' राणेंच्या एन्ट्रीमुळे होणार का मोदी सरकारची एक्झिट? वाचा यापूर्वी काय घडलंय… – InMarathi

राणेंच्या एन्ट्रीमुळे होणार का मोदी सरकारची एक्झिट? वाचा यापूर्वी काय घडलंय…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

महाराष्ट्रातील ४ मंत्र्यांना केंद्रात जाण्याची संधी मिळाली. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे नारायण राणे.

समाजमाध्यमात अशी चर्चा आहे की, नारायण राणे यांना मंत्रिपद मिळाल्यावर सत्तेत असलेले सरकार अडचणीत आले आहे किंवा त्यांना सत्ता गमवावी लागली आहे, त्यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊयात…

 

 

शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता ते शिवसेनेचा मुख्यमंत्री, असा त्यांचा शिवसेनेतला प्रवास होता. बाळासाहेबांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. पुढच्याच निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे सरकार आले.

 

naryan rane inmarathi 1

 

शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. काँग्रेस मध्ये गेल्यानंतर त्यांना अवजड उद्योग खातं मिळाल. पुढच्याच निवडणुकीत मोदी लाटेमुळे काँग्रेसच्या हातून सत्ता गेली.

 

narayan rane inmarathi 3

 

काँग्रेसमध्ये असताना अनेकवेळा त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे कॉग्रेसमध्ये नाराजी होती, तसेच २०१४ साली ते पराभूत झाले आणि नंतर त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान या नावाने आपला स्वतंत्र पक्ष काढला.

 

narayan rane inmarathi 4

 

स्वतःच्या पक्ष चालवता न आल्याने तसेच महाराष्ट्रात वाढते भाजपचे प्राबल्य बघता, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी आपल्या धाकट्या मुलाला निवडून तर दिले मात्र २०१९ साली  महाविकास आघाडीचे सरकार आले.

 

narayan inmarathi 4

हे ही वाचाच – पुन्हा ‘पहाटे उठवण्यासाठी’ दादांवर दबाव? राजकारणात काही शिजतंय का? वाचा

मध्यंतरी अमित शाह हे सिंधुदुर्गातील मेडिकल कॉलेजच्या उदघाटनाची आले होते, तेव्हापासूनच उलट सुलट चर्चा समाजमाध्यमात होत होत्या आणि काल आपण बघितलेच नारायण राणे यांना केन्द्रात स्थान मिळाले आहे.

आता येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील सत्तेत देखील उलथापालथ होईल का? असे अनेक तर्क लावले जात आहेत. येत्या काही दिवसात ते कळेलच.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?