६० फूट खोल विहीर एकटीच्या बळावर खोदणारी आधुनिक “लेडी भगीरथ”!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
ह्या जगात सगळ्यात मौल्यवान गोष्ट कुठली? पैसा? हिरे? सोने? पेट्रोल? नाही, माणूस एकवेळ अन्नाशिवाय काही दिवस जगू शकेल पण पाण्याशिवाय माणूस जगूच शकणार नाही.
म्हणूनच स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी ह्या जगात सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. हळू हळू ह्याच गोष्टीचे प्रमाण पृथ्वीवरून दिवसेंदिवस कमी कमी होतेय.
अनेकांना पिण्यायोग्य पाणी मिळण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागते तेव्हा कुठे त्यांना थोडे पाणी मिळते.
अनेकांना तर शुध्द आणि पिण्यायोग्य पाणी मिळतही नाही. तरीही आपण पाण्याची किंमत ओळखून त्याचा वापर योग्य रित्या करत नाही. उलट कुठल्याच कष्टाविना घर बसल्या मुबलक पाणी मिळतंय म्हटल्यावर आपण वाटेल तसं पाणी वापरतो आणि पाण्याची नासाडी करतो.
कधी उन्हाळ्यात पाणीकपात झाली आणि पाणी कमी पडू लागले की मग आपल्याला पाण्याची किंमत कळते, पण परत पाण्याचा प्रश्न सुटल्यावर सगळं विसरून आपली ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी गत होते. आपल्या सवयींमध्ये छोटे छोटे बदल केल्यास आपण अनेक लिटर पाणी वाचवू शकतो. पाण्याला गृहीत धरणे अतिशय महागात पडू शकते.
आपण पाण्याची किंमत ठेवत नाही हे आपल्या भाषेतून सुद्धा कळते, ”त्याने पाण्यासारखा पैसा खर्च केला” असं म्हणताना आपण पाण्याला नगण्य महत्व देतो म्हणूनच आज जगात अनेक ठिकाणी पाण्याविना लाखो लोक तडफडत आहेत.
जगात तिसरं महायुद्ध पाण्यासाठी होणार असं म्हणतात ते काही खोटं नव्हे!
हळू हळू शुद्ध पाणी मिळणेच दुरापास्त झाल्यावर पाण्यासाठीच लोक एकमेकांच्या देशावर हल्ले करू शकतील. हे होऊ नये असे वाटत असेल तर प्रत्येकाने पाणी वाचवण्याचा प्रयत्न केल्यास भरपूर पाणी वाचू शकते.
महाभारतात भगीरथाने अपार कष्ट करून स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली होती. आज आपण अशाच एका आधुनिक भगीरथ महिलेविषयी जाणून घेणार आहोत. ह्या महिलेने एकटीने पाण्यासाठी ६० फुट खोल विहीर खणली आहे.
जगात सगळीकडे बायकांना ‘weaker sex’ समजले जात असताना आपण प्रबळ इच्छाशक्तीने अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणाऱ्या महिलांबद्दल ऐकत असतो. तरीही अजूनही महिलांना कमजोर व दुर्बल लेखणाऱ्या लोकांची कीव येते.
उत्तर कन्नड मधील सिरसी गावात राहणाऱ्या गौरी एस. नाईक ह्यांनी हा अचाट पराक्रम करून दाखवला आहे.
५१ वर्षीय गौरीजींनी ६० फुट विहीर एकटीने फक्त ३ महिन्यात खणली आहे. आता ही विहीर त्यांच्यासाठी व त्यांच्या गावातल्या लोकांसाठी पाण्याचा बारमाही स्त्रोत आहे. ह्या गौरी नाईकांना लोक ‘लेडी भगीरथ’ असे म्हणतात.
गौरी नाईक ह्यांची अनेक नारळी पोफळीची झाडे आहेत. ह्या झाडांना भरपूर पाण्याची आवश्यकता असते. परंतु नाईक ह्यांच्या कडे पाण्याचा स्त्रोत नव्हता व शिवाय विहीर खोदण्यासाठी आवश्यक तेवढे पैसेही नव्हते. म्हणूनच त्यांनी एकटीने विहीर खोदण्याचा निर्णय घेतला.
ह्यासाठी त्यांनी कोणाचीही मदत घेतली नाही व खोदकाम सुरु केले. आणि अनेक महिन्यांच्या अखंड कष्टानंतर त्यांच्या कष्टाला फळ आले व विहिरीला पाणी लागले.
रोज त्या सलग सहा तास खोदकाम करीत असत व जमिनीच्या चार फुट खोल उतरत असत. ह्या कामात शेवटी शेवटी त्यांना आणखी तीन स्त्रियांनी मदत केली. विहिरीतील माती व घाण स्वच्छ करण्यासाठी ह्या तीन महिल्या पुढे सरसावल्या.
गौरी नाईक ह्या Dharmastala rural development schemeच्या सदस्या आहेत. पण त्यांच्या ह्या कष्टपूर्ण कामाविषयी कोणालाही काहीही कल्पना नव्हती असे ही योजना राबवणाऱ्या एकाअधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाला एका मुलाखती दरम्यान सांगितले.
ते म्हणाले की
जेव्हा जेव्हा गौरी नाईक मिटिंग साठी यायच्या तेव्हा त्यांना अंगदुखीचा त्रास होत असे. पण आम्हाला कोणालाही त्यांच्या विहीर खोदण्याच्या कामाविषयी काहीच कल्पना नव्हती. जेव्हा आम्ही त्यांना त्यांच्या घरी भेटायला गेलो तेव्हा आम्हाला परिस्थिती लक्षात आली कि त्या एकट्याच विहीर खोदण्याच्या कामाला लागल्या आहेत.
म्हणूनच स्त्रिया कुठलीही तक्रार न करता आपले काम कितीही त्रास झाला तरी शांतपणे पूर्ण करू शकतात.
स्त्रियांकडे जी सहनशक्ती आणि इच्छाशक्ती असते तिच्या जोरावर त्या अवघडातले अवघड काम अपर कष्ट करून पूर्ण करून दाखवतात. हेच गौरी नाईक ह्यांनीही केले.
त्या सुद्धा एक आई असल्यामुळेच त्यांनी हे अशक्य काम एकटीने शक्य करून दाखवले. गौरी नाईक ह्यांना एक अपत्य असल्याचे समजते. त्या सिरसी येथील गणेश नगर मध्ये मजुरीचे काम करतात.
गौरी नाईक ह्यांच्या कष्टाचे फळ म्हणून त्यांच्या विहिरीला सात फुट इतके पाणी आहे व त्यांची स्वत:ची १५० पोफळीची झाडे , १५ नारळाची व अनेक केळ्यांची झाडे आहेत.
आपल्या देशात असे कष्ट करणाऱ्या स्त्रिया अनेक सापडतील. ज्या दिवशी त्यांच्या मेहनतीला योग्य न्याय मिळेल तोच खरा महिला दिन असेल!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.