“मटण ऐवजी माझी पुस्तकं घ्या!” नामदेवराव जाधवांच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा धुराळा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘वाचाल तर वाचाल’, ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, आपले आई वडील आजी आजोबा सतत आपल्याला लहानपणापासून हे सांगायचे की सतत काहीतरी वाचत राहा, वाचनाने माणूस समृद्ध होतो.
आजच्या डिजिटल वाचन संस्कृतीच्या जगात किंडल, वेगवेगळ्या अँप्लिकेशनच्या माध्यमातून लोक वाचत असतात, मात्र काही घरात अजूनही रोज सकाळी वर्तमानपत्र वाचायची प्रथा आहे. आजही अनेकांच्या घरात कपडे कमी आणि कपाटं भरभरून पुस्तके असतात.
आज अनेक मोठमोठे उद्योगपती, अनेक क्षेत्रातील दिग्गज लोक, मोटिव्हेशनल स्पिकर्स आपल्या भाषणातून, मुलाखतीतून वाचनाचं महत्व सांगत असतात. शैक्षणिक शिक्षण घ्याच त्याच बरोबरीने अवांतर वाचनावर भर द्या, असा सल्ला नेहमीच देतात.
नुकतंच लेखक नामदेव जाधव यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट टाकली, ज्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. मांसाहारी लोकांच्या आवडत्या गोष्टीवर त्यांनी भाष्य केलं आहे, चला तर मग जाणून घेण्यात त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
कोण आहेत नामदेव जाधव?
आज युट्युबवर गेलात नुसतं नामदेव जाधव टाकलं तरी त्यांच्या अनेक भाषणांचे व्हिडिओ आपल्या पहायला मिळतील. लोकांना आवडेल आणि विचार करायला आवडेल अशा सोप्या भाषेत ते बोलतात. प्रत्येक भाषणातून ते समाजप्रबोधन करत असतात.
पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात त्यांचा जन्म झाला. शिक्षणासाठी पुढे ते मुंबईत आले, पुढे सरकारी नोकरी सुद्धा मिळाली. मात्र त्यात मन रमेना, म्हणून व्यवसाय करावा असं त्यांनी ठरवले ,त्याचवेळी त्यांना असं समजले की ते जिजाऊंचे वंशज आहेत. नोकरी सोडून ते कविता करू लागले, पुस्तक लिहू लागले. शिवाजी द मॅनेजमेन्ट गुरु हे त्यांचे नावाजलेले पुस्तक आहे.
नेमकी फेसबुक पोस्ट काय आहे?
आपल्या भाषणातून कायमच ‘उद्योजकशीलतेकडे भर द्या ‘असे सांगत असतात, त्याच प्रमाणे त्यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली आहे, ज्यात ते म्हणतात की १ महिना मटण खाण्याऐवजी माझी पुस्तक वाचा…
मटण हा तर अनेकांचा जीव की प्राण असतो रविवारसारख्या सुट्टीच्या दिवशी देखील पहाटे उठून मटणाच्या लाईनीत लोक शांतचित्ताने उभे असतात. त्यामुळे आपल्या आवडत्या पदार्थवर जर कोणी भाष्य केले तर नेटकरी त्याला कशाप्रकारे उत्तर देईल असेल वाचा खालीलप्रमाणे
केवळ मटण आणि पुस्तक हा मुद्दा होता मात्र त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अनेक मुद्दे मांडले आहेत, आज मराठी माणूस देखील खूप पुढे जाऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हा अत्यंत आपल्या जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे छत्रपतींची तुलना एका पदार्थाशी होऊ शकत नाही असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
पुस्तकाचं मार्केटिंग करता का? आम्ही मटण का खाऊ नये? असा सवालच नेटकऱ्यांनी केला आहे. एकाने तर पूर्ण हिशोबच सांगितला आहे.
काही लोकांनी तर त्यांना थेट पीडीएफ रूपात पुस्तक आणा असा सल्लाच दिला आहे तर काही लोक म्हणतात आम्ही त्या पैशाची बँकेत एफडी ठेवू.
त्यांना रविवारी मटण मिळाले नाहीत, म्हणून नैराश्य येऊन त्यांनी ही पोस्ट टाकली असावी असं काहींचं म्हणणं आहे.
त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी विरोध केला काहींनी सल्ले दिले आहेत. मात्र काहींना हा विचार पटलेला आहे असं दिसून येतो.
खाण्यासाठी जन्म आपुला असं म्हणणारे लोक, नामदेव जाधवांच्या या पोस्टवरून नक्कीच उलट सुलट प्रतिकिया देतील, मटणाचे पैसे वाचवून त्याच पैशातून पुस्तक विकत घ्यावे की न घ्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
आपल्या देशात प्रत्येक प्रांताची जशी खाद्यसंस्कृती आहे तशीच भविष्यात वाचन संस्कृती देखील अस्तित्वात यायला हवी.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.