Site icon InMarathi

दुपारी जेवण केल्यावर येणाऱ्या सुस्तीचं कारण समजून घ्या, वाचा…

sleepy man InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दुपारी जेवण केल्यावर सुस्ती का येते हा प्रश्न जर आपण कोणाला विचारला तर तो थेट हसण्यावारी घेतला जाईल. कारण म्हणावं तर या प्रश्नामध्ये कुतुहूल जागं होण्यासारखं काही नाही म्हणा.

म्हणजे हा प्रश्न विचारला तर समोरचा हेच उत्तर देईल की, “येते सुस्ती, झोपावसं वाटतं, त्यात काय विशेष कारण असणार?” म्हणजे ज्याच्याकडून आपण उत्तराची अपेक्षा करत होतो तोच मनुष्य आपल्याला पुन्हा तोच प्रश्न विचारतोय.

 

newstriger.com

 

असो, पण काही लोक असे असतात ज्यांना प्रत्येक प्रश्नामागचं उत्तर जाणून घ्यायचं असतं, जसे की आम्ही! म्हटलं पहावं तरी काय आहे या मागचं उत्तर आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही,

पण अहो खरंच या प्रश्नामागे एक उत्तर दडलेलं आहे. तेच आज आम्ही तुमच्यासमोर उलगडणार आहोत.

दुपारी ऑफिस म्हणा, शाळा म्हणा कोठेही असलो आणि भरपेट जेवण घेतलं कि सुस्ती चढते, कशातच मन लागत नाही, वाटतं द्यावी मस्तपैकी ताणून. पण तसं करण्याची हिंमत मात्र होत नाही, मग वैतागत, कंटाळत कसा तरी वेळ ढकलावा लागतो, पण काही घरी जाण्याच्या वेळेस मात्र पुन्हा आपण फ्रेश होतो आणि आपली गाडी पूर्वपदावर येते.

 

besttimepass.com

 

हे होण्यामागे एक शास्त्रीय कारण आहे. आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी उर्जेची गरज असते आणि ही उर्जा मिळते अन्नामधून.

जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा पचनक्रियेच्या माध्यमातून ते शरीराला आवश्यक असणाऱ्या ऊर्जेमध्ये परावर्तीत होते आणि जेव्हा आपण जास्त खातो तेव्हा Pancreas आपल्या रक्तामध्ये शुगरचे प्रमाण संतुलित राहावे म्हणून Insulin बनवते.

 

speedypaper.com

 

जेवण केल्यानंतर सुस्ती येण्यामध्ये Carbohydrate (कर्बोदके) चा देखील हात असतो. ज्या पदार्थांमध्ये Carbohydrate जास्त प्रमाणात असतात, त्या पदार्थांमधील Carbohydrate चे पचन करण्यासाठी शरीराला जास्त उर्जा खर्च करावी लागते. शरीराची ६०-७५ टक्के उर्जा केवळ या Carbohydrate चे पचन करण्यासाठी वापरली जाते.

तसेच तुम्ही अति प्रमाणात खाल्लं तरीही त्या सर्व अन्ना ची पचनक्रिया पूर्ण होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उर्जा आणि वेळ लागतो.

आणि हेच कारण आहे की जेवण केल्यावर आपल्याला लगेच सुस्ती येते आणि ताणून देण्याची इच्छा होते.

 

newstriger.com

 

पण हे टाळता देखील येऊ शकते. सगळ्यात महत्त्वाच म्हणजे दुपारी अगदी गच्च पोट भरून जेवण करू नका किंवा २-३ तासांच्या अंतराने थोडं थोडं खावं.

 

 

तुम्ही जेवढ जास्त अन्न पोटात ढकलत जालं, तेवढंच शरीराला त्याचं पचन करण्यासाठी जास्त उर्जा वापरावी लागेल, परिणामी उर्जा कमी झाल्याने तुम्हाला झोप येईल.

 

 

आणि हो, तुम्ही असे भर दुपारी जेवण केल्यावर झोपत असाल तर त्यात वाईट वाटून घेऊ नका, ही समस्या सगळ्या जगाला आहे म्हटलं..!

 

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version