कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्सनंतर भारताची तिसरी लेक घेतीय अवकाशात झेप!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
स्वप्नाकडून सत्याकडे प्रवास करणारी कल्पना चावला हिचा अंतराळमोहिमेत दुर्दवी अंत झाला असला तरी तिने अनेकींना उडण्याची प्रेरणा दिली. याच पावलावर पाऊल ठेवत सुनिता विल्यम्स आकाशात झेपावली. भारतीय अवकाशकन्यांच्या या यादीत आता तिसरं नाव जोडलं जाणार आहे.
११ जुलै रोजी अंतराळाच्या सफरीसाठी निघालेल्या भारतीय वंशाच्या सिरिशा बांदलामुळे आता अमेरिकेच्या मोहिमेशी भारताचेही नाते जोडले गेले आहे.
महिलांपासून कोणतंही क्षेत्र दूर राहिलेलं नाही, हे वेगळं सांगण्याची गरज नाही, प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिलांनी आपले कर्तृत्व कृतीतून सिद्ध केलं आहे. जमिनीशी नाळ जोडताना अनेकांना आभाळाचाही ध्यास असतो. त्यातील एक म्हणजे सिरिशा बांदला! भारतातील आंध्रप्रदेशाची ही कन्या निघालीय अंतराळवारीला…
–
हे ही वाचा – `ती’ची गगनभरारी भारतीयांसाठी आजही अभिमानास्पद आहे
–
कोण आहे सिरिशा बांदला?
मुळची आंध्रप्रदेशातील गुंटूर गावात बांदला कुटुंबात सिरिशाचा जन्म झाला. कृषी वैज्ञानिक असलेल्या आजोबांच्या मार्गदर्शनाखाली सिरिशाने बालपणापासून जिद्द, चिकाटी यांचे धडे गिरवले.
वैज्ञानिक असलेल्या वडिलांना उत्तम संधी मिळाल्याने ते कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले. टेस्कस येथिल ह्युस्टन येथे शालेय शिक्षण पुर्ण केल्यानंतर सिरिशा यांनी एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगचे क्षेत्र निवडले.
वैमानिक व्हायचे होते पण…
बालपणापासून आकाश तिला खुणावायचे. ते आकाश भारतातले असो वा अमेरिकेतले, या आकाशात नेमकं काय दडलंय? तिथे पोहोचता येईल का? या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी तिने प्रयत्नांची कास धरली.
यापुर्वी अवकाशाला गवसणी घालणारा प्रत्येकजण तिच्यासाठी आदर्श असायचा. त्यांच्या अवकाश सफरीचा प्रत्येक तपशील तिने अभ्यासला.
वैमानिक व्हायचं हे निश्चित असल्याने तिचे प्रयत्न सुरु होते, मात्र नियतीला ते मंजूर नव्हते. परीक्षांमध्ये उत्तीर्ण होवूनही शारिरीक चाचणीत ती उत्तीर्ण होवू शकली नाही. कमकूत दृष्टीचे कारण देत अमेरिकी वायुसेनेने तिचा अर्ज नाकारला. वास्तविकतः कोणतीही शारिरीक कमतरता नसूनही तिचा हा अर्ज रद्द झाला, मात्र माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हती.
अनेक वर्षांचे स्वप्न पुर्ण होऊ शकणार नाही हे लक्षात आल्यानंतर, ती नाराज झाली. मात्र थांबणं तिला ठाऊक नव्हतं. जिद्द कायम असल्याने ध्येय गाठणार हे तिने मनाशी पक्कं केलं होतं.
जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमधून एमबीए पूर्ण केल्यानंतर, एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगची पदवी हाती सिरिशा २०१५ पासून अमेरिकी अंतराळ कंपनी व्हर्जिन गॅलॅक्टिकमध्ये कार्यरत आहेत.
अंतराळ क्षेत्रात काम करणारी ही खाजगी कंपनी असल्याने सिरिशाच्या प्रयत्नांना अधिक वाव मिळाला.
प्रोजेक्ट युनिटी २२ क्रु आणि कंपनी
व्हर्जिंन गॅलेक्टिकतर्फे अंतराळ मोहिम आखण्यात आली आहे. येत्या ११ जुलै रोजी मॅक्सिको येथून उड्डाण करणा-या अवकाशयात्रींमध्ये सिरिशाचा समावेश आहे.
सहाजणांच्या या पथकात दोन महिलांचा समावेश असून भारतीय वंशाची ती एकमेव संशोधक आहे.
‘यूनिटी २२ असे प्रकल्पाचे नामकरण करण्यात आले असून अंतराळात उड्डाण करण्याची कामगिरी करणारी सिरिशा ही तेलुगू वंशाची पहिली महिला ठरेल.
–
हे ही वाचा – धक्कादायक : कोलंबियाच्या अपघाताची नासाला कल्पना होती!
–
अंतराळ प्रवासादरम्यान, सिरीशा रिचर्स अर्थात संशोधनाची जबाबदारी पेलणार आहे. अंतराळ पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयोग म्हणून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच अंतराळ प्रवासासाठी आवश्यक सर्व परवानगी कंपनीला मिळाली आहे, अशी माहिती व्हर्जिन गॅलॅक्टिककडून देण्यात आली आहे.
याबाबत सर्व प्रवाशांची तयारी, चाचण्या पुर्ण झाल्या आहेत.
अमेरिकेच्या या महत्वांक्षी मोहिमेत भारताची ही कन्या आपली जबाबदारी उत्तमपणे पेलेल यात शंका नाही. भारतीय हा कोणत्याही देशात कार्यरत असला तरी आपल्या देशाशी त्याची नाळ कायम जोडली गेलेली असते. त्यामुळेच सिरिशाचं जसं कौतुक अमेरिकेतून होत आहे, तेवढेच भारतीयांकडूनही तिची पाठ थोपटली जात आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.