या चार ‘गंभीर’ चुकांमुळे गौतम गंभीर सारख्या जबरदस्त खेळाडूचं करिअर आटलं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
एक काळ असा होता जेव्हा गौतम गंभीर याने सर्व भारतीय क्रिकेट रसिकांवर गारुड केले होते. गंभीर ओपनिंगला खेळायला आला म्हणजे भारताला उत्तम सुरुवात करून देणार हे जवळ जवळ पक्क असायचं.
तर असा हा प्रतिभावंत क्रिकेटर काही चुकांमुळे मात्र मागे राहिला, आणि शेवटी सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्ती पत्करून त्याने भारतीय जनता पक्षाचा खासदार या नात्याने राजकारणातील नवीन इनिंग सुरु केली आहे.
आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये त्याला काही काळ त्याच्या गैरवर्तनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. सध्या तो आयपीएल मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकपदी कार्यरत आहे.
तापट स्वभाव आणि त्याने आजवर अनेक खेळाडूंशी थेट मैदानावर घेतलेला पंगा यामुळे त्याची प्रतिमा मलीन झाली होती.
याचा परिणाम असा झाला की, त्याचा खेळ उत्तम असून देखील केवळ वाईट वर्तनामुळे त्याला भारतीय टीममध्ये घेण्यास सिलेक्टर्स कचरत.
असो आज आपण गौतम गंभीरच्या कारकिर्दीतील त्या चार चुका जाणून घेऊ ज्यांच्यामुळे गंभीर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जवळपास हद्दपार झाला.
१. २००७ साली पाकिस्तान संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्यापूर्वी २००४ व २००६ च्या पाकिस्तान मध्ये झालेल्या सिरीजमध्ये भारताने पाकिस्तानला नमवून सिरीज आपल्या नावावर करून घेतली होती.
त्यामुळे पाकिस्तान वचपा काढण्याच्या उद्देशाने आणि भारत शेजाऱ्यांना पुन्हा नमवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरले.
या दौऱ्यातील एका सामन्यात गौतम गंभीरने शाहीद आफ्रिदीच्या बॉलवर सणसणीत चौकार ठोकला.
दुसऱ्याच बॉलवर गंभीरने एक रन चोरण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी धावताना गंभीर आफ्रिदीवर जाऊन आदळला. झालं, दोघांमध्ये या शुल्लक कारणावरून बाचाबाची झाली.
दोघांनी एकमेकांना शिव्यांची लाखोलीही वाहिली. दोघंही कोणाचच ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते.
त्यांचा हा उद्दामपणा पाहून मॅच रेफ्री रोशन महानामा यांनी गौतम गंभीरच्या मॅच फी मधून ६५ टक्के रक्कम कापून आणि आफ्रिदीच्या मॅच फी मधून ९५ टक्के रक्कम कापून दोघांनाही दंड सुनावला.
या प्रकरणामुळे गौतम गंभीर सारख्या शांत वाटणाऱ्या खेळाडूचे उग्र रूप पहिल्यांदा समोर आले.
हा संपूर्ण प्रसंग तुम्ही येथे पाहू शकता.
२. गंभीरच्या हातून दुसरी चूक घडली पुढच्याच वर्षी म्हणजे २००८ मध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या वेळी!
दिल्लीमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यातील ५१ व्या ओव्हरवेळी गंभीरने दुसरा रन घेताना ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज शेन वॉटसन याला हाताचा कोपरा मारला होता. पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली.
पण यावेळी चूक गंभीरची नव्हती, शेन वॉटसननेच त्याला पहिले डिवचले होते, त्याचे उत्तर म्हणून गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली होती.
चौकशीवेळी गंभीरने स्पष्ट केले की वॉटसनला चुकून धक्का लागला होता. पण आयसीसीने त्यांना लेव्हल २ चा दोषी ठरवत त्याच्यावर एका मॅचची बंदी घातली, पण त्याच सामन्यात त्याने डबल सेंच्युरी झळकावत आपल्या धमाकेदार खेळाचे प्रदर्शन केले होते.
पण शेवटी ही गंभीरच्या कारकीर्दीमधील सलग दोन वर्षातील दुसरी ‘गंभीर’ चूक होती.
हा संपूर्ण प्रसंग तुम्ही येथे पाहू शकता.
३. या दोन चुकांमध्ये भर पडली आयपीएल मधील अजून एका प्रकरणाची जेव्हा गौतम गंभीरने आपलाच भारतीय खेळाडू विराट कोहलीसोबत पंगा घेतला होता. २०१३ च्या आयपीएल सीजन ६ मधली कोलकाता विरुद्ध बँगलोरचा सामना सुरु असताना १० व्या ओव्हरला बालाजीने कोहलीला आउट केले.
तेव्हा आनंदाच्या भरात (?) गौतम गंभीर ने कोहलीला चिथावले आणि तुम्हाला तर कोहलीचा स्वभाव माहितीच आहे. तो देखील तापट! मग भर मैदानातच दोघांमध्ये जुंपली.
ऐनवेळेला कोलकात्याचा खेळाडू रजत भाटीयाने मध्ये पडून दोघांना दूर केले आणि वाद थांबवला.
अम्पायर्सनी देखील दोघांवर कोणतीही कारवाई केली नाही, पण यामुळे गंभीरची प्रतिमा अधिकच मलीन झाली, कारण यावेळी त्याने थेट आपल्याच देशाच्या खेळाडूशी भिडून विनाकारण वाद ओढावून घेतला होता.
या संदर्भातील न्यूज रिपोर्ट तुम्ही येथे पाहू शकता
४. चौथी मोठी चूक गंभीरने केली ती २०१५ च्या रणजी ट्रॉफी दरम्यान! दिल्ली आणि कोलकाता संघामधील रणजी सामन्यात भारतीय क्रिकेटचे चांगलेच वाभाडे निघणार होते, पण तसं काही घडण्यापूर्वीच प्रसंग टळला.
मनोज तिवारी कोलकाता संघाकडून जेव्हा बॅटिंग साठी उतरला तेव्हा त्यान केवळ कॅप घातली होती, पण जेव्हा दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरने मनोज तिवारीला आव्हान देण्यासाठी फास्ट बॉलरला आणले, तेव्हा मात्र मनोज तिवारीने हेल्मेटची मागणी केली.
तेव्हा गंभीरने मनोज तिवारीवर वेळ फुकट घालण्याचा आरोप केला. दोघांमध्ये बाचाबाची झाली.
गंभीरने मनोज तिवारीला धमकी दिली की,
तू शाम को बाहर मिल, तुझे मैं बताता हूं
यावर मनोज तिवारीने प्रत्युत्तर दिले,
शाम को क्यों, मामले को अभी ही निपटा लेते हैं
आणि वाद अधिकच वाढला. अम्पायर्सने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गौतम गंभीरने त्यांना देखील धक्का दिला. गौतम गंभीरचे हे वर्तन म्हणजे सर्व चुकांचे कळस ठरले. त्याच्यावर चहुबाजूंनी टीका झाली.
हा संदर्भातील न्यूज रिपोर्ट तुम्ही येथे पाहू शकता.
अश्या या प्रतीभावंत खेळाडूने या चार चुकांव्यतिरिक्त अजूनही अनेक चुका केल्या, ज्यामुळे त्याचा खेळ मागे राहिला आणि त्याची वेगळीच प्रतिमा उभी राहिली.
भारताचे जेवढे महान फलंदाज होऊन गेले आहेत त्यांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसण्याची क्षमता गौतम गंभीर मध्ये नक्कीच होती. परंतु आता वेळ निघून गेली आहे असेच म्हणावे लागेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.