आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
हॉलिवूडच्या मार्व्हेल्स आणि त्याच्या चित्रपटांचा विषय निघाला की आपोआप आशिष चंचलानी या कॉमेडी युट्युबरचं नाव आठवतंच! नुकतंच त्याने ‘लोकी’ या मार्व्हेल्सच्या नवीन सिरीजच्या लीड ऍक्टर टॉम हिडलस्टोनची मुलाखत घेतली होतीआणि त्याच्या आधी अनेक मार्व्हेल्सच्या सुपरहिरो अभिनेत्यांची.
आशिषचा संदर्भ यासाठी की मार्व्हेल्स मध्ये काम करणाऱ्या कलाकारांची मुलाखत घेणारी दुसरी युट्युबर म्हणजे प्राजक्ता कोळी.
प्राजक्ताने निक फ्युरी अर्थात सॅम्युएल जॅक्सन आणि कॅप्टन मार्व्हेल अर्थात ब्रि लार्सन यांची मुलाखत घेतली होती.
तर, हिच प्राजक्ता कोळी आज वेगळ्यांचं कारणाने चर्चेत आहे.
युट्युब ओरिजिनलच्या अंतर्गत तयार झालेल्या ‘क्रिएटर्स फॉर चेंज’ या आंतरराष्ट्रीय डॉक्युमेंटरीला प्रतिष्ठित अशा ४८ व्या ‘डे टाईम एमी’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पुरस्काराचा मिळाला आहे.
विशेष म्हणजे या डॉक्युमेंटरी मध्ये प्राजक्ता कोळी सोबत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी,अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा या सुद्धा झळकल्या आहेत.
मागे भुवन बाम हा युट्युबर अमंडा केरी आणि जॉनी सीन्स या आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत झळकला होता. आता प्राजक्ता थेट मिशेल ओबामा यांच्या सोबत काम करतानाचे पाहून तिचे विशेष कौतुक झाले होते.
–
हे ही वाचा – ऐन तारुण्यात हौस म्हणून त्याने चॅनल सुरू केलं आणि बनला जगप्रसिद्ध भारतीय युट्यूबर!
–
या डॉक्युमेंटरी ला ‘आऊट स्टँडिंग डे टाईम नॉन फिक्शन स्पेशल’ या प्रकारात २०२० साल चा डे टाईम एमी पुरस्कार प्राप्त झाला आहे.
मिशेल ओबामा सारख्या व्यक्तिमत्त्वासोबत काम करून त्या कामाला पुरस्काराने सन्मानित केल्याने प्राजक्ता कोळीच्या नावाला आज वेगळेच वलय प्राप्त झाले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे आणि त्यासह महाराष्ट्राचे नावही प्राजक्ताने उंचावले आहे.
नुकत्याच अमेरिकेत झालेल्या ‘न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये प्राजक्ताची ‘खयाली पुलाव’ फिल्म पण शोकेस झाली होती.
जेव्हा प्राजक्ताच्या डॉक्युमेंटरीला मिळालेल्या नामांकनाबद्दल विचारले असता प्राजक्ता म्हणाली होती,
आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पुरस्कारासाठी नामांकित होणे हीच मोठी गोष्ट आहे. पुरस्कार मिळाला किंवा नाही मिळाला याला महत्व नाही.
शिवाय मिशेल ओबामा सारख्या नामांकित व्यक्ती सोबत काम करणे हे कोणा पुरस्कारापेक्षा कमी नाही.
नेमकं काय आहे ‘क्रिएटर्स फॉर चेंज’.?
युट्युब या व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा स्वतंत्र भाग असलेल्या युट्युब ओरिजिनल्सच्या अंतर्गत तयार झालेली ही डॉक्युमेंटरी आहे. यामध्ये प्राजक्ता कोळी आणि मिशेल ओबामा यांच्या सोबत इंडो-अमेरिकन युट्युबर लिजा कोशी आणि मूळ आफ्रिकन असलेली थेंबे महलाबा सुद्धा झळकले आहेत.
ही डॉक्युमेंटरी नामीबिया, व्हिएतनाम, भारत सारख्या मागास आणि विकसनशील देशात राहणाऱ्या किशोर वयीन मुलींबद्दल आहे.ज्यांना शिक्षण घेताना कैक अडचणी आल्या पण त्याच्यावर मात करून त्यांनी आपलं नाण खणखणीत वाजवले आहे.
या डॉक्युमेंटरीसाठी प्राजक्ताने लखनऊच्या प्रेरणा फाउंडेशन या स्त्रियांसाठी काम करणाऱ्या संस्थेतल्या मुलींची भेट घेतली होती. छोट्या शहरात असताना शिक्षण घेताना कोणत्या समस्या सहन कराव्या लागतात? कोणत्या प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो? याचा अभ्यास केला.
युट्युब वर ही डॉक्युमेंटरी आपण विनामूल्य आपण पाहू शकतो.
प्राजक्ताच्या या कामगिरी नंतर महिला सशक्तीकरण आणि महिला सबलीकरण मध्ये तिला चांगलाच रस असल्याचे दिसून येते.
युट्युबवर तिच्या ‘मोस्टली सेन’ या युट्युब चॅनेलला तब्बल ६२ लाख सबसक्रायबर आहेत. २०१५ साली तिने हे चॅनेल सुरू केलं आहे.
आतापर्यंत तिच्या या चॅनेलवर हृतिक रोशन, नवाजुद्दीन सिद्दीकी, विकी कौशल, सैफ अली खान, काजोल, जॉन अब्राहम, मनोज वाजपेयी सारख्या अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली आहे.
–
हे ही वाचा – भारतीय तरुणाईचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या ह्या ५ युट्यूब सिरिज नाही बघितल्या तर काय बघितलं?
–
२०१७ साली आयडब्लूएस डिजिटलच्या माध्यमातून ‘व्हायरल क्वीन’ म्हणून प्राजक्ता कोळीचा सन्मान केला गेला होता. मूळची ठाण्याची असलेल्या प्राजक्ताने मुलुंडच्या वझे केळकर महाविद्यालयातुन पदवी शिक्षण पूर्ण केले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासोबत महाराष्ट्राचे नाव सुद्धा प्रकाशित केल्याबद्दल प्राजक्ताचे मनःपूर्वक अभिनंदन!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.