Site icon InMarathi

‘मास्टर की’ने सुद्धा उघडता येत नाही कुलूप! ‘लॉक सिटी’मधील आविष्कार जाणून घ्या…

dindigul locks featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

घर असो किंवा ऑफिस, दुकान असो, मॉल असो किंवा छोटीशी टपरी, यातलं काहीही जेव्हा बंद करायचं असेल, तर कुलुपाची गरज असतेच. सध्या कोरोनामुळे लॉक-अनलॉकचा खेळ सुरु आहे, तो भाग निराळा, मात्र कुलुपाशिवाय आयुष्य जगणं खरंच शक्य आहे का? या प्रश्नाचं उत्तर नाही असंच येईल.

कुठलीही गोष्ट कुलूपबंद करायची असेल, तर सगळ्यात आधी कुठलं कुलूप आठवतं? गोदरेज नवताल, बरोबर की नाही मंडळी? काही गोष्टी  अगदी मनात फिट्ट बसलेल्या असतात, उदाहरणार्थ टूथपेस्ट म्हणजे कोलगेट, तसंच नवतालचंही आहे असं म्हणायला हवं…

 

 

गोदरेज नवतालची ही जबरदस्त ओळख तर आपल्याला माहित असतेच, पण तुम्ही कधी दिंडीगुल लॉकबद्दल ऐकलं आहे का? दिंडीगुल गावाला तर थेट लॉकसिटी म्हटलं जातं. इथे मोठ्या प्रमाणावर कुलूपनिर्मिती केली जाते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती सुद्धा होते.

दिंडीगुल कुलुपांची ख्याती केवळ स्थानिकच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे.

तब्बल ५०० वर्षांचा इतिहास…

दिंडीगुल या गावात कुलुपांची निर्मिती करण्याची सुरुवात काल-परवाची नाही, तर तब्बल ५०० वर्षं जुनी आहे. इतिहास काळापासून कुलुपांचे कारखाने, या गावात आणि पंचक्रोशीत आहेत. कुलुपांचा उत्तम दर्जा, सुंदर डिझाइन्स, ही परंपरा दिंडीगुलने आजही जपली आहे.

 

 

कुलुपांच्या उत्कृष्ट दर्जावर डोळे झाकून विश्वास ठेवणं ही दिंडीगुलला मिळालेली पोचपावती आहे असं म्हणायला हवं. मंदिरं, धार्मिक स्थळं, सरकारी ऑफिसेस एवढंच नव्हे तर नामवंत  व्यावसायिक सुद्धा त्यांच्या ऑफिसला दिंडीगुलची कुलुपं लावताना मागचा पुढचा विचार करत नाहीत.

जुन्या काळातील राजवाडे, किल्ले अशा ठिकाणांवर अनेकदा दिंडीगुलची कुलुपं दिसतात. ५०० वर्षांच्या इतिहासाची साक्ष देण्यासाठी हे पुरावे निश्चितपणे पुरेसे ठरतात. 

 

 

खासियत काय?

दिंडीगुल कुलुपाचं लिव्हर मेकॅनिझम हे उत्तम आणि इतरांपेक्षा वेगळं असतं. प्रत्येक कुलुपाची रचना हाताने केली जाते, ती वेगवेगळेच असेल याची संपूर्ण काळजी घेतली जाते. त्यामुळेच हे कुलूप इतर कुलुपांपेक्षा अधिक सुरक्षित मानलं जातं.

या उत्तम कारागिरीमुळेच दिंडीगुल कुलुपांचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे, ही कुलुपं कुठल्याही ‘मास्टर की’चा वापर करून उघडता येत नाहीत, असा दावा करण्यात येतो.

 

 

तरुणांनी पुढे येण्याची गरज

दिंडीगुलची खास कुलुपं बनवण्याची ही कला, फारच दर्जेदार आहे. यासाठी कुशल कारागिरांची आवश्यकता असते. या गावातील प्रौढ आणि जुनी जाणकार मंडळी उत्पादनाचं काम करतात.

हे काम कौशल्याचं असल्याने अनुभवाची गरज आहे, यात शंकाच नाही. पण तरीही ही कला लुप्त होऊ नये आणि जगप्रसिद्ध असणारी ही कुलुपं नव्याने कायम घडत राहावीत यासाठी नव्या पिढीने पुढाकार घेणंही तितकंच आवश्यक आहे. तरुणांना कुलूप निर्मितीची ही कला अवगत झाली नाही, तर ती लुप्त होण्याचा धोका नक्कीच संभवतो.

 

 

तरुणांनी अधिकाधिक पुढाकार घेतल्यास, कामाचा वेग वाढेल आणि कुलुपाचं भविष्य कुलूपबंद होण्याची वेळ येणार नाही, हे मात्र नक्की!

मँगो लॉक, दरवाजाची कुलुपं, ट्रिक लॉक, शटर लॉक, बेल लॉक, बुक शटर लॉक, ड्रॉवर लॉक अशा विविध प्रकारच्या लॉकची निर्मिती दिंडीगुलमध्ये केली जाते.

GI टॅगमुळे शिक्कामोर्बत…

GI म्हणजेच जिऑग्राफिकल इंडिकेशन. काही महिन्यांपूर्वीच म्हणजे २०१९ मध्ये दिंडीगुल कुलुपांना GI हा टॅग प्राप्त झाला. हा टॅग म्हणजे ते विशिष्ट उत्पादन, वस्तू विशिष्ट प्रदेशातील आहेत यावर असलेलं शिक्कामोर्तब!

या टॅगमुळे दिंडीगुलची स्वतःची खास ओळख अधिक ठासून सांगता येतेय यात काहीच शंका नाही…!!

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version