आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
जी जात नाही ती ‘जात’, असं मराठी भाषेत नेहमीच म्हटलं जातं. जातीभेद भारतीयांसाठी नवीन नाही. त्यातही ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर हा जातीभेद आणि त्यावरून होणारं चर्वितचर्वण नेहमीचंच!
आजही अचानक ट्विटरवर या विषयाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे. ब्राम्हण हे मूळ भारतीय नसल्याचा दावा आणि ही जात, हा DNA भारताबाहेरील असल्याचं एक संशोधन आहे, असं म्हणत ट्विटरकरांनी ‘ब्राम्हणो_का_DNA_विदेशी’ असा हॅशटॅगच ट्रेंडिंग केला आहे.
यावर ट्विट्सच्या माध्यमातून मतमतांतरांचा तुफान पाऊस पडतोय. बघुयात नेटकरी नेमकं काय म्हणतायत ते…!!
सरसंघसंचालक मोहन भागवत काहीतरी भलतंच म्हणतायत आणि ‘बामसेफ’ वेगळंच म्हणतेय, आता नक्की ऐकावं कुणाचं, असा प्रश्न यांना पडलेला दिसतोय. बरं बामसेफ वर्षानुवर्षे हेच सांगत आली आहे असंही हे महाशय म्हणतायत.
मी ब्राम्हण नाही आणि मी या ट्रेंडचं समर्थन करतोय, म्हणत जी प्रतिक्रिया यांनी दिली आहे, तसंच कदाचित इतर मंडळी त्यांना म्हणतील का? ‘ये बढिया था गुरु’ असं म्हणत यांच्याकडे दुर्लक्ष करावं की समर्थन असा प्रश्न बाकीच्यांना पडला असेल.
ब्राम्हण वर्गातील या व्यक्तीने हा ट्रेंड बघून ‘ये कब हुआ’ असा थेट प्रश्न केलाय. यासाठी सुद्धा या मिमचा चपखल वापर केलेला दिसतोय.
जुने दाखले देऊन हे नक्की खरं आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात सुद्धा लोकांनी पुढाकार घेतलाय बरं का मंडळी…
हा हॅशटॅग प्रचंड व्हायरल करा आणि टॉप ट्रेंडमध्ये येऊ द्या, असं म्हणत हा हॅशटॅग वापरणारे ट्विटरवासी सुद्धा मिळतायत. बरं हे असं म्हणणारी ही एकच व्यक्ती नाहीय बरं…!!
हे असं म्हणत वाद वाढवण्याचा प्रयत्न या दोघांनाही करायचा आहे का, असा प्रश्न इतरांना पडला असेल. तर दुसरीकडे ब्राम्हणवर्गाला ट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने डोकं लावलं जातंय. जरा ही पोस्ट बघाच.
ब्राम्हणांनी पाप केलंय असं म्हणतही ट्रोल केलं गेलंय.
ब्राम्हण वर्गातील मंडळींनी स्वतःच्या समर्थनार्थ या हॅशटॅगला प्रत्युत्तर दिलं नसतं, तसेच नवल… ब्राम्हणवर्ग सुशिक्षित असल्यामुळे त्यांच्यावर हा असा आरोप केला जातोय, अशी भूमिका घेतलेली सुद्धा पाहायला मिळतेय.
जातीवाद आला की राजकारण ओघाने आलंच, हे सांगण्यासाठी ही वरची पोस्ट पुरेशी आहे नाही का? हे ट्विट नेमकं ब्राम्हणसमर्थनार्थ आहे, की राजकीय हे आता ज्याचं त्याने ठरवावं.
इतिहास आणि विज्ञानाने सुद्धा ब्राम्हण परदेशी असल्याचं सिद्ध केलं आहे, असं या व्यक्तीचं म्हणणं आहे.
या खरमरीत ट्विटबद्दल काही वेगळं बोलायची गरज आहे का मंडळी?
ब्राम्हणवर्गाविरुद्ध जुने पुरावे गोळा केले जात असतील, तर ही मंडळी शांत थोडीच बसणार आहेत, असंच म्हणायला हवं. केवळ ब्राम्हणच नव्हे, तर सगळेच बाहेरून आलेले आहेत, असा दावा केलेले पुरावे सुद्धा दिले गेले आहेत.
एक हॅशटॅग अचानक ट्रेंडिंग झाला आणि त्यावरून नेटकरी थेट एकमेकांना भिडले. याबद्दल तुमचं काय मत आहे, ते आम्हाला कॉमेंट्समधून नक्की कळवा…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.