' शेतमजुराचा मुलगा बनला इस्रोचा वैज्ञानिक – महाराष्ट्रातल्या तरुणाची गरुडझेप! – InMarathi

शेतमजुराचा मुलगा बनला इस्रोचा वैज्ञानिक – महाराष्ट्रातल्या तरुणाची गरुडझेप!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रयत्नांती परमेश्वर ही म्हण तर तुम्हा सगळ्यांना ठाऊक असेलच म्हणा, अगदी ओम शांती ओम मधला शाहरुखसुद्धा हेच सांगतो की एखाद्या गोष्टीसाठी मनापासून प्रयत्न केले तर ती आपल्याला मिळतेच!

 

shahrukh inmarathi

 

मग तो एखादा सामान्य तरुण असो किंवा मोठा बिझनेसमन, प्रबळ इच्छाशक्ती माणसाला यशाच्या शिखरावर हमखास नेतेच हे सत्य आहे. देशातले मोठमोठे उद्योगपती घ्या किंवा खेळाडू किंवा समाजकार्य करणारी माणसं, सगळ्यांच्या यशाचं सूत्र एकच प्रबळ इच्छाशक्ति आणि मेहनत करायची तयारी.

याच सूत्राचा आधार घेऊन एका मजुराचा मुलगा इस्रोसारख्या संस्थेत वैज्ञानिक म्हणून नोकरीला लागतो हे सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? आज याच तरुणाची यशोगाथा आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत.

महाराष्ट्रातल्या पंढरपूर मधल्या एका युवकाला इस्रोतर्फे वैज्ञानिक म्हणून नेमण्यात आलं असून लवकरच तो केरळच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये पदभार स्वीकारणार आहे, त्याचं नाव आहे सोमनाथ माळी.

 

somnath mali inmarathi

 

शिवाय महाराष्ट्रातून निवड झालेला ती पहिला विद्यार्थी आहे त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसासाठी ही अभिमानाचीच बाब आहे.

हे ही वाचा नासाच्या एका वैज्ञानिकाने केलाय गौप्यस्फोट – चंद्रावर ‘कुणीतरी’ आहे!

अनुकूल परिस्थितीवर मात करत, शेतात मजुरी करणाऱ्या आई वाडिलांनाच्या कष्टाचं चीज करणारा हा सोमनाथ आहे तरी कोण त्याविषयी जाणून घेऊया.

जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या सोमनाथला लहानपणापासूनच विज्ञानात प्रचंड रस होता, दहावी पास झाल्यावर गावात राहून पुढचं शिक्षण घेणं कठीण असल्याने त्याने पुढील शिक्षणासाठी पंढरपूरच्या केबीपी महाविद्यालयात एडमिशन घेतली.

बारावीत ८१ % नी उत्तीर्ण झालेल्या सोमनाथने मुंबईत जाऊन बी. टेकचं शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं, आणि नंतर आयआयटी दिल्ली येथे मेकॅनिकल डिझायनर म्हणून त्याची निवडही झाली.

याचदरम्यान त्याने संपूर्ण भारतातून होणाऱ्या GATE परीक्षेत ९१६ वा नंबर पटकावला आणि नंतर त्याला याच विषयात म्हणजे एयरक्राफ्ट इंजिन डिझाईनवर काम करायची संधी मिळाली.

 

aircraft engine inmararthi

 

त्याच्या या सगळ्या मेहनतीचं चीज तेव्हा झालं जेव्हा २ जून रोजी त्याला इस्रोकडून सीनियर सायंटिस्ट म्हणून नेमण्यात आलं आणि केरळमध्ये कामासाठी विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये त्याची नियुक्ती करण्यात आली.

आपल्या आईवडिलांनी कष्टात दिवस काढून आज आपल्याला इथवर आणलं आहे याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसतोच, शिवाय अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून बार आल्याने त्याला त्या गोष्टींची जाणीव आहे हेदेखील यावरून कळतं.

जिल्हा परिषदेच्या शाळेत शकुन एवढी मोठी गरुडझेप घेणाऱ्या सोमनाथला आणि त्याला या सगळ्यासाठी लागेल तसे आर्थिक मानसिक पाठबळ देणाऱ्या त्याच्या आई वडिलांना शतशः नमन!

आज सोमनाथने केवळ त्याच्या गावाचे किंवा जिल्ह्याचेच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. हा देश वैज्ञानिकांचा देश आहे, एकापेक्षा एक सरस वैज्ञानिक आपण जगाला दिलेत.

 

somnath inmarathi

 

त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या पुढच्या पिढीला या आणि अशा कित्येक सोमनाथविषयी शालेय पाठयपुस्तकातून जाणून घ्यायला मिळेल तेव्हा नक्कीच आपली छाती अभिमानाने फुलेल!

===

हे ही वाचा अवकाशात प्रवास करणाऱ्या इस्रोच्या पहिल्या महिला रोबोट विषयी काही रंजक गोष्टी!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?