Site icon InMarathi

भारतीय संघाच्या पहिल्या वहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याची गोष्ट!

india's-first-international-cricket-match-marathipizza00

thebetterindia.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

यंदा आयपीएलला १० वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे सध्या सगळीकडे आयपीएलची धूम सुरु आहे. प्रत्येक ardent cricket lover आपापल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी कॉलेज, अभ्यास किंवा ऑफिसची कामं वगैरे लवकर संपवून आठच्या आत घरात येऊन टीव्ही समोर ठाण मांडून बसत आहे. हातातील रिमोटवर गदा आल्याने स्त्री वर्गाला त्यांच्या लाडक्या पाठकबाई, राधिका, मनू आणि गौरीचा हालहवाल समजायला मार्ग नाहीये आणि आयपीएल खेळणारे व बघणारे रोज आपले ह्यासाठी सिरीयल लव्हर्स कडून शिव्याशाप खात आहेत. मुंबईचे लोक मुंबईला, पुण्याचे अर्थातच पुण्याला सपोर्ट करत आहेत. पण पनवेलकर आणि कर्जतकरांची अवस्था “विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?” अशी झाली आहे. ज्यांच्या श्वासात क्रिकेट आहे, ज्यांच्या भावना क्रिकेटशी जोडल्या गेल्या आहेत अशा काही लोकांना मात्र हा पैश्यासाठीचा खेळ बघणे आवडत नाही. त्यांच्या मते ह्यात भावना नाहीत.

ipl2017.club

असो. ज्याची त्याची इच्छा! पण ह्या सगळ्या भानगडीत कोणी असा विचार केला आहे का की भारतात क्रिकेट खेळण केव्हा सुरु झालं? भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना कोणा विरुद्ध आणि कधी खेळला गेला होता? आज आपण ह्याच भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याची रंजक गोष्ट वाचणार आहोत.

ही स्टोरी म्हणजे रियल लाईफ ‘लगान’ आहे. होय! तुम्ही बरोबर ओळखलंत. भारताचा पहिला सामना इंग्लंडविरुध्द झाला होता आणि तो ही आपण पारतंत्र्यात असताना. ह्यात ‘लगान’ सारखे काहीही वेगळे पणाला लागले नव्हते, काही अटी शर्ती नव्हत्या. तो एक प्रोफेशनल क्रिकेट सामना होता. जरी ह्या सामन्यात विजय इंग्लंडचा झाला असला तरी भारताचा चांगला खेळ पाहून त्यांना जिंकण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागले होते. संपूर्ण क्रिकेट जगताला भारताच्या क्रिकेट talent ची दाखल घ्यावी लागली होती. चला तर मग जाणून घेऊया ह्या सामन्याबद्दल!

cricketique.wordpress.com

भारतीय लोकांना क्रिकेटबद्दल समजले ते इंग्रजांकडून. इंग्रज भारतात आले आणि त्यांनी त्यांच्यासोबत क्रिकेट हा खेळ सुद्धा आणला. असे म्हणतात की

इंग्रजांनी भारतात पहिला क्रिकेट सामना १७२१ साली गुजरातच्या खंबात येथे खेळला.

गोऱ्यांच्या जुलुमी कारभारामुळे त्यांच्या खेळात सुरुवातीला कोणी इंटरेस्ट घेतला नाही. पण हळू हळू लोकांना ह्या खेळाविषयी उत्सुकता वाटू लागली आणि पारसी लोकांनी पहिल्यांदा क्रिकेटमध्ये रस घेतला. त्यांनी १८४६ साली ओरीयेंटल क्रिकेट क्लब स्थापन केला. हाच नंतर पारसी क्रिकेट क्लब म्हणून ओळखला जाऊ लागला. ह्या क्लबने त्यांची टीम १८८६ साली इंग्लंडला क्रिकेट सामन्यासाठी पाठवली.ह्या टीमने २८ सामने खेळले. त्यातील १९ सामन्यात ते हरले तर आठ सामने अनिर्णीत राहिले. ह्यातील फक्त एक सामना ते जिंकू शकले.

(१८८६ साली इंग्लंड दौऱ्यावर गेलेला पारसी भारतीय संघ) thecricketcauldron.wordpress.com

इंग्लंडमधील भौगीलिक स्थिती आणि वातावरण ह्या टीम साठी नवीन होते त्यामुळे ते सामने जिंकू शकले नाहीत पण त्यांच्या अनुकूलनक्षमतेने ते इंग्लिश लोकांवर आपला प्रभाव पाडण्यात यशस्वी झाले. त्यांच्या ह्याच क्षमतेचे इंग्लिश लोकांनी कौतुक केले आणि म्हणूनच दोन वर्षांनी ह्या टीमने परत इंग्लंडचा दौरा केला. त्यानंतर १८८८ साली व १९११ साली ह्या टीमने परत दोन वेळा इंग्लंडचा दौरा केला. ह्याचा संपूर्ण खर्च पटीयालाच्या महराज भूपेंद्र सिंग ह्यांनी केला होता.

info-sikh.com

ह्यानंतर १९२८ साली भारतात Board of Control for Cricket ची स्थापना झाली आणि पहिली अधिकृत भारतीय टीम इंग्लंडला त्यांच्या पहिल्या वहिल्या टेस्ट मॅच साठी रवाना झाली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील क्रिकेटला राजाश्रय देणार्यांपैकी सर्वात श्रीमंत असलेले पटियालाचे महाराज ह्यांना भारतीय क्रिकेट टीमचे पहिले कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. ह्या टीमला All India Team असे नाव देण्यात आले कारण ही टीम भारतातील सर्व भागांचे प्रतिनिधित्व करीत होती.

लिंबडीचे राजकुमार घनश्यामसिंहजी ह्यांची उपकर्णधार म्हणून निवड झाली तर विजयनगरचे महाराज कुमार हे सहायक उपकर्णधार म्हणून निवडल्या गेले. ते विझी म्हणून ओळखले जात असत.

टीम दौऱ्यावर निघण्याच्या दोन आठवडे आधी पटियालाचे महाराज प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने पायउतार झाले तर विजयनगरचे महाराज कुमार ह्यांनी फॉर्म आणि फिटनेस नसल्याच्या कारणाने टीम मधून नाव मागे घेतले.

अखेर पोरबंदरच्या महाराजांची कर्णधार म्हणून निवड झाली आणि जहांगीर खान ह्यांना विझी ह्यांच्या जागेवर टीममध्ये घेण्यात आले. ह्यात गंमत अशी होती कि पोरबंदरचे महाराज जे कर्णधार म्हणून निवडण्यात आले होते ते टीम मधील सर्वात कमकुवत खेळाडू होते.

२ एप्रिल १९३२ साली भारतीय संघ मुंबईहून एका मालवाहू जहाजातून इंग्लंडच्या प्रवासासाठी निघाला. तेव्हा पोरबंदरच्या महाराजांनी मागे मागे जाणाऱ्या किनाऱ्याकडे बघून उद्गार काढले की

हे भारतदेशा .. आम्ही येतो ! तुमच्या शुभेच्छा घेऊन जातोय तेव्हा तुमच्यासाठी नक्कीच गौरव प्राप्त करू ! (Au revoir, India, we shall bring you laurels as you wish us to.)

thebetterindia.com

भारतीय संघ १३ एप्रिल १९३२ साली इंग्लंडला पोचला. ह्यावेळी लंडनचे वृत्तपत्र Evening Standard ने भारतीय संघाच्या लंडन दौऱ्या बद्दल हा दौरा राजकीय व सामाजिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा असल्याची टिप्पणी केली होती,

ना राजकारण ना धर्म फक्त क्रिकेट! हे ह्या भारतीय क्रिकेट टीमचे अनधिकृत घोषवाक्य आहे. हि टीम २१ वर्षांच्या विलंबानंतर येथे आली आहे. ह्या टीम मध्ये जे १८ खेळाडू आहेत ते आठ ते दहा वेगवेगळ्या भाषा बोलतात, त्यांचे जाती धर्म वेगवेगळे आहेत.” ह्या आधी इतके वैविध्य असलेली टीम क्रिकेटच्या मंचावर एकत्र आली नव्हती.

बीसीसीआयने जरी पोरबंदरच्या महाराजांना कर्णधार म्हणून निवडले असले तरीही त्यांना स्वतःला हे ठावूक होते की आपल्याला क्रिकेटचा फारसा अनुभव नाही आणि टीमचे नेतृत्व करण्याची आपली क्षमता नाही. ह्या आधी ते फक्त सहा फर्स्ट क्लासच्या मॅचेस खेळले होते. म्हणूनच ही जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांची मदार उपकर्णधार लिम्बडीचे राजकुमार ह्यांच्यावर होती. पण दुर्दैवाने लिम्बडीचे राजकुमार ह्यांना Marylebone Cricket Club (MCC) बरोबर छोटासा सामना खेळताना पाठीला दुखापत झाली आणि शेवटी पोरबंदरच्या महाराजांनी कर्णधारपदाची जबाबदारी Cottari Kanakaiya Nayudu ह्यांच्यावर सोपवली.

सी.के.नायडू हे भारताचे सर्वात चांगले batsman होते आणि टीम मधील सर्वात फिट खेळाडू होते. त्यांचे पहिले शतक त्यांनी नुकतेच ह्या दौऱ्यात केले होते. हे शतक भारताचे पहिले शतक होते. त्यानंतर The Star ह्या वृत्तपत्राने त्यांच्यावर “The Hindu Bradman in Form at Lord’s” ही हेडलाईन छापली होती. सी. के. नायडू ह्यांना कर्णधारपदाची जबाबदारी देणे हा पोरबंदरच्या महाराजांचा निर्णय अगदी योग्य होता. कारण पुढे जाऊन १९३३ साली सी.के. नायडू हे Wisden Cricketer Of The Year झाले.

youtube.com

नायडूंच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम इंग्लंडच्या मोठमोठ्या खेळाडूंविरुद्ध लॉर्डसवर २५ जून १९३२ साली त्यांच्या पहिल्या टेस्ट मॅच साठी उतरली. शनिवारी खेळ सुरु झाला. रविवारी विश्रांती घेण्यात आली. (त्या काळी ऑस्ट्रेलियाचा संघ सोडल्यास इतर संघांशी मॅच खेळताना हीच पद्धत होती.) जसजसा खेळ पुढे सरकू लागला तसा तसा इंग्लिश खेळाडूंना तुलनेने नवीन असलेल्या भारतीयांचा चांगला खेळ बघून पहिल्या अर्ध्या तासातच धक्का बसला.

इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंड संघातर्फे यॉर्कशायरचे Sutcliffe आणि Holmes हे ओपनर्स खेळायला आले. त्यांनी नऊ दिवसांपूर्वीच एका सामन्यात ५५५ धावांची भागीदारी केली होती. म्हणूनच अत्यंत आत्मविश्वासाने ते मैदानावर उतरले. पण भारतीय गोलंदाजांनी मोहम्मद निस्सार आणि अमर सिंग ह्यांनी अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंडची धावसंख्या पहिल्या वीस मिनिटातच १९ वर तीन बाद अशी केली. खराब झालेल्या सुरुवातीनंतर इंग्लिश कर्णधार Douglas Jardine व Wally Hammond ह्यांनी धावांची भागीदारी केली. पण भारतीय गोलंदाजांच्या अचूक गोलंदाजीमुळे आणि चपळ क्षेत्ररक्षणामुळे त्यांना धावा करणे अवघड जात होते.

(अमर सिंग आणि मोहम्मद निस्सार) madcrazyhatter.wordpress.com

मॅचचे वर्णन करताना बर्मिंगहम पोस्ट ह्या वृत्तपत्राने असे लिहिले की,

 The Birmingham Post wrote: “The All India cricket team has administered a few shocks to the dignity and confidence of England today. If there were among the 24,000 spectators at Lord’s some who imagined that the granting of a Test match by the MCC to the tourists from the Indian empire was merely an amiable concession, then they had a very rude awakening before the close of play.

(१९३२ साली लॉर्डस मैदानावर इंग्लंडचा कर्णधार Douglas Jardine भारतीय संघाचा सामना करताना) madcrazyhatter.wordpress.com

अतिशय अनुभवी इंग्लिश गोलंदाजांविरुद्ध खेळताना पहिल्या मॅचचा पहिला दिवस संपता संपता भारतीय संघाची धावसंख्या नाबाद ३० अशी होती. दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांची सुरुवात चांगली झाली. १ बाद ११० अशी धावसंख्या झाली होती. पण सी.के. नायडू आणि नाझीर अली हे अनुभवी आणि पक्के फलंदाज सोडल्यास इतर भारतीय फलंदाजांना मॅटिंग विकेट वरच खेळण्याची सवय असल्याने इंग्लिश गोलंदाजांचा सामना करता आला नाही. भारतीय संघाची मधली फळी कोसळली आणि धावसंख्या ४ बाद १६० वरून सर्वबाद १८९ अशी झाली.

ह्या सामन्यात भारतीय संघाला १५८ धावांनी हार पत्करावी लागली.

जरी भारतीय संघ ह्या सामन्यात पराभूत झाला असला तरीही ह्या टीमने पहिल्याच मॅचमध्ये अनुभवी इंग्लिश संघाचा सामना करताना जी हिंमत आणि धैर्य दाखवले त्याचे कौतुक करावे थोडे आहे. ह्यातून जगाला नक्कीच असा संदेश गेला कि येत्या काळात भारतीय क्रिकेट संघ क्रिकेट जगतात आपले स्थान मजबूत करणार आहे.

ह्यानंतर १९३३ साली इंग्लंडचा संघ भारतीय मातीत क्रिकेट खेळण्यास भारत दौऱ्यावर आला. ह्याच दौऱ्यात भारतीय भूमीवर पहिली औपचारिक क्रिकेट मॅच खेळली गेली. २५ जून १९३२ हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात आला आहे. योगायोगाने ५१ वर्षांनी ह्याच दिवशी कपिल देवने नेतृत्व केलेल्या भारतीय संघाने लॉर्डस वर प्रुडेन्शियल कप जिंकून इतिहास निर्माण केला होता.

pinterest.com

१९३२ ते आजपर्यंत भारतीय क्रिकेट संघाने अतिशय मेहनत करून दोन वेळा विश्वचषक जिंकून स्वत:चे वेगळे स्थान क्रिकेट जगतात निर्माण केले आहे. हा प्रवास अतिशय रंजक आणि लक्षवेधी आहे.

हे देखील वाचा : (क्रिकेटमधील ‘हे’ अतरंगी १० नियम जे तुम्हाला बिलकूल माहित नसतील!)

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version