आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सध्या सोशल मीडिया आणि त्याच्या वापरामुळे एकंदरच सगळीकडे वातावरण तापलेलं आहे. भारतात तर सध्या ट्विटरविरुद्ध युद्धच छेडलेलं आहे. फेसबुक ट्विटर यांनी त्यांच्या पॉलिसीज बदलाव्यात म्हणून भारतीय सरकारन कसोशीने प्रयत्न करत आहेत.
सोशल मीडिया वापरणाऱ्या लोकांचा डेटा सुरक्षित राहावा हे भाबडं कारण जरी त्यामागे असलं तरी आणखीन बरीच राजकीय पार्श्वभूमी त्याला कारणीभूत आहे.
अजूनतरी व्हॉट्सअॅपबाबत तरी काहीच चर्चा नसली तरी ते कायम चर्चेत असतंच. व्हॉट्अॅपनेसुद्धा त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीज लोकांना स्वीकारायला भाग पाडलं होतं ज्यावरून बराच गदारोळ माजला, पण नंतर ते प्रकरणसुद्धा निवळलं.
–
हे ही वाचा – Whatsapp बंद होणार नाही, पण वापरताही येणार नाही… नव्या नियमांचा अजब कारभार
–
नुकतंच व्हॉट्सअॅपचं नवीन वर्जन आलेलं आहे ज्याला जीबी व्हॉट्सअॅप असंही म्हंटलं जातंय. याचे फीचर्स नुकतेच रिलीज झाले असून यावरून सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे.
या अॅपच्या माध्यमातून आपण पाठवलेले मेसेज retrieve करण्यापासून ऑटो रिप्लाय पर्यंतचे वेगवेगळे फीचर्स या नवीन GB whatsapp मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील पण हे नवीन वर्जन कितपत सुरक्षित आहे याविषयी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
हे नवीन व्हॉट्सअॅप वापरणं खरंच सोयीचं आणि सुरक्षित ठरेल का? व्हॉट्सअॅप कडून अधिकृतरित्या याची घोषणा झाली आहे का याविषयी आपण यावर विस्तृतपणे चर्चा करूया!
काय आहे जीबी व्हॉट्सअॅप?
खरंतर हे अॅप हे एका थर्ड पार्टी कंपनीने काढलं असून याला व्हॉट्सअॅपचं क्लोन वर्जन असंही म्हणता येईल. अधिकृतरीत्या याची घोषणा झालेली नसून याविषयी या कंपनीने काहीच भाष्य केलेले नाही.
हे अॅप हे तुम्हाला नॉर्मल प्लेस्टोअरवर न मिळता बाहेरच्या साईटवरुन याची apk फाइल डाउनलोड करून ते वापरता येईल जे तुमच्या फोनसाठी धोकादायक ठरू शकते.
याची फीचर्स काय आहेत?
सर्वात महत्वाचं म्हणजे यात ऑटो रिप्लायचा ऑप्शन दिलेला असून, या क्लोन अॅपच्या माध्यमातून ९० पेक्षा जास्त फोटो तुम्ही शेअर करू शकाल, याशिवाय तुम्ही समोरच्या व्यक्तिचं स्टेटस थेट डाउनलोडदेखील करू शकता.
अर्थात क्लोन अॅप असल्याने या सगळ्या फीचर्सची शाश्वती देणं जरा कठीणच आहे.
तुमच्या डेटाशी छेडछाड होऊ शकते :
हे थर्ड पार्टी अॅप असल्याने ते तुम्हाला कोणत्याही प्लेस्टोअरवर मिळणार नाही, ते तुम्हाला इतर साईट्सवरुन डाउनलोड करावं लागेल आणि ते इंस्टॉल करताना तुमचा फोन तुम्हाला याबाबत सावधही करेल तरी तुम्ही ते अॅप इंस्टॉल केलेत तर ते केवळ तुमच्या रिस्कवर असेल.
गुगल थर्ड पार्टी अॅप्स ही सुरक्षित मानत नाही त्यामुळे हे जीबी व्हॉट्सअप कितपत योग्य ठरेल हे सांगता येणं कठीण आहे.
सध्या आपण सगळेच स्मार्टफोन वापरत आहोत, आपण सगळेच तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेलो आहोत पण तरीही सगळेच आपल्या डेटासंदर्भात चिंतित आहेत, त्यामुळेच व्हॉट्सअॅपच्या या क्लोन वर्जनच्या आहारी न गेलेलंच बरं.
या प्रगत तंत्रज्ञानाच्या जगात आपला डेटा शक्य होईल तितका सुरक्षित ठेवणं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे या नवीन व्हॉट्सअॅपच्या नव्या वर्जनचे फीचर्स बघून ते डाउनलोड करू नका हीच कळकळीची विनंती!
===
हे ही वाचा – WhatsApp, Telegram आणि Signal app? तुमच्या शंकांचं निरसन करणारा खुलासा!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.