‘कपूर अण्ड सन्स’ चे हे २७ दुर्मिळ B&W फोटो चित्रपटप्रेमींनी पहायलाच हवेत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कपूर कुटुंब हे भारतीय चित्रपटसृष्टीतले सर्वात जुने आणि तरीही सक्रिय कुटुंब आहे. कपूर परिवाराला भारतीय सिनेसृष्टीचे पहिले कुटुंब असेही म्हटले जाते. कपूर कुळाच्या अनेक पिढ्या त्यांच्या त्यांच्या व्यवसायात उत्तम काम करत आहेत.
पृथ्वीराज कपूरपासून झालेली सिनेसृष्टीतली कपूर परिवाराची सुरुवात आजही आपल्या समर्थ अभिनयाचा झेंडा रोवून उभी आहे.
चला तर, तुम्हाला संपूर्ण कपूर परिवाराची ओळख करून देऊया. कपूर परिवाराचे काही अत्यंत दुर्मिळ फोटो, ज्यात पृथ्वीराज कपूर यांची मुले, नातवंडं, पणतू, खापर पणतू सगळेच आहेत. नक्की बघा!
१. पृथ्वीराज कपूर – रामसारनी मेहरा-कपूर
कपूर परिवारात अभिनयाची सुरुवात पृथ्वीराज कपूर यांनी केली होती. पृथ्वीराज कपूर यांचा विवाह रामसारनी मेहरा यांच्याशी झाला होता. राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर व उर्मीला ही त्यांची अपत्ये! भारतीय सिनेसृष्टीचा पहिला बोलपट ‘आलम आरा’मध्ये पृथ्वीराज कपूर प्रमुख भूमिकेत होते.
पृथ्वी थिएटरची स्थापना त्यांनीच केली आहे.
२. राज कपूर – कृष्णा मल्होत्रा कपूर
पृथ्वीराज कपूर यांचे सगळ्यात मोठे सुपुत्र म्हणजे बॉलिवूडचा ‘शो मॅन’ राज कपूर! त्यांच्या मामाची मुलगी कृष्णा मल्होत्रा हिच्या पृथ्वीराज कपूर यांनी राज कपूर यांचे लग्न लावून दिले होते.
चित्रपट हाच ध्यास, चित्रपट हाच श्वास… म्हणून जगणारे अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते म्हणजे राज कपूर!
३. शम्मी कपूर – गीता बाली-कपूर/नीलादेवी गोहिल-कपूर
पृथ्वीराज कपूर यांचे दुसरे सुपुत्र शम्मी कपूर म्हणजेच शमशेर राज कपूर! एक बिनधास्त, बेभान असा ताकदीचा अभिनेता. शम्मी कपूर यांची पहिली पत्नी अभिनेत्री गीता बाली यांचे लग्नानंतर दहा वर्षांत दुःखद निधन झाले.
पत्नीच्या निधनामुळे शम्मी कपूर कोलमडून गेले होते. परिवाराच्या दबावामुळे शम्मी कपूर यांनी नीला देवी यांच्यासोबत दुसरे लग्न केले.
४. शशी कपूर – जेनिफर केंडल कपूर
पृथ्वीराज कपूर यांचे धाकटे सुपुत्र शशी कपूर म्हणजे बलबीर राज कपूर हे भारतीय सिनेसृष्टीचे ‘चॉकलेट हिरो’ म्हणून सुप्रसिद्ध आहेत.
ज्येष्ठ बंधू शम्मी यांनी वडील पृथ्वीराज कपूर यांची प्रेमात पडलेल्या शशी कपूरचे जेनिफर या विदेशी मुलीशी लग्न करण्यासाठी परवानगी मिळवली.
५. उर्मिला कपूर सीआल – चरणजीत सीआल
पृथ्वीराज कपूर यांची कन्या उर्मिला कपूर यांनी कधीच सिनेक्षेत्रात काम केले नाही. परंतु त्या हुशार होत्या, शिक्षण पूर्ण करून त्यांनी वडिलांना कामात मदत केली.
६. रणधीर कपूर – बबिता शिवदासानी कपूर
राज कपूर यांचे ज्येष्ठ चिरंजीव म्हणजे रणधीर कपूर यांचा ‘कल आज और कल’ हा गाजलेला चित्रपट.
या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते बबिता यांच्या प्रेमात पडले व कालांतराने दोघांनी लग्न केले. परंतु लग्नाच्या काहीच वर्षांनंतर वेगळे व्हायचा निर्णय दोघांनी घेतला.
७. ऋषी कपूर – नीतू सिंग कपूर
राज कपूर यांचे द्वितीय चिरंजीव म्हणजे ऋषी कपूर. बॉबी या चित्रपटाद्वारे पदार्पण करून त्यांनी त्यांच्यातल्या सशक्त अभिनेत्याची चुणूक दाखवली.
ऋषी कपूर-नीतू सिंगची रुपेरी पडद्यावरील लोकप्रिय जोडी खऱ्या-खुऱ्या आयुष्यातही प्रेमविवाह करून चमकली.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
–
हे ही वाचा – लग्नानंतर काही वर्षांनी नवरा बायको एकमेकांसारखे दिसू लागतात, याचं कारण काय?
–
८. राजीव कपूर – आरती सभरवाल
राज कपूर यांचे सगळ्यात लहान चिरंजीव म्हणजे राजीव कपूर. ‘राम तेरी गंगा मैली’ हा त्यांचा पदार्पणाचा चित्रपट तुफान गाजला, परंतु त्यानंतर त्यांच्या वाटेला पुरेसे यश आले नाही.
त्यांचे लग्न आरती सभरवाल या आर्किटेक्टसोबत झाले होते. परंतु, केवळ दोन वर्षांत दोघांनी घटस्फोट घेतला.
९. रीतू कपूर-नंदा – राजन नंदा
राज कपूर यांची कन्या रीतू कपूर यांचा विवाह उद्योगपती राजन नंदा यांच्याशी झाला. रीतू यांनी चित्रपटसृष्टीत कधीच काम केले नसले तरी त्या एक अत्यंत यशस्वी उद्योजिका होत्या.
त्यांच्या नावे ‘एका दिवसात सतरा हजार पेंशन पॉलिसीज’ विकण्याचा रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये सामील आहे.
१०. रीमा कपूर-जैन व मनोज जैन
राज कपूर यांची धाकटी कन्या रीमा कपूर यांचा विवाह इन्व्हेस्टमेंट बँकर मनोज जैन यांच्याशी झाला. रीमा यांनीही कधीच चित्रपटात काम केले नाही.
११. आदित्य राज कपूर – प्रीती कपूर
शम्मी कपूर यांचे चिरंजीव आदित्य राज कपूर हे उद्योजक असून त्यांनी सुरुवातीला काही चित्रपटात लहान-सहान भूमिका करून सिनेसृष्टीत नशीब अजमावून पाहिले होते.
त्यांचं लग्न त्यांच्या सावत्र आईच्या बहिणीची मुलगी प्रीती हिच्याशी झाले.
१२. कांचन कपूर देसाई – केतन देसाई
शम्मी कपूर यांची कन्या कांचन हिचा विवाह सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक मनमोहन देसाई यांचे सुपुत्र केतन देसाई यांच्याशी झाला.
१३. कुणाल कपूर – शीना सिप्पी कपूर
शशी कपूर यांचे सुपुत्र कुणाल कपूर यांनी ‘आहिस्ता आहिस्ता’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केलं. मात्र त्यांना अभिनेता म्हणून फारसं यश मिळालं नाही.
त्यांचं लग्न सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक रमेश सिप्पी यांची कन्या शीना सिप्पी यांच्याशी झालं मात्र ते लग्न टिकू शकलं नाही.
१४. करण कपूर – लोर्ना टार्लिंग कपूर
शशी कपूर यांचे धाकटे सुपुत्र करण कपूर यांनी ‘सल्तनत’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉम्बे डायिंगची त्यांची जाहिरातही चांगलीच गाजली, परंतु सिनेसृष्टीत हवा तसा ठसा त्यांनाही निर्माण करता आला नाही. मात्र त्यांनी फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
करण कपूर यांनी ब्रिटिश मॉडेल लोर्ना टार्लिंग हिच्याशी विवाह केला परंतु कालांतराने दोघे वेगळे झालेत.
१५. संजना कपूर थापर – वाल्मिक थापर
शशी कपूर यांची कन्या संजना यांनी काही चित्रपटात अभिनय केला. परंतु सध्या त्या शशी कपूर व जेनिफर कपूर यांनी पृथ्वीराज कपूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेल्या पृथ्वी थिएटरच्या संचालिका आहेत.
संजना यांचा विवाह सुप्रसिद्ध वन्यजीव संरक्षक व लेखक वाल्मिक थापर यांच्याशी झाला आहे.
राज कपूर यांची नातवंडं…
१६. करिष्मा कपूर
बबिता व रणधीर कपूर यांची थोरली लेक म्हणजे अभिनेत्री करिष्मा कपूर हिचा विवाह उद्योगपती संजय कपूर यांच्याशी झाला होता, परंतु नंतर दोघे विभक्त झालेत.
१७. करीना कपूर-खान
रणधीर यांची धाकटी कन्या करीना कपूर हिचा विवाह बॉलिवूडचे आघाडीचे अभिनेते सैफ अली खान पटौदी यांच्याशी झाला. सैफ अली खानचं हे दुसरं लग्न आहे.
–
हे ही वाचा – बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता त्याच्या कुटुंबासमवेत राज कपूर यांच्या गॅरेज मध्ये होता आश्रयाला!
–
१८. रिद्धीमा कपूर-साहनी
ऋषी-नीतू यांची मुलगी रिद्धीमा ही सुप्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर आहे. तिचा विवाह उद्योगपती भरत साहनी यांच्याशी झाला.
१९. रणबीर कपूर
ऋषी-नीतू यांचा चिरंजीव रणबीर कपूर सध्याचा आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
रणबीर कपूर याचं खाजगी जीवन त्याच्या भरमसाठ गर्लफ्रेंड्समुळे नेहमीच चर्चेत असतं. सध्या तो आलिया भट हिला डेट करत असल्याची चर्चा आहे.
–
हे ही वाचा – सिनेमातला हा ‘रॉकस्टार’ खासगी जीवनात कसा आहे? उत्तरं वाचून त्याच्या आणखी प्रेमात पडाल
–
२०. निखिल नंदा, श्वेता बच्चन, अगस्त्य, नव्या नवेली व बच्चन कुटुंबीय
२१. अरमान जैन, अनीसा मल्होत्रा-जैन, रीमा कपूर-जैन, मनोज जैन व कपूर भावंडं
२२. आदर जैन, अरमान जैन, अनीसा मल्होत्रा-जैन, रीमा कपूर-जैन, मनोज जैन, करीना, करिष्मा व रणबीर कपूर
शम्मी कपूर यांची नातवंडं…
२३. विश्वप्रताप राज कपूर व तुलसी कपूर
२४. राजेश्वरी देसाई व पूजा देसाई
शशी कपूर यांची नातवंडं
२५. जहान पृथ्वीराज कपूर व शायरा लॉरा कपूर (कुणाल कपूरसोबत)
२६. आलिया कपूर व झैक कपूर (करण कपूर सोबत)
२७. हमीर थापर (संजना कपूर-थापर सोबत)
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.