Site icon InMarathi

फोनमधील सिम कार्ड एका बाजूने कापलेले का असते? कारण जाणून घ्या

sim card inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

स्मार्टफोन हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. आपला फोन हा आता केवळ विरंगुळ्याचं साधन न राहता, तो आता आपलं ‘ऑफिस’ झाला आहे. जशी आपण आपल्या गाडीची काळजी घेतो, त्याबद्दलची सर्व माहिती काढतो. तसंच, सध्या आपल्या मोबाईल, मोबाईल कव्हर, मोबाईल स्क्रीन आणि सर्वात महत्वाचं सिम कार्ड याबद्दल संपूर्ण माहिती असणं हे आता क्रमप्राप्त झालं आहे.

सिम कार्ड म्हणजे मोबाईलचा आत्मा हे आपण सगळे जाणतोच. कितीही भारीचा फोन असला तरीही जोपर्यंत सिम कार्ड आहे, तोपर्यंत त्याचा संपूर्ण उपयोग शक्य आहे.

 

 

आपल्या जिवाभावाच्या या सिम कार्ड (SIM) चा फुल फॉर्म काय आहे हे माहीत आहे का? त्याचा आकार पूर्णपणे चौकोनी किंवा आयाताकृती नसून तो एका बाजूने त्रिकोणी का असतो? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.

सबस्क्राईबर्स आयडेंटिटी मॉड्युल (SIM) हा सिम कार्डचा फुल फॉर्म आहे. मोबाईल नेटवर्कमध्ये ग्राहकाची ओळख म्हणून वापरण्यात येणारी ही इलेक्ट्रॉनिक चीप मायक्रो कंट्रोलर म्हणून काम करते. या चीपला आपली एक ‘मेमरी’ असते ज्यामध्ये आपली माहिती लिहिलेली असते.

===

हे ही वाचा – तुमचा स्मार्टफोन फारच लवकर डिस्चार्ज होण्यामागे ही आहेत १० कारणे… वाचा

===

आपल्या फोनमधील काही नंबर्स हे सिम कार्डवर सेव्ह केले जातात आणि इतर नंबर हे फोनच्या मेमरीमध्ये सेव्ह केले जातात. सध्याच्या फोनमध्ये जास्तीत जास्त मेमरी ही फोनमध्येच असते.

अँड्रॉईड फोनमध्ये आपले नंबर्स हे आपल्या इमेल आयडीच्या मेमरीमध्ये सेव्ह केले जातात. आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या सिम कार्डची लांबी ही २५ mm इतकी असते, रुंदी १५ mm आणि जाडी ही ०.७६ mm इतकी असते.

 

 

सिम कार्डचा आकार, रंग हा एकसारखा असावा यासाठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्ड (ISO) आणि इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिकल कमिशन (IEC) या संस्था कार्यरत आहेत. ISO 7816-1 हे स्टँडर्ड सिम कार्डचं कार्य ठरवतं आणि ISO 7816-2 हे सिम कार्ड आकाराने कसं असावं याबद्दल माहिती देत असतं.

सिम कार्डमध्ये एक त्रिकोणी कट असण्याचं कारण हे असतं, की त्यामुळे सिम कार्डवरचे नंबर्स आणि फोनमधील कार्ड होल्डर पिनचे नंबर्स एकमेकांवर येत नाहीत.

फोनमध्ये सिम कार्डसाठी दिलेल्या जागेत ते व्यवस्थित बसावं यासाठी सुद्धा ही सोय केलेली असते. फोन तयार करणाऱ्या प्रत्येक कंपनीला फोन याप्रकारे तयार करणं बंधनकारक आहे.

 

===

हे ही वाचा – आज सगळ्यांच्या फोन मध्ये कॅमेरा आहे, पण जगात कॅमेराचा शोध कसा लागला महितेय?

===

सुरुवातीच्या काळात सिम कार्ड हे चौकोनी असायचे. कारण, तेव्हा लोक एकदा घेतलेलं सिम हे जास्त वेळेस फोनच्या बाहेर काढायचे नाहीत.

दोन सिम कार्ड्सचे फोन आल्यापासून सुद्धा सिम कार्डचा वापर हा जास्त वाढला आणि तो सुसह्य होण्यासाठी सुद्धा सिम कार्डची एक बाजू कट असावी हे ठरवण्यात आलं होतं. प्रत्येक वेळेस सिम कार्ड फोनच्या बाहेर काढतांना दुकानदाराकडे जायची गरज पडू नये हादेखील सिम कार्डचं रूप बद्दलण्यामागे उद्देश होता.

 

 

सिम कार्ड घेतल्या नंतर ते नेमकं कोणत्या बाजूने फोनमध्ये टाकावं? हा देखील प्रश्न लोकांना पडायचा. सिम कार्ड हे ज्या बाजूने फोनमध्ये टाकलं पाहिजे ती सिमकार्डची बाजू ही कट केलेली असते. फोनची सुद्धा तितकीच बाजू ही कट केलेली असते. मोबाईलमध्ये सिम कार्डची कुठे असावी? ते हा कट ठरवत असतं.

सिमकार्डबद्दलची ही माहिती आपल्याला उपयुक्त पडणारी आहे अशी आम्ही आशा करतो. आमच्या इतर लेखांमधून अजून अशा काही टेक्नो गोष्टी सांगायचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.

 

===

हे ही वाचा – सावधान! तुम्ही सिम स्वॅपचे शिकार तर नाही ना!!! वेळीच सावध व्हा आणि हे लक्षात ठेवा…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version