Site icon InMarathi

स्क्रीनवर बोल्ड सीन्स रंगवायला शिकविणाऱ्या तरुणीचा प्रवास; जाणून घ्या

Bold scene chorographer IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

नव्वदच्या दशकात रेडिओची जागा टीव्हीने घेतल्यानंतर क्रिकेटची मॅच असो किंवा रविवारी दुपारी दूरदर्शनवर लागणारा हिंदी सिनेमा असो, संपूर्ण कुटुंबच काय तर शेजारी पाजारी सुद्धा एकत्र येऊन टीव्ही बघायचे.

मात्र अशावेळी सिनेमात हिरोहिरॉइनने धरलेला हात किंवा समुद्रकिनारी केला जाणारा प्रणय अशी दृश्य लागताच आईवडिल मुलांकडून रिमोट काढून घ्यायचे, किंवा काहीतरी कारण सांगून त्यांना पिटाळून लावायचे.

केवळ पालकच नव्हे तर खुद्द बॉलिवूडही याकाळात अवघडून अशा प्रकारची दृश्य दाखवायचं, ऐंशीच्या दशकात तर केवळ ‘दोन फुलं’ एकत्र आली की प्रणयाचा आशय प्रेक्षकांना समजून घ्यावा लागायचा. त्यानंतर नव्वदच्या दशकात अंगप्रदर्शन, किंवा चुंबनदृश्यांसारखे धाडसी प्रयोग झाले, मात्र त्याचीही संख्या अगदी अत्यल्प!

हा काळ ज्यांनी अनुभवलाय त्यांना सध्याचा ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे कहर वाटणं स्वाभाविक आहे, मात्र सेन्सॉरशीपचं कुंपण नसलेल्या वेबसिरीजने नैतिकतेच्या मर्यादा केंव्हाच ओलांडल्या, मात्र सुरुवातीला ‘असल्या’ दृश्यांवर टिका करणा-यांनी आता हे सारं काही सहजतेने स्विकारलं आहे, किंबहूना वेबसिरीज ‘एन्जॉय’ करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

 

 

आजकाल सर्रास न्यूड सीन्स, सेक्स सीन दिसून येत असतात. प्रेक्षकांकडून ते पाहिलेही जातात. मात्र तुम्ही कधी हा विचार केला आहे का की, हा सीन नेमका चित्रीत कसा झाला असेल? सीनमधील अश्लिलता, त्याची मजा घेणा-यांच्या अश्लिल कमेंट्स किंवा प्रेक्षकांचे अवघडलेपण यांच्या पलिकडे जात त्यामागील अनेकांची किती मेहनत असते याची जाणीव आहे का?

कितीही कसलेला कलाकार असला तरिही असे सीन करताना त्यांना एक प्रकारचा अवघडलेपणा येत असतोच मात्र त्यांचा अवघडलेपणा घालवण्यासाठी धावून येतो तो बोल्ड सीन बसणवणारा कोरिओग्राफर!

विश्वास बसत नाहीये? हे पचायला थोडं कठीण असलं तरी नृत्यासाठी असलेला डान्स कोरिओग्राफर, हाणामारीची दृश्य रंगवणारा अॅक्शन मास्टर यांसोबत आता सेटवर इंटिमसी कोरिओग्राफरही उपस्थित असतो.

 

 

असे सीन दाखवण्यापुर्वी ते कोरिओग्राफ केले जातात, हे वाचून धक्का बसला असेल तर जरा थांबा, कारण खरी गंमत पुढेच आहे.

भारतात या क्षेत्रात पहिलंं पाऊल टाकणारी एक तरुण मुलगी असून सध्याच्या आघाडीच्या कलाकारांना ती बोल्ड सीन करण्याचे धडे देतीय. हा धाडसी निर्णय घेत तो यशस्वीरित्या निभावणाऱ्या मुलीचे नाव आहे आस्था खन्ना!

आज ती इंडस्ट्रीमध्ये इंटिमसी कोऑर्डिनेटर म्हणून काम करते. विशेष म्हणजे भारतातील ती पहिला इंटिमसी कोऑर्डिनेटर आहे

आस्था खन्ना कोण?

आपण बघतो की हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये न्यूड सीन्स, इंटिमसी सीन्स असतातच त्यामुळे अमेरिकेत असे सीन्स शिकवणारी एक संस्था आहे. त्याच संस्थेतून आस्थाने १६ आठवड्यांचा हा कोर्स करून तिने भारतात पाऊल ठेवले. भारतात एकूण ६ प्रोजेक्टवर ती काम करत आहे.

 

 

विशेष म्हणजे या स्वरुपाचे शिक्षण भारतात मिळते का? याचा तिने शोध घेतला, मात्र भारतात असे शिक्षण नसल्याने तिने अमेरिकेच्या इंटमसी प्रोफेशनल असोसिएशनशी संपर्क साधला. या संस्थेशी संपर्क साधत शिक्षण घेणारी साऊथइस्ट अर्थात दक्षिण आशियाई भागातील ती एकमेव विद्यार्थिनी असल्याचंही तिला सांगण्यात आला.

यावेळी आपण केवढी मोठी जबाबदारी पेलत आहोत याची तिला जाणीव झाली.

हे ही वाचा –न्यूड सीन करण्यासाठी तिने अशा काही विचित्र अटी ठेवल्या की सेटवर सगळेच गांगरले…

तिच्या कामाची पद्धत :

तिच्या कामाबाबत अनेक मतमतांतरं आहेत. अनेकांच्या मते या कामाची गरज नाही तर अनेकजण तिच्या निवडीवरही आक्षेप घेतील. मात्र अशा टिका करण्यापुर्वी आधी तिच्या कामाचं स्वरुप जाणून घ्या.

मनोरंजन क्षेत्रात काम करताना प्रामुख्याने तांत्रिक बाबतीत अनेक वेळ अडचणी येत असतात. त्यावर मात करून काम करायचे असते. त्यात आस्थाचे काम तर सर्वात जिकरीचे आहे, एक वेळ एखाद्या सीनमध्ये लाईट हवं तसं नसेल मिळत तर काहीतरी जुगाड करून तो सीन होऊ शकतो.  मात्र न्यूड सीन्स, सेक्स सिन देतांना प्रामुख्याने कलाकार अवघडले असतात.

 

 

आपल्याकडे आजही लोक चार भिंतीच्या आतमध्येच प्रेम व्यक्त करायला पसंत करतात. इथे मात्र २००, ३०० लोकांसमोर असे सीन्स देणे म्हणजे मोठे धाडसाचे काम आहे.

कलाकारांचे नखरे ते प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

कलाकार कितीही बोल्ड असला तरी कॅमेऱ्यासमोर अशा प्रकारचे सीन शुट करताना त्याची दमछाक होते. त्यात सहकलाकार हा त्यातील मोठा भाग असतो. अनेक कलाकारांमध्ये वैर असते. नेमक्या अशाच कलाकारांचे बोल्ड सीन शुट करणं म्हणजे एक दिव्यच!

मात्र चित्रपटाची गरज म्हणून असे सीन शुट करावे लागतात. अशावेळी कलाकारांचे नखरे, वैयक्तिक मतभेद, त्यांच्या न संपणाऱ्या अटी या सगळ्या आघाडींवर आस्था एकटी लढत असते.

एखादा बोल्ड सीन शुट करण्याची मागणी आल्यानंतर ते स्क्रीप्ट वाचणं, त्यानंतर दोन्ही कलाकारांना तो सीन समजावून सांगणं, चित्रपटाच्या कथेनुसार तो सीन कसा रंगवावा, त्यातील संवादांनुसार भावना कशा हव्या यांची आणखी तिच्याद्वारे केली जाते.

 

 

आस्थाचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे दिग्दर्शकाला नेमकं काय अपेक्षित आहे त्याप्रमाणे कलाकरांना समजावून सांगणे, त्यांना तयार करणे, त्यांच्या शरीराचा कोणता भाग दाखवायचा आहे यावरून त्यांची तयारी करणे. तसेच ते भाग झाकण्यासाठी सुद्धा विशेष उपाययोजना करणे.

या सीन्समध्ये प्रामुख्याने कलाकरांना कम्फरटेबल करणं, यासाठी ती खास कलाकारांचे वर्कशॉप घेते, वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम देखील करून घेते. या गोष्टींमुळे कलाकारांमध्ये देखील एकमेकांबद्दलचा विश्वास निर्माण होतो आणि ते comfortable सुद्धा होतात.

 

हे ही वाचा – पॉर्न बघताय इथवर ओके… पण ते शेअर करण्याआधी हे नियम तुम्ही वाचायलाच हवेत!

एखाद्या सेक्स सीनच्या प्रसंगाच्यावेळी विशेष काळजी घ्यावी लागते. कलाकारांकडून सीमारेषा ओलांडली जात नाही ना? तसेच कलाकारांची शारिरीक स्वच्छता यांच्याकडेही लक्ष ठेवावे लागते.

 

 

हे सर्व करताना दिग्दर्शक, कलाकार, कॅमेरामन, मेपअप आर्टिस्ट, कॉश्च्युम डिझायनर अशा सर्वांचा मेळ साधण्याची जबाबदारीही आस्था पार पाडते.

सध्या ती नेटफ्लिक्सच्या काही सिरीजसाठी काम करतीय. तसंच भविष्यात तिने कोरिओग्राफ केलेले अनेक तडकतेफडकते सीन्स आपल्याला पहायला मिळतील, अर्थात त्यावेळी केवळ सीन्स बघून त्यावर टिका करण्यापेक्षा यामागील तिच्या मेहनतीचे कौतुक करायला विसरू नका.

आज कुठल्याही सुखवस्तू कुटुंबातील घरात खास करून मुलीने चित्रपटसृष्टीत करियर करायचे ठरवल्यास तिला विरोध केला जातो.

मात्र करिअरच्या वेगळ्या वाटा निवडून त्यावर मेहनतीने, यशस्वी वाटचाल करणाऱ्या मुलींना कुटुंबाचा, समाजाचा पाठिंबा मिळायला हवा का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version