Site icon InMarathi

बाळासाहेबांमुळे एका रात्रीत नारायण राणे ‘बेस्ट’चे चेअरमन कसे झाले?

best inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या राज्यात चर्चा आहे ती आपल्या लाडक्या एसटी संपाची, दिवाळी आधीपासून या संपाला सुरवात झाली होती, काही ठिकाणी मात्र एसटी डेपो सुरु होते, आता मात्र त्यांनीही या संपात भाग घेतला आहे. दिवसागणिक हे प्रकरण चिघळत चालले आहे.  अधूनमधून मुंबई बेस्टचा संप देखील होत असतो, याच बेस्ट बसच्या चेअरमनपदी  बाळासाहेबांनी एका रात्रीत नारायण राणे यांना बसवले होते…

काळ होता १९८४ चा! एकीकडे मुंबईत सगळ्याच क्षेत्रात बदलाचे वारे वाहू लागले होते तर दुसरीकडे मुंबई महापालिकेची निवडणूक नजरेच्या टप्प्यात आली होती.

 

 

शिवसेनेच्या चेंबूर शाखेत नारायण राणे शाखाप्रमुखाच्या खुर्चीत बसले होते. राजकारण या मनाजोगत्या क्षेत्रात काम सुरु केल्याचं समाधान होतंच मात्र या नव्या क्षेत्रापायी नोकरी सोडल्याने मनात धाकधुकही होती.

नारायण राणे यांनी नोकरी सोडली आणि उदरनिर्वाहासाठी वाहनांच्या सुट्ट्या भागाचा व्यवसाय थाटला. त्यावेळी नारायण राणे हे नाव केवळ चेंबूर प्रभागापुरतंच मर्यादित होतं, मात्र लवकरच येणारी महापालिकेची निवडणूक आपलं नशिब बदलेल हा त्यांचा विश्वास होता.

जय्यत तयारीनिशी नारायण राणे महापालिकेच्या निवडणूकीच्या रिंगणात उतरले. त्याकाळी मुंबईत नारायण राणेंची ‘हवा’ असल्याने ते विजयही झाले.

 

 

योगायोगाची बाब ही की त्याच वर्षी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला होता. त्यामुळे नारायण राणे हे नाव भविष्यात मोठं होणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.

एकीकडे आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा करणा-या नारायण राणेंनी त्याच काळात हॉटेल व्यवसायाचा पाया रचला. ग्रेड वन या पहिल्यावहिल्या हॉटेलचं दणक्यात उद्घाटन करत कोकणी माणूस मुंबईत स्थिरावू लागला होता.

सन १९८५ मध्ये नगरसेवक म्हणून काम करत असणा-या नारायण राणेंवर इतर कोणतीही महत्वाची जबाबदारी स्विकारण्यात आली नव्हती. महत्वकांक्षी नारायण राणेंनी यासाठी खटपट सुरु केली होती, मात्र या प्रयत्नांना फारसे यश मिळत नव्हते.

त्याचवेळी मातोश्रीत खळबळ सुरु झाली. नव्याने नियुक्त झालेल्या नगरसेवकांपैकी कोणाला कोणती जबाबदारी द्यावी या चर्चांना उधाण आलं. मात्र आश्चर्याची बाब ही की यापैकी कोणाच्याही ओठी नारायण राणे हे नाव नव्हतं.

 

 

याचं कारण असं की शाखाप्रमुख ते नगरसेवक या प्रवासादरम्यान राणेंचा दरारा, वाढते वाद यांचे किस्से गल्लीपासून थेट मातोश्रीवरही थडकत होते. त्यामुळे भडक डोक्याच्या राणेंच्या खांद्यावर कोणतीही जबाबदारी सोपवावी की नाही याबाबत सर्वांना संभ्रम होता.

अशातच बाळासाहेबांचे निकटवर्तीय छगन भुजबळ यांनी नारायण राणेंचं नाव पुढे करत बेस्ट अर्थात बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अण्ड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन समितीवर त्यांची शिफारस केली.

बाळासाहेबांनी ही शिफारस ऐकून घेतली आणि हसत छगन भुजबळांना प्रतिप्रश्न केला, की “राण्याला तिकडे पाठवून बेस्ट तोडायचा विचार आहे का? एकूणच त्याचा दरारा लक्षात घेता बेस्टमध्ये तो राडा करेल”.

 

हे ही वाचा – दुसऱ्याचा ‘सामना’ बाळासाहेबांनी या पद्धतीने जिंकला होता…!

बाळासाहेबांच्या या प्रश्नावर छगन भुजबळांसह सगळेच मनमुरादपणे हसले, मात्र भुजबळांनी आपला मुद्दा पुढे रेटला. शिवसेनेच्या प्र्त्येक बैठकीला येताना नारायण राणे प्रत्येक मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास करतात, मुंबईचीच नव्हे तर मराठी माणसाची नसही त्यांना पकडता येते अशा वेगवेगळ्या पद्धतीने भुजबळांनी बाळासाहेबांना आपलं म्हणणं पटवून देण्याचा पुरेपर प्रयत्न केला.

अखेर बाळासाहेबांनीही शांतपणे या मुद्द्याचा विचार केला. ‘बेस्ट’सारख्या कठीण उपक्रमाची जबाबादारी स्विकारण्यासाठी बळकट बाहुंचाच नव्हे तर कुशल नेतृत्व असलेला आणि निडर नेता पाहिजे हे त्यांना मान्य होते, आणि या सर्व निकषांमध्ये नारायण राणे चपखल बसत असल्याचे मान्य करत बाळासाहेबांनी या प्रस्तावाला होकार दिला.

दोन वर्षात म्हणजे १९८९ मध्ये बेस्टच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर त्याची उलाढाल तब्बल १५०० कोटींवर गेल्याचाही उल्लेखही नारायण राणेंनी आपल्या झंजावात या आत्मचरित्रात केला आहे.

महापालिकेच्या समितीवर नेमलेल्या अध्यक्षाची निवड अवघ्या एका वर्षासाठी असते, मात्र याबाबत नारायण राणेंनी हॅट्रिक केली, हे शक्य झालं ते त्यांचे कुशल प्रशासन, शिस्त आणि बाळासाहेबांचा कोणताही शब्द खाली न पडू देण्याची धडपड यांमुळेच!

 

 

शाखाप्रमुख ते बेस्ट चेअरमन असा प्रवास अवघ्या काही वर्षात पार करणा-या नारायण राणेंनी आता तर दिल्लीत मजल मारली आहे. मोदींच्या मंत्रीमंडळात जागा पटकवाणा-या राणेंना भविष्यात आणखी कोणकोणत्या महत्वाच्या जबाबदा-या पार पाडाव्या लागत आहेत ते येणारा काळच ठरवेल.

हे ही वाचा – राणेंच्या एन्ट्रीमुळे होणार का मोदी सरकारची एक्झिट? वाचा यापूर्वी काय घडलंय…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version