' OTT प्लॅटफॉर्मवर, येत्या वीकेंडला रिलीज होणारे हे ५ चित्रपट अजिबात चुकवू नका! – InMarathi

OTT प्लॅटफॉर्मवर, येत्या वीकेंडला रिलीज होणारे हे ५ चित्रपट अजिबात चुकवू नका!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने आपले रंग दाखवायला सुरुवात केल्याने पुन्हा एकदा राज्यसरकारकडून अंशतः लॉकडाऊनची हाक देण्यात आलीय. परिणामी मॉल, थिएटर्स यांना पुन्हा एकदा टाळे लागल्याने प्रेक्षकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

 

corona lockdown inmarathi

 

मात्र गेल्यावर्षापासूनच स्मार्ट झालेल्या प्रेक्षकांनी रटाळ मालिका, अंगावर येणारे टिव्ही शोज यांपेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मलाच पसंती दिल्याने मनोरंजनासाठी आता कुणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही.

सोमवार ते शुक्रवार मान मोडून काम केल्यानंतर विकेंड एन्जॉय करण्याची मजा काही औरच! शहरातील निर्बंधांमुळे फिरण्यावर मर्यादा आली असली तरी हा विकेंड तुम्ही घरातल्या घरातही साजरा करू शकता. अर्थात त्यासाठी ना कोणते नियम मोजावे लागणार ना पार्टीसाठी अधिक खर्च करावा लागणार.

विश्वास बसत नाहीये? मग हा लेख तुम्ही वाचलाच पाहिजे.

मागील वर्षापासून ओटीटी प्लॅटफॉर्मच्या मागे धावणाऱ्या प्रेक्षकांना दरदिवशी नवं काय पाहवं हा प्रश्न भेडसावतो? अनेकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव्या चित्रपटाच्या शोधमोहिमेतच प्रेक्षकांची दमणूक होते.

 

netflix-logo-inmarathi

 

मात्र या विकेंडला तुमचा हा त्रास वाचणार आहे, कारण उद्या म्हणजे शुक्रवार २ जुलै रोजी एक दोन नव्हे तर तब्बल ५ नव्याकोऱ्या सिनेमांचा खजिना तुमच्यासाठी खुला होत आहे.

त्यामुळे यंदाचा संपूर्ण विकेंड जरी घरात बसलात तरी पैसा वसूल मनोरंजन अनुभवता येणार यात शंका नाही. त्यामुळे खाली दिलेली लिस्ट झटपट वाचा आणि यंदाच्या विकेंडचे एन्टरटेन्मेंट प्लॅनिंग सुरु करा.

 १. हसीना दिलरुबा ( नेटफ्लिक्स)

तापसी पन्नू आणि विक्रांत मेसी यांच्या अभिनयाने नटलेला हसीना दिलरुबा हा बहुचर्चित सिनेमा अखेरिस उद्या दाखल होतोय. नेटफ्लिक्स ओरिजनचा बॅनर असलेला हा चित्रपट सप्सेन्स थ्रिलर आहे.

 

haseena dilruba inmarathi

 

लव्हट्रॅन्गल आणि मर्डर मिस्ट्री, भारतीय प्रेक्षकांचे दोन्ही आवडते विषय या एकाच चित्रपटात रंगवण्यात आल्याने प्रेक्षकांना चित्रपटाची प्रचंड उत्सुकता होती. तापसी पन्नू, विक्रांत मेसी आणि हर्षवर्धन राणे यांच्या मुख्य भुमिका असलेला हा चित्रपट आणखी एका कारणासाठी चर्चेत होता तो म्हणजे तापसी आणि विक्रांत यांचे इंटिमेट सीन!

चित्रपटात ओटीटी प्लॅटफॉर्मला साजेसे अनेक रोमॅन्टिक, इंटिमेट सीन असल्याने घरातील लहान मुलांबरोबर सिनेमा पाहणार असाल तर जरा विचार करा.

 

tapsee inmarathi

 

मात्र अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर बॉलिवूडचा धमाका अनुभवायचा असेल तर आपआपल्या घरी उद्या रात्रीचा शो लगेच बुक करा.

हे ही वाचा – घरबसल्या मनस्ताप वाढवणाऱ्या निगेटिव्ह बातम्यांपेक्षा हा क्लासिक विनोदी चित्रपटांचा खजिना एकदा बघाच

२. द टुमॉरो वॉर (अॅमेझोन प्राईम)

‘टाइम ट्रॅव्हल’ या प्रकार आवडतो? याचं उत्तर हो असेल तर मग या विकेंडला तुम्ही टिव्हीसमोरून हलणार नाही हे नक्की.

अमॅझोन इंटरनॅशनल ओरिजनलचा द टुमॉरो वॉर हा सायन्स फिक्शन चित्रपट उद्या प्रदर्शित होतोय. २०५१ सालापासून सुरु होणारं टाइम ट्रॅव्हल, एलियन्स आणि मानव जातीत पेटणारं युद्ध आणि या युद्धात मानवी आयुष्य वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या एका प्राध्यापकाचे प्रयत्न हा खेळ पाहिल्याशिवाय त्याचा थरारक शेवट कळणार नाही.

 

tomorrow war inmarathi

 

अनेक दिवसांपासून सायन्स फिक्शन बेस चित्रपट पाहिल्याची खंत असेल तर उद्याची सगळी काम आटपून हा चित्रपट वेळीच बघाच.

 ३. द फिअर स्ट्रीट – पार्ट १ – १९९४ (नेटफ्लिक्स)

रोमॅन्स, सायन्स फिक्शन असे सगळे विषय पाहिले आणि हॉरर फिल्मचा थरार अनुभवला नाही तर मग विकेंडची मजा अपूर्ण राहिल. मात्र यंदा हे टेन्शन घेऊ नका कारण नेटफ्लिक्सवर द फिअर स्ट्रीट पार्ट १ हा आगळावेगळा भयपट तुमच्या भेटीला येतोय.

नावावरूनच त्याच्या कथेचा काहीसा अंदाज येतोय असं वाटत असेल तर तुम्ही चुकताय, कारण भयपटाची कथा, त्यातील ती गूढ वाट आणि गुढतेच्या वलयात अडकलेला तो मित्रमैत्रिणींचा समूह यांचंं नेमकं काय होतं? हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पहावा लागेल.

 

fear street inmarathi

 

आर एल स्टाइन्स यांच्या प्रसिद्ध पुस्तकांच्या सिरीजवर आधारित हा चित्रपट असून त्याचा पहिला भाग उद्या प्रकाशित होतोय. १९९४ सालापासून सुरु होणारी ही कथा तरुणमुलांवर बेतलेली आहे.

नव्या गोष्टींचा शोध घेणारी ही भन्नाट गॅंग एका वेगळ्या शोधमोहिमेवर निघते. सुमारे ३०० वर्षांपासून शहराला त्रास देणा-या वाईट शक्तींचा शोध आणि त्यांच्याशी केलेला सामना या वादळी प्रवासात अखेर कोण जिंकतं? हे तुम्हालाही श्वास रोखून पाहता येईल.

अंधा-या खोलीत कुटुंबासह हा थरारपट पाहण्याची संधी चुकवू नका.

४. द 8th नाईट (नेटफ्लिक्स)

द फिअर स्ट्रीटचा प्रभाव कायम असतानाच दुस-या दिवशी आणखी एक भयपट पहायची इच्छा झाली तर शोधाशोध करायची गरज नाही. त्याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पुढचा चित्रपट क्लिक करा.

एक कोरियन भयपटाचा चित्तथरारक अनुभव घ्यायचा असेल तर द 8th नाईट हा चित्रपट तुम्ही पहायलाच हवा.

 

8th night

 

सातजणांचा बळी घेणारी एक दुष्ट आत्मा मुक्तीसाठी आपल्या अंतीम टप्प्यात पोहोचते आणि त्यानंतर आठव्या रात्री नेमकं काय घडतं हे पाहिल्यानंतर चित्रपटाची कथा आणि विचारशक्ती यांचं कौतुक कराल.

बॉलिवूडमधील पठडीतील कथांचा कंटाळा आला असेल तर हा कोरियन चित्रपट एक चांगला पर्याय ठरू शकेल.

५. मॉर्टेल – सिझन २ (नेटफ्लिक्स)

फ्रेन्च स्कुल ड्रामा आवडणा-यांनी यापुर्वीच मॉर्टेलचा पहिला सिजन आवडीने पाहिलाय. मागील काही महिन्यांपासून दुस-या सिझनची उत्सुकता ताणली गेली असतानाच अखेरिस ही प्रतिक्षा संपलीय.

उद्या सकाळीच मॉर्टेलचा दुसरा नवा सिझन नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होतोय.

 

mortel inmarathi

 

अलौकिक शक्तीने एकत्र आलेल्या सोफियान, व्हिक्टर आणि लुईसा या तीन मित्रमैत्रिणी या नव्या भागांमध्ये कोणती धमाल करणार? त्यांना प्रतिक्षा असलेल्या रेड आय गॉड अर्थात लाल डोळ्यांच्या शक्तीला भेटणार का? त्यांच्यातील सामना कसा रंगणार? या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर ही सिरीज बघाच.

कोरोनाचा डेल्टा व्हेरिएन्ट, बुरशींचे वेगवेगळे प्रकार अशा अनेक विकारांनी आपले हातपाय पसरले आहेेत, त्यांना रोखण्यासाठी सरकारने लागू केलेल्या नियमावलीमुळे शनिवार-रविवार कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडणे सोईस्कर ठरेल.

सरकारच्या नियमावलीचा कंटाळा आला असला तरी तुमचा कंटाळा दूर करण्याची जबाबदारी ओटीटी प्लॅटफॉर्मने घेतली असून बाहेर पोलिसांचे फटके खाण्यापेक्षा या विकेंडला एका क्लिकवरचे हे मनोरंजन कधीही उत्तमच!

हे ही वाचा – मराठी रंगभूमीवरील ८ अजरामर नाटकं, ५ व्या आणि ८ व्या नाटकाने रचलाय इतिहास!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?