाटलेल्या जीन्सची फॅशन आली आणि आता त्याही पुढे जाऊन मळलेली डाग पडलेली जीन्स घालण्याची फॅशन येते आहे.  ज्या लोकांनी फाटलेल्या जीन्स वर हजारो रुपये घालवल्यामुळे घरच्यांची बोलणी खाल्ली आहेत, त्यांच्यासाठी आता ही जीन्स घेतल्यावर घरच्यांकडून नव्याने उद्धार होण्याची बेस्ट संधी चालून आली आहे.

तर सध्या इन ट्रेंड असलेली ही मड जीन्स अशी दिसते की पावसाळ्यात तुम्ही बाहेर गेल्यावर घसरून चिखलात पडलात आणि घरी आल्यावर ती जीन्स तशीच ठेवून दिल्यावर आणि महिनाभराने कधीतरी आठवल्यावर मग ती जीन्स उघडून बघितल्यावर जशी दिसेल तसाच ह्या मड जीन्सचा खास युनिक लुक आहे.

आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ही जीन्स विकत घ्यायची असेल तर खिशात ४२५ $ किंवा २७,००० रुपये तयार ठेवा. फक्त जीन्सची किंमत घरच्यांना सांगू नका नाहीतर जीन्ससह तुम्हालाही आपटून धुतले जाण्याची शक्यता आहे.

twitter.com

ह्या जीन्सला “Barracuda Straight Leg Jeans” असेही नाव आहे आणि Nordstrom च्या वेबसाईट वर तिचे असे वर्णन केले आहे.

Heavily distressed medium-blue denim jeans in a comfortable straight-leg fit embody rugged, Americana workwear that’s seen some hard-working action with a crackled, caked-on muddy coating that shows you’re not afraid to get down and dirty.

म्हणजेच ही एका कष्ट करणाऱ्या व्यक्तीची जीन्स आहे जो कपडे खराब होण्याच्या भीतीने कष्ट करण्यास घाबरत नाही. थोडक्यात असा संदेश ह्या जीन्सद्वारे दिल्या जातो.

clapsnews.com

तर बेसिकली ह्या जीन्स तयार करणाऱ्यांचे असे म्हणणे आहे की तुम्ही कष्ट करता, हे दाखवायचे असेल तर २७,००० रुपये खर्च करून ही जीन्स घ्या. ती घाला व जगाला दाखवा कि मी किती मेहनती आहे, कष्टाळू आहे. ह्या जीन्स बद्दल जेव्हा जगभरातील लोकांना कळले तेव्हा नेहमीसारखेच ह्या विषयावर सुद्धा उत्साही नेटकऱ्यांनी मजेदार ट्वीट करून सोशल नेट्वर्क वर सर्वांचे मनोरंजन केले.

@ajplus @Nordstrom I would’ve never guessed I had $425 in my laundry basket.

 

Faded jeans with holes in them used to sound like the dumbest idea of all time, so fake mud jeans will probably make billions. @Nordstrom

 

Muddy Jeans”, really?! I mean, I have an authentic pair in my dirty clothes, $400! Any takers….REAL MUD with no extra cost!

 

These ridiculous #muddyjeans WHERE! would anyone wear them. The office? Church? On a date?
WHERE! At home alone? Who do you impress there!

 

Nordstrom has jeans w/ fake mud for $425. What’s next? An entire wardrobe that looks like we survived a tiger attack?

 

Imagine explaining this jeans and its price to your Mom @mudjeans

 

me.me

Nordstrom च्या जीन्सचा लोकांनी ट्वीटर वर असा समाचार घेतला. Mike Rowe ह्या अमेरिकन टीव्ही होस्टने ह्या जीन्स विषयी फेसबुक वर पोस्ट केल्यानंतर ही जीन्स सगळीकडे प्रसिद्ध झाली. ह्या निवेदकाने असे म्हटले आहे की Nordstrom ने ही जीन्स निर्माण करणे हा एक अविवेकी असा निर्णय आहे.

आपल्याकडे जर ही जीन्स घ्यायचा विचार कोणी चार चौघात बोलून दाखवला तर लोक वेड्यात काढतील, शिवाय असाही सल्ला देतील की ह्या जीन्स साठी इतके पैसे कशाला घालवायचे? त्यापेक्षा आहे ती जीन्स घाला अन चिखलात जाऊन खेळा, आपोआप मड जीन्स तयार होईल. तेही अगदी स्वस्त आणि मस्त! आता काही उत्साही फॅशनेबल लोक २७ ते ३० हजार रुपये खर्च करून हि जीन्स घेतीलही! अशा प्रकारची फॅशन येणे हे काही फॅशन जगतात नवे नाही. ह्या आधी सुद्धा एक नी विंडो जीन्स नावाचा एक प्रकार आला होता. हे फॅशन डिझायनर्स काहीतरी डोकं लढवून नवे नवे ट्रेंड्स फॅशन जगतात आणत असतात. पण प्रश्न असा आहे की असे कपडे इतके पैसे घालवून तुम्ही खरंच खरेदी कराल का की जे घातल्यावर घरात प्रवेश मिळणार नाही किंवा कपड्यांसकट तुमचीही धुलाई होण्याची शक्यता आहे!

memegenerator.net

एका माणसाचे मळलेले कपडे ही दुसऱ्या साठी फॅशन असू शकते हे बघितल्यावर तर “Time to leave this planet ” ह्या Meme ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version