Site icon InMarathi

आव्वाज कुणाचा? वाचा, अॅलेक्सा ते रेल्वे अनाउन्समेंटचे आवाज नक्की कुणाचे आहेत.

railway annoucment inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

तुम्ही जेंव्हा मुंबईतल्या एखाद्या रेल्वेस्थानकावर जाता तेंव्हा गर्दी आणि कोलाहलाच्या आवाजात एक परिचित आवाज तुम्हाला सतत ऐकू येत असतो आणि हा आवाज असतो लोकलच्या अनाऊंसमेंटसचा.

ठाणे धीमी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक एक पर आएगी किंवा यात्रीगण कृपया ध्यान दे हा आवाज गेल्या दोन दशकांपसून ओळखीचा असला तरीही हा आवाज नेमका कोणाचा आहे हे मात्र अनेकांना ठावून नाही. या आवाजाचं नाव आहे, सरला चौधरी असं या आवाजाचं नाव आहे.

जगात चौथ्या क्रमांकावर असणारी भारतीय रेल्वे सरला चौधरींच्या सूचनांनी प्रवाशांना प्रवासासाठी मदत करत असते.

 

 

१९८२ साली जेंव्हा सरला चौधरी भारतीय रेल्वेत नोकरीला लागल्या तेंव्हा त्यांना आणि इतरांनाही कल्पना नव्हती की लवकरच सरला चौधरी रेल्वेच्या इतिहासात दखल घेतलं जाणारं नाव बनणार आहेत.

इतर सामान्य कर्मचार्‍यांप्रमाणेच त्याही एक कर्मचारी होत्या. रेल्वेच्या उदघोषणांसाठी तात्पुरते कर्मचारी भरती करण्याचं काम चाललं होतं.

सरला चौधरींनी वेळ घालविण्यासाठी म्हणून याची चाचणी दिली मात्र त्यांचा आवाज अनाउंसमेंटससाठी इतका अचून ऐकू येऊ लागला की पर्मनंट अनाउंसर म्हणून महिला अनाउंसर्सच्या पहिल्या चमूत त्यांचा समावेश करण्यात आला.

हे ही वाचा – “यात्रीगण कृपया ध्यान दे…”, रेल्वे platform वर नेहमी ऐकू येणारा हा आवाज कुणाचा आहे?

रेल्वेच्या अनाउंसमेंटसमधे दोन नावांचा उल्ल्ख करणं अपरिहार्य आहे, एक म्हणजे श्रीनिवास आणि दुसरं नाव आहे, विष्णू झेंडे. हजारो प्रवाशांना आपल्या सूचनांनी मार्गदर्शन करणारे श्रीनिवास हे अंध आहेत हे त्यांना भेटल्यावर ज्यांना कळतं ते आश्चर्यानं थक्क होतात. त्यांच्यातली ही उणीव त्यांच्या कामात कधीच अडसर बनली नाही.

दुसरं नाव म्हणजे विष्णू झेंडे, मुंबईवर अतिकेरी हल्ला झाला त्या २६/११ या दिवशी ते सीएसटीला ड्युटीवर होते बाहेर अंधाधुंद गोळीबार होत असताना आपल्या ऑफिसमध्ये अडकलेल्या झेंडेंनी मात्र त्यांनी आपल्या प्रेझेन्स ऑफ माईंडनं त्यांनी घाबरलेल्या प्रवाशांना मार्गदर्शन करत प्रवाशांना सुरक्षित रहाण्यास मदत केली.

 

 

नंतर २६//११ वर केलेल्या एका माहितीपटात त्यावेळेस तिथे हजर असलेल्या एका प्रवाशानं झेंडेंच्या त्यावेळच्या आवाजाला “व्हॉईस ऑफ गॉड” असं संबोधलं.

या आवाजाच्या आधारानं त्या भयावह अनुभवातून सुखरुप पार पडल्याचं सांगितलं. ज्याच्याशी तेंव्हा सीएसटीवर हजर प्रत्येक प्रवासी सहमत आहे.

गेल्या सहा सात वर्षात अमेझॉनची अलेक्सा असिस्टंट हे नाव आता परिचित बनलं आहे. सुरवातीला जेंव्हा अलेक्सा बाजारपेठेत अवतरली तेंव्हा तिच्याविषयी प्रचंड कौतुक आणि कुतुहल होतं.

अलेक्साला सूचना द्यायचा अवकाश की अलेक्सा गाणी लावत असे, लाईट लावत/बंद करत असे. इतकंच काय, पण अलिकडच्या हायफाय गाड्याही अलेक्साच्या सांगण्यानुसार दारं बंद आहेत का तपासतात. अनेक मीमचा विषय बनलेली अलेक्सा जगभरात घरातला एक सदस्य बनली आहे.

 

 

तुमच्या सगळ्या सूचना गपगुमान ऐकणारी अलेक्सा कोण आहे? कोलोरॅडो येथील व्हॉईस आर्टिस्ट आणि गायक नीना रोल हे या आवाजाचं नाव आहे. जेंव्हा ॲलेक्सा येऊ घातली होती तेंव्हा तिची स्पर्धा आधीच बाजारपेठेत राज्य करणार्‍या गुगल असिस्टंट आणि सिरीशी होती.

या दोन आवाजात उठून दिसणारा आणि त्यांच्या स्पर्धे टिकून रहाणार्‍या अशा आवाजाच्या शोधात अमेझॉनची टीम होती. शेकडो आवाजांच्या चाचण्या घेण्यात आल्या. सुरवातीला अमेझॉन इको डॅगवर ऐकू येणारा हा आवाज आता जगभरातल्या २० हजारांहून अधिक उपकरणांवर ऐकू येतो.

अमेझॉन असिस्टंटचा आवाज होण्यापूर्वी नीनानं अनेक उत्पादनांसाठी आवाज दिला होता. होण्डा, फॉक्सवॅगन पसाट अशा ब्रॅण्डचा यात समावेश आहे.

अलेक्साचा आवाज बनल्यावर मात्र नीनाची ओळख गुप्त ठेवण्यात आली. अलेक्साला कोणाचा आवाज मिळाला आहे हे कसोशिनं गुप्त राखण्यात आलं मात्र अखेर हे नाव जगासमोर आलं आहे.

अलेक्साप्रमाणेच २०११ पासून अस्तित्वात असणार्‍या ॲपलच्या सिरीचा आवाज कोणाचा आहे हे देखिल चार वर्षं गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं.

मात्र २०१३ साली या आवाजाच्या मालकीणीनं स्वत:च आपलं नाव जाहिर केलं आणि जगभरातल्या लाडक्या सिरीचं खरं नाव लोकांना समजलं, सुझान बेन्नेट असं या आवाजाचं नाव आहे.

 

 

दीर्घकाळ गुप्तता राखल्यानंतर जगासमोर सुझाननं खरी ओळख दाखविली याला कारणही तसंच घडलं. निमित्त होतं, व्हर्ज एका व्हिडिओचं. या व्हिडिओत सिरीविषयी लिहिताना असा उल्लेख केला गेला की, हा संगणकीय करामतीचा सिन्थेसाईज्ड आवाज असून व्हिडिओमधे त्यामागची प्रक्रिया विशद करण्यात आली.

सुजानला वाटलं की हीच ती वेळ आहे जेंव्हा या यांत्रिक वाटणार्‍या आवाजामागचा खरा आवाज कोणाचा? हे जगासमोर यायला हवं आहे आणि तिनं आपलं नाव जाहिर केलं. नीनाप्रमाणेच सुझानही व्यावसायिक व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आहे. डेल्टा विमानतळावर तिच्या आवाजातल्या अनाउंसमेंट प्रवाशांना मार्गदर्शन करत असत.

एखादा पत्ता शोधताना पूर्वी वाटेत लागणार्‍या पान टपर्‍या, येणारे जाणारे लोक यांना विचारावं लागत असे मात्र आता तुमच्या हातातल्या मोबाईलमधे नकाशात हा पत्ता शोधता येणं गुगल मॅपमुळे शक्य झालेलं आहे शिवाय गुगल मॅपची सहाय्यक तुम्हाला योग्य सूचनाही देत असते.

 

 

उजवीकडे वळा, डाविकडे जा इतकंच काय पण चारपदरी, सहा पदरी रस्ता असेल तर कोणती लेन निवडा, तुम्ही तुमच्या इप्सितस्थळी किती वाजता पोहोचाल आणि पोहोचल्यावर तुम्ही पोहोचला आहात हे ,” यु हॅव रिच्ड युवर डेस्टिनेशन” असं गोड आवाजात सांगणारी गुगल म्हणजेच कॅरेन जॅकबसेन.

ऑस्ट्रेलियात जन्मलेली आणि अमेरिकेत वाढलेली गायिका कॅरेन ही मोटिव्हेशनल स्पिकर म्हणूनही काम करते. २००२ साली जीसपीएस मधे वापरल्या जाणार्‍या टेक्स्ट टू स्पिच सिस्टीममधे जेकबचा आवाजा निवडण्यात आला.

गार्मिन, नॅव्हमन, टॉम टॉम आणि मिओ या सिस्टिममधे ऑस्ट्रेलियन इंग्लिश पर्याय म्हणून जेकबची निवड करण्यात आली होती. २०११ ते २०१४ या दरम्यान ऑस्ट्रेलियन सिरीचा आवाज म्हणूनही जेकबनं काम केलं.

भारतात दिल्लीत पहिल्यांदा मेट्रो चालू झाली तेंव्हा इथल्या अनाउंसमेंटससाठी जी नावं निवडली गेली त्या आधीच अनेक वर्षं घराघरात पोहोचलेले आवाज होते. शमी नारंग आणि रिनी सायमन ही ती दोन नावं.

 

 

दूरदर्शनच्या नॅशनल न्यूजमधे वृत्तनिवेदक म्हणून दोघांनीही अनेक वर्षं काम केलं होतं. शमी त्यांच्या हिंदीसाठी आणि रिनी त्यांच्या इंग्लिश बोलण्यासाठी ओळखले जात.

या दोघांचं बोलणं ऐकूनही या दोन भाषा कशा बोलाव्यात? हे शिकावं असं म्हणलं जात असे. असे हे दोन प्रख्यात आवाज दिल्ली मेट्रोला लाभले.

===

हे ही वाचा स्वतःच्या आवाजातून ओळख निर्माण करायची असेल तर या टीप्स तुमच्यासाठी!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version