कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यात नेमका फरक काय असतो? जाणून घ्या…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
नुकतेच केंद्रातील भाजप सरकार, म्हणजेच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे बदल पाहायला मिळाले. अनेक नावेत चेहरे, जबाबदाऱ्यांचे खांदापालट, बड्या नेत्यांचे राजीनामे असा अनेक गोष्टींची चर्चा त्यावेळी रंगली.
या सगळ्यात महाराष्ट्रातील ४ नव्या चेहऱ्यांना प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं. या नेत्यांमधील मोठं नाव असलेल्या नारायण राणेंसह, भिवंडीचे खासदार कपिल पाटील, औरंगाबादचे माजी महापौर आणि राज्यसभेचे खासदार भागवत कराड आणि गेल्या काही वर्षात खमकं महिला नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या डॉ. भारती पवार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली.
राणे यांची कॅबिनेट मंत्री म्हणून, तर पाटील, पवार आणि कराड या इतर तीन नेत्यांची केंद्रातील राज्यमंत्री म्हणून नेमणूक झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण मग हे कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री म्हणजे नेमकं असतं काय? या दोन पदांमधील नेमका फरक काय, हे तुम्हाला माहित आहे का?
===
हे ही वाचा – राणेंसह दिल्लीत गेलेल्या ३ मराठी नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी! त्यांच्याबद्दल जाणून घ्या
===
मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री हे दोन मुख्य प्रकार आहेत. हे दोन्ही काय आहेत, ते समजून घेऊयात.
कॅबिनेट मंत्री हा केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिल्या श्रेणीचा मंत्री असतो, दुसऱ्या श्रेणीवर राज्यमंत्री असतात ज्यांच्याकडे स्वतंत्र प्रभार असतो. याशिवाय आणखी एका श्रेणीतील राज्यमंत्री असतात, ज्यांच्याकडे स्वतंत्र प्रभार नसतो, तर ते कॅबिनेट मंत्रांच्या हाताखाली काम करत असतात.
कॅबिनेट मंत्री
कॅबिनेट मंत्री हे मंत्रिमंडळातील सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडत असतात. प्रत्येक कॅबिनेट मंत्र्याला, एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा कार्यभार सोपवला जातो. काहीवेळा, एकाच मंत्र्याकडे एकाहून अधिक क्षेत्रांचा कार्यभार असू शकतो.
ज्या क्षेत्रांचा कार्यभार त्या मंत्र्याकडे असेल, त्याचं सर्व कामकाज त्या मंत्र्याच्या नेतृत्वाखाली पार पडत असतं. कॅबिनेट मंत्र्यांची दर आठवड्याला बैठक होत असते. या बैठकीतच सर्व सरकारी निर्णय, अध्यादेश, नवे कायदे, कायद्यांमधील बदल अशा सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा घडते. यातूनच नव्या गोष्टी निश्चित केल्या जातात आणि त्या संसदेसमोर मांडल्या जातात.
===
हे ही वाचा – कोण म्हणत राजकारणात सुंदर चेहरे नाहीत? हे सुंदर चेहरे अनेकांचे लक्ष वेधून घेतात!! वाचा
===
कॅबिनेट मंत्र्यांना महिना १ लाख रुपये पगार, याशिवाय ७० हजार रुपये निवडणूक भत्ता आणि ६० हजार रुपये कार्यालय भत्ता देण्यात येतो. प्रतिदिन २००० रुपये इतका सत्कार भत्ता सुद्धा कॅबिनेट मंत्र्यांना मिळत असतो.
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
स्वतंत्र प्रभार असणाऱ्या राज्यमंत्र्यांकडे त्या त्या क्षेत्रातील कामासंदर्भातील आवश्यक असे सर्व हक्क असतात. त्यांच्या कामाचा अहवाल कॅबिनेट मंत्र्यांकडे देणं त्यांना बंधनकारक नसतं. मात्र हे मंत्री कॅबिनेटच्या बैठकीत सहभागी होऊ शकत नाहीत.
त्यांच्या क्षेत्रातील एखाद्या विषयावर चर्चा होणार असेल, तर त्यावेळी त्यांची मत विचारात घेण्यासाठी त्यांना कॅबिनेटच्या बैठकीत सहभागी करून घेतलं जातं.
राज्यमंत्र्यांचा सत्कार भत्ता प्रतिदिन १००० रुपये इतकाच असतो.
राज्यमंत्री
हे मंत्री मंत्रिमंडळातील सर्वात खालच्या स्तरावर असतात. राज्यमंत्र्यांना सुद्धा विविध क्षेत्रांचा प्रभार सोपवलेला असतो, मात्र या कामासंदर्भात सर्व अहवाल त्या-त्या क्षेत्रातील कॅबिनेट मंत्र्याला देणं त्यांच्यासाठी बंधनकारक असतं.
थोडक्यात, हे राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्यांच्या हाताखाली त्या क्षेत्राचे काम पाहत असतात. एका कॅबिनेट मंत्र्यांच्या हाताखाली एकाहून अधिक राज्यमंत्री काम करत असू शकतात. याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रातील कामकाज एका राज्यमंत्र्याला दिलं जाऊ शकतं. या सर्व राज्यमंत्रांच्या मदतीने, कॅबिनेट मंत्री मंत्रालयाच्या कामाची संपूर्ण जबाबदारी पार पाडत असतात.
या राज्यमंत्र्यांच्यादेखील सत्कार भत्त्यात तफावत असते. त्यांना प्रतिदिन ६०० रुपयांचा सत्कार भत्ता प्राप्त होत असतो.
राज्यमंत्रांना सुद्धा कॅबिनेट मंत्र्यांप्रमाणेच सगळे भत्ते आणि इतर सुविधा प्राप्त होतात. माजी केंद्रीय मंत्र्यांना लागू असलेल्या पेन्शनसाठी सुद्धा ते पात्र ठरतात. मात्र कॅबिनेट बैठकीत त्यांचे मुद्दे मांडण्याचा अधिकार त्यांच्याकडे नसतो.
===
हे ही वाचा – मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्षा बंगल्याचा अज्ञात इतिहास!
===
मग मंडळी, कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यात नेमका काय फरक असतो, याबद्दलच्या शंका आता दूर झाल्या असतील ना? राज्यमंत्र्यामध्येही २ प्रकार असतात हे तुम्हाला माहित होतं का? ही माहिती तुमच्या मित्रमंडळींकडे असेल, याची तुम्हाला खात्री आहे का? तशी खात्री असेल, तर या लेखाच्या माध्यमातून त्यांच्याशी जरुर चर्चा करा. त्यांना याबद्दल काहीच ठाऊक नाही, असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी, हा लेख त्यांच्यासह शेअर करा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.